MPSC राज्यसेवा परीक्षा

MPSC राज्यसेवा परीक्षेविषयी

MPSC म्हणजे (Maharashtra Public Service Commission: (महाराष्ट्र लोकसेवा आयोग). हि एक संस्था आहे जी महाराष्ट्र शासनातील वर्ग १, वर्ग २ अधिकारी पदांसाठी परीक्षा आयोजित करते. व विविध विभागांतील रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची नेमणूक करून देते.

MPSC ला घटनात्मक दर्जा प्राप्त असून, अनुच्छेद ३१५ अनुसार या संस्थेची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र शासनातील प्रशासकीय अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड करणे हे MPSC चे मुख्य कार्य आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तांत्रिक सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल केला असून, आता एका अर्जाद्वारे विद्यार्थ्यांना तीन संवर्गातील पदांसाठी पात्र होता येणार आहे. एमपीएससीने महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गांसाठी स्वतंत्र परीक्षा न घेता आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून हा बदल २०२२ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून केला जाणार आहे.

आयोगा मार्फत राज्यात खालील प्रशासकीय पदाच्या परीक्षा घेतल्या जातात

  • उपजिल्हाधिकारी (Deputy Collector)
  • पोलीस उप-अधीक्षक (Deputy Superintendent of Police)
  • तहसीलदार
  • नायब तहसीलदार
  • विक्री कर सहायक आयुक्त (Assistant Commissioner of Sales Tax)
  • सहायक संचालक, वित्त व लेख विभाग (Assistant Director, Finance and Accounts Department)
  • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant Regional Transport Officer)
  • गट विकास अधिकारी (Block Development Officer : BDO)
  • पोलीस उप-निरीक्षक (Police Sub-Inspector)
  • मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद (Chief Officer)
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer)
  • उपनिबंधक, सहकारी संस्था (Deputy Registrar Co-operative Society)
  • इ. व यांसारखी महत्वाची पदे MPSC द्वारे भरण्यात येतात.

mpsc exams

MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी पात्रता

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. वयोमर्यादा : उमेदवार हा कमीत कमी १९ व जास्तीत जास्त ३८ वर्षाचा असावा. (शासनाने वेळो वेळी जाहीर केलेल्या निर्णयानुसार वयोमर्यादे मध्ये सवलती लागू आहे.)
    • खुला प्रवर्ग/अमागास (Open/General Category) उमेदवारांकरिता वयोमर्यादा: ३८ वर्षे
    • इ.मा.व. (O.B.C.) उमेदवारांकरिता वयोमर्यादा: ४३ वर्षे
    • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांकरिता वयोमर्यादा : ४३ वर्षे
    • दिव्यांग उमेदवार (Persons with Disability) : ४५ वर्षे
    • प्राविण्य प्राप्त खेळाडू (Qualified Players): ४३ वर्षे
    • माजी सैनिक (Ex-Servicemen) : ४८ वर्षे
  3. शैक्षणीक पात्रता:
    • उमेदवाराने आपले पदवीचे किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले असावे.
    • पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा हि परीक्षा देऊ शकतात.
    • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
    • काही पदांकरिता(सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक संचालक, वित्त व लेख विभाग इ.) उमेदवारांना विशिष्ट विषयांचे ज्ञान किंवा कौशल्य असणे आवश्यक आहे.
    • पोलीस उप-अधीक्षक (DySP), पोलीस उप-निरीक्षक (PSI), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant RTO) इ.पदांकरिता शारीरिक अहर्ता गरजेची आहे.

MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप

  • एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 3 टप्प्यांमधून घेतली जाते. ते 3 टप्पे खालीलप्रमाणे
    1. पूर्व परीक्षा / Prelims Exam (४०० गुण)
    2. मुख्य परीक्षा / Mains Exam (१७५० गुण)
    3. मुलाखत / Interview (२७५ गुण)
  • पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सिमित करण्यासाठी घेण्यात येते. याकरीता पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येते.
  • पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत.
  • मुख्य परीक्षेकरिता आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात. जाहिरात/ अधिसूचनेतील तरतुदीनुसार विहित अटींची पूर्तता करणा-या व मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणा-या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते.

