राज्यशास्त्र प्रश्नमंजुषा ०४


भारत हे .धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. कारण ......

अ) भारत हा समाजवादी देश आहे.

ब) भारतात असंख्य धर्म आहेत.

क) भारतात सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक आहे.

ड) भारतात धर्माला महत्त्व दिले जात नाही.

Show Answer

खालील विधाने लक्षात घ्या.

१) वृत्तपत्र स्वातंत्र्यासंदर्भात घटनेत स्वतंत्र तरतूद नाही.

२) कलम १९ मध्येच वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश केला जातो.

३) वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मुलभूत हक्कच आहे.

४) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा निरंकुश आहे.

वरीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ) १, २, ३

ब) २, ३, ४

क) १, ३, ४

ड) १, २, ४

Show Answer

राज्याच्या मार्गदर्शक तत्व खालीलपैकी कशाचा समावेश होतो?

१) समान न्याय व मोफत कायदेशीर मदत

२) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पालन

३) ऐतिहासिक वास्तूंचे जतन

४) समान नागरी कायदा

अ) फक्त ४

ब) १, २, ३

क) २, ३, ४

ड) १, २, ३, ४

Show Answer

सरकारिया आयोग कशाकरिता स्थापन करण्यात आला होता?

अ) पाणी वाटपाबाबत

ब) केंद्र-राज्य संबंधाबाबत

क) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत

ड) १९८४ च्या दिल्लीतील दंग्यांची चौकशी करण्याबाबत

Show Answer

जनमत हा कोणत्या प्रकारच्या शासनव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे?

अ) अप्रत्यक्ष लोकशाही

ब) नियंत्रित लोकशाही

क) अनियंत्रित लोकशाही

ड) प्रत्यक्ष लोकशाही

Show Answer

खालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा नाही?

अ) निवडणूक आयोग

ब) नियोजन आयोग

क) वित्त आयोग

ड) राज्य लोकसेवा आयोग

Show Answer

खालीलपैकी कोण मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष असतो?

अ) संसदेचा सदस्य

ब) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश

क) सरन्यायाधीश

ड) सामाजिक कार्यकर्ता

Show Answer

राज्यघटनेमध्ये भारतीय संघराज्याचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे?

अ) हिंदुस्थान

ब) इंडिया किंवा हिंदुस्थान

क) इंडिया किंवा भारत

ड) भारत किंवा हिंदुस्थान

Show Answer

उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठीचा ठराव कोठे मांडावा लागतो?

अ) फक्त लोकसभा

ब) फक्त राज्यसभा

क) संयुक्त अधिवेशनात

ड