अर्थशास्त्र प्रश्नमंजुषा ०४


काळी क्रांती (Black Revolution) ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

अ) खनिज तेल

ब) अन्नधान्य

क) कडधान्य

ड) जनावरे

Show Answer

योग्य जोड्या जुळवा.

गट ‘अ’                                        गट ‘ब’

१) प्रच्छन्न बेरोजगारी                 i) गरजेपेक्षा जास्त लोक एकच काम करतात.

२) हंगामी बेरोजगारी                ii) निवडक कालावधीतच रोजगार

३) चक्रीय बेरोजगारी                iii) मंदीची परिस्थिती

४) संरचनात्मक बेरोजगारी        iv) उत्पादनक्षमतेचा अभाव

अ) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

ब) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

क) १-i, २-iii, ३-ii, ४-iv

ड) १-iv, २-ii, ३-i, ४-iii

Show Answer

‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ ही महाराष्ट्रात शिखर बँक म्हणून कार्ये करते. तिचे प्रादेशिक कार्यालय खालीलपैकी कोठे आहे?

अ) औरंगाबाद

ब) पुणे

क) लातूर

ड) अहमदनगर

Show Answer

संतुलित विकास म्हणजे खालीलपैकी कोणत्या घटकाचा विकास होय?

अ) खाजगी

ब) सार्वजनिक

क) खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समान विकास

ड) कृषी

Show Answer

‘वस्तू व सेवांच्या किंमती बाजारात मागणी व पुरवठा यांच्या परस्पर संयोगाने ठरतात. अशा अर्थव्यवस्थेस काय म्हणतात?

अ) ग्राहक अर्थव्यवस्था

ब) किंमत-पुरवठा अर्थव्यवस्था

क) बाजार अर्थव्यवस्था

ड) लोकशाही अर्थव्यवस्था

Show Answer

ज्या अर्थव्यवस्थेत किंमत ठरण्याची प्रक्रिया सरकारी हस्तक्षेप विरहीत असते अशा अर्थव्यवस्थेस काय म्हणतात?

अ) लेझेस फेयर

ब) सेंट्रल अॅटोनॉमी

क) सेकंडरी अर्थव्यवस्था

ड) अनकंट्रोल्ड फेयर

Show Answer

खालील विधाने लक्षात घ्या.

१) सार्वजनिक क्षेत्रावर सरकारी मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असते.

२) वैयक्तिक लाभ मिळवणे हे खाजगी क्षेत्राचे उद्दिष्ट असते.

३) भांडवलशाहीचे बदलेले स्वरूप म्हणजेच सहकार क्षेत्र होय.

वरीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ) फक्त १

ब) १ व २

क) फक्त ३

ड) १, २, ३

Show Answer

अनुसूचीत बँक म्हणजे ............

अ) ज्या बँकेचा आरबीआय कायदा १९३४ च्या तिसऱ्या अनुसूचित समावेश आहे अशी बँक

ब) ज्या बँकेने स्थापना करतेवेळी १०० कोटींपेक्षा जास्त भांडवलाची गुंतवणूक केली अशी बँक

क) आरबीआयने ज्या बँकेसअधिकृत बँकिंग व्यवहाराचा परवाना दिला ती बँक

ड) आरबीआय कायदा १९८४ च्या दुसऱ्या अनुसूचित समावेश असलेली बँक

Show Answer

खालील विधाने लक्षात घ्या.

१) तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला सी.एम. त्रिवेदी आणि अशोक मेहता असे दोन उपाध्यक्ष लाभले होते.

२) तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.

वरीलपैकी अयोग्य विधान ओळखा?

अ) फक्त १

ब) फक्त २

क) १ व २

ड) वरीलपैकी नाही

Show Answer

हरित जी.एन.पी. संबंधी योग्य विधान निवडा.

अ) हरित जी.एन.पी. म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपदेचा ऱ्हास न होता साध्य झालेला विकास

ब) यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे.

क) या क्रमवारीत शेवटच्या स्थानावर भारत आहे.

ड) अ व ब दोन्ही बरोबर

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.