१) एमपीएससी पूर्व परीक्षा

पूर्व परीक्षेमध्ये २ पेपर्स असून पहिला पेपर सामान्य अध्ययन तर दुसरा पेपर सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (CSAT) विषयाचा असतो. मुख्य परीक्षेत पात्र होण्यासाठी केवळ पेपर क्र. १ मधील गुण विचारात घेतले जातात. पेपर क्र. २ हा केवळ अहर्ताधारी स्वरूपाचा आहे.

पेपर्स

प्रश्न

गुण

परीक्षेचा स्तर

भाषा

परीक्षेचा कालावधी

परीक्षेचे स्वरूप

पेपर 1

100

200

पदवी स्तर

मराठी आणि इंग्रजी

2 तास

बहुपर्यायी

पेपर 2

80

200

घटक (1) to (5) पदवी स्तर
घटक (6) दहावी स्तर
घटक (7) दहावी किंवा बारावी स्तर

मराठी आणि इंग्रजी

2 तास

बहुपर्यायी

  • सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३% गुण मिळविणे आवश्यक असते. या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येते.
  • उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे ०.५ किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.
  • राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता प्रश्नपत्रिका क्रमांक २ मधील Decision making and problem solving या घटकाकरीता नकारात्मक गुणांकन लागू नसते.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता ०.५ किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.

२) एमपीएससी मुख्य परीक्षा

  • MPSC मुख्य परीक्षा २०२३ मध्ये एकूण ९ पेपर असतील.
  • एकूण गुण : १७५०
  • पेपर १ आणि पेपर २ किमान २५% गुणांसह पात्र होणे अनिवार्य आहे.
  • उमेदवार मुख्य परीक्षेसाठी प्रत्येकी २५० गुणांसह २ पर्यायी विषय निवडू शकतात.
  • १. पेपर क्रमांक ३ ते ७ साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी मध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
  • २. वैकल्पिक विषयांतील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून म्हणजेच एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील.

पेपर क्रमांक

विषय

गुण

दर्जा

माध्यम

वेळ

पात्रता/अनिवार्य

स्वरूप

पेपर I

मराठी

300

मॅट्रिक

मराठी

3 तास

(25%

गुणांसह पात्रता)

पारंपारिक/वर्णनात्मक

पेपर 2

इंग्रजी

300

मॅट्रिक

इंग्रजी

3 तास

गुणवत्तेसाठी मोजण्यात येणारे पेपर

पेपर 3

निबंध

250

पदवी

मराठी/इंग्रजी

3 तास

अनिवार्य

पारंपारिक/वर्णनात्मक

पेपर 4

सामान्य अध्ययन

250

पदवी

मराठी/इंग्रजी

3 तास

पेपर 5

सामान्य अध्ययन

250

पदवी

मराठी/इंग्रजी

3 तास

पेपर 6

सामान्य अध्ययन

250

पदवी

मराठी/इंग्रजी

3 तास

पेपर 7

सामान्य अध्ययन

250

पदवी

मराठी/इंग्रजी

3 तास

पेपर 8

ऐच्छिक विषय पेपर- I

250

पदवी

मराठी/इंग्रजी

3 तास

पेपर 9

ऐच्छिक विषय पेपर- II

250

पदवी

मराठी/इंग्रजी

3 तास

MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

एमपीएससी पूर्व परीक्षा

पेपर क्र. १: सामान्य अध्ययन (GS) अभ्यासक्रम (एकूण गुण – २००)
  1. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
  2. भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ (महाराष्ट्राच्या भारांशासह)
  3. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
  4. महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी
  5. आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी
  6. सामान्य विज्ञान
  7. पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे इ. वरील सर्वसाधारण प्रश्न (याला विषय विशेषज्ञांची गरज नाही)
पेपर २ : CSAT अभ्यासक्रम (एकूण गुण – २००)
  1. आकलन क्षमता
  2. संवाद आणि आंतर-कौशल्ये
  3. तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता
  4. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
  5. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न इत्यादी
  6. मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज इत्यादी
  7. मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन

एमपीएससी मुख्य परीक्षा

पेपर क्र. १ : मराठी भाषेचा अहर्ताकारी पेपर (एकूण गुण – ३००)

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे.

प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेल:-
  1. दिलेल्या परिच्छेदांचे आकलन
  2. संक्षिप्त लेखन
  3. परिपाठ आणि शब्दसंग्रह
  4. लघु निबंध
  5. इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेत अनुवाद.
  6. हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.
पेपर क्र. २ : इंग्रजी भाषेचा अहर्ताकारी पेपर (एकूण गुण – ३००)

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे.

प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेल:-
  1. दिलेल्या परिच्छेदांचे आकलन
  2. संक्षिप्त लेखन
  3. परिपाठ आणि शब्दसंग्रह
  4. लघु निबंध
पेपर क्र. ३ : निबंध (एकूण गुण – २५०)

उमेदवारांनी विविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त मांडणी करणे आवश्यक आहे.

पेपर क्र. ४ : सामान्य अध्ययन १ (एकूण गुण – २५०)
भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या भारांशासह
  1. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील.
  2. महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान.
  3. आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या.
  4. स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान.
  5. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना.
  6. जगाच्या इतिहासामध्ये १८ व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील.
  7. भारतीय समाजाची ठळक वैशिष्टे आणि भारताची विविधता.
  8. महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्रय व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण
  9. यांचेशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना.
  10. जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम.
  11. सामाजिक सबलीकरण, जातीयवाद प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता
  12. जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्टे,
  13. जागतिक प्रमुख नैसगिक साधनसंपत्तीचे वितरण, (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह)। जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतासह),
  14. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रिय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्टे आणि त्यांचे स्थान. महत्वाची भौगोलिक वैशिष्टे (जलाशये आणि हिमनग यांसह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम.
पेपर क्र. ५ : सामान्य अध्ययन २ (एकूण गुण – २५०)
प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह
  1. भारतीय संविधान- ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्टे, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना.
  2. संघ व राज्ये यांची कार्य व जबाबदाऱ्या संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने.
  3. विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था.
  4. भारतीय सांविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना. संसद व राज्य विधानमंडळे- संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विशेषाधिकार आणि यांपासून उद्भवणारे प्रश्न.
  5. कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्ये, सरकारची मंत्रालये व विभाग, दबाव गट आणि औपचारिक/अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका. स्थानिक स्वराज्य संस्था.
  6. लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्टे..
  7. विविध सांविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध सांविधानिक मंडळाचे अधिकार कार्य व जबाबदाऱ्या.
  8. वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे.
  9. विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या.
  10. विकास प्रक्रिया व विकास उद्योग अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था. संस्थात्मक व इतर हित संबंधित व्यक्ती यांच्या भूमिका.
  11. समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे.
  12. आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र/ सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न.
  13. दारिद्रय व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न.
  14. प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई-प्रशासन:- उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा, व क्षमता यांबाबतचे महत्त्वाचे पैलू नागरिकांची सनद पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना.
  15. नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका.
  16. भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध.
  17. द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि / किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामें
  18. विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम,
  19. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना व जनादेश.
पेपर क्र. ७ : सामान्य अध्ययन ४ (एकूण गुण – २५०)
नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता.

या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणान्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास (केस स्टडी) याचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल.

  1. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखताः मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण नीतिशास्त्र - खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील, मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांपासून धडे. मूल्ये रुजविण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका.
  2. अभिवृत्ती: घटक, संरचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा.
  3. नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती.
  4. भावनिक बुद्धांक संकल्पना आणि त्याची उपयोगीता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन.
  5. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
  6. लोक प्रशासनातील सार्वजनिक/ नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकताः स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिता आणि कोंडी: नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे नियम, विनियम व सदसदविवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण: आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या; निगम प्रशासन,
  7. प्रशासनातील सभ्यता: लोकसेवेची संकल्पना, प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाण-घेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता. माहितीचा अधिकार, नोतिहिता आचारसंहिता नागरिकांची सनद कार्यसंस्कृती सेवाप्रदानाचा दर्जा सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने
  8. वरील समस्यांवरील घटना अभ्यास.
पेपर क्र. ८ आणि ९ : वैकल्पिक पेपर क्र १ आणि पेपर क्र. २ ( प्रत्येक पेपरसाठी गुण २५०)
उमेदवारास वैकल्पिक विषयांमधून १ विषय निवडून त्यावर आधारित पेपर क्र. ८ आणि ९ देता येतील.
  1. Agriculture (कृषी)
  2. Botany (वनस्पतीशास्त्र)
  3. Commerce and Accountancy (वाणिज्य व लेखा)
  4. Geography (भुगोल)
  5. Law (विधी)
  6. Mechanical Engineering (यांत्रिकी अभियांत्रिकी)
  7. Physics (भौतिकशास्त्र)
  8. Public Administration (लोकप्रशासन)
  9. Zoology (प्राणीशास्त्र)
  10. Animal Husbandry and Veterinary Science (पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान)
  11. Chemistry (रसायनशास्त्र)
  12. Economics (अर्थशास्त्र)
  13. Geology (भूविज्ञान)
  14. Management (व्यवस्थापन)
  15. Medical Science (वैद्यकीय विज्ञान)
  16. Anthropology (मानववंशशास्त्र)
  17. Civil Engineering (स्थापत्य अभियांत्रिकी)
  18. Electrical Engineering (विद्युत अभियांत्रिकी)
  19. History (इतिहास)
  20. Mathematics (गणित)
  21. Philosophy (तत्वज्ञान)
  22. Political Science and International Relations (राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध)
  23. Psychology (मानसशास्त्र)
  24. Sociology (समाजशास्त्र)
  25. Marathi Literature (मराठी वाड:मय)
  26. Statistics (सांख्यिकीशास्त्र)
mpsc exams

MPSC राज्यसेवा पदांचे वेतन व भत्ते

पद

वेतन श्रेणी

Deputy Collector / उपजिल्हाधिकारी

56100-177500

Deputy Superintendent of Police (DySP) / पोलिस उपअधीक्षक

56100-177500

Assistant Commissioner Sales Tax / सहाय्यक आयुक्त विक्रीकर

56100-177500

उपनिबंधक सहकारी संस्था

56100-177500

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

56100-177500

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क

56100-177500

वित्त, लेखापरीक्षण आणि लेखा सेवा गट अ

56100-177500

मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद गट अ

56100-177500

गट विकास अधिकारी (BDO) गट अ

41800-132300

तहसीलदार

55100-175500

गट विकास अधिकारी (BDO) गट ब

41800-132300

मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषद गट ब

41800-132300

मंत्रालयाचे विभाग अधिकारी

47600-151100

उपनिबंधक सहकारी संस्था

41800-132300

भूमी अभिलेख तालुका निरीक्षक

41800-132300

उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क

41800-132300

वित्त, लेखापरीक्षण आणि लेखा सेवा गट ब

41800-132300

/ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO)

41800-132300

नायब तहसीलदार

38600-122800

इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे.
  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता

MPSC राज्यसेवा परीक्षांचे वेळापत्रक

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२३
जाहिरात : फेब्रुवारी २०२३
पूर्व परीक्षा : ४ जून २०२३
पूर्व परीक्षेचा निकाल (अंदाजित) : जुलै २०२३
राज्यसेवा मुख्य परीक्षा :
  • ३० सप्टेंबर २०२३ निबंध (मराठी / इंग्रजी)
  • १ ऑक्टोबर २०२३ : भाषा पेपर १ आणि भाषा पेपर २
  • ७ ओक्टोबर २०२३ : सामान्य अध्ययन पेपर १ आणि पेपर २
  • ८ ऑक्टोबर २०२३ : सामान्य अध्ययन पेपर ३ आणि ४
  • ९ ऑक्टोबर २०२३ : वैकल्पिक विषय पेपर क्र. १ आणि २

MPSC राज्यसेवा परीक्षांचे निकाल

mpsc exams

Thane Office

contact us

Reliable Academy, 1st Floor, Thakur Nivas, Above Tip Top Mithaiwala, Opposite Thane Railway Station, Thane (W) - 400601, Maharashtra, India.


Connect With Us

Instagram | Reliable Academy Facebook | Reliable Academy YouTube | Reliable Academy Telegram | Reliable Academy


Our Resources

the hindu
press information bureau
the indian express
loksatta
my gov
aaple sarkar

Online & Offline Courses Enquiry

Call For Counselling

9222 333 999


Our Resources

the hindu
press information bureau
the indian express
loksatta
my gov
aaple sarkar

Copyright - 2024. Reliable Academy Pvt. Ltd.   |   All rights reserved.

Instagram | Reliable Academy Telegram | Reliable Academy Youtube | Reliable Academy Whatsapp | Reliable Academy Facebook | Reliable Academy Invite a friend
Online & Offline Courses Enquiry

Call For Counselling

9222 333 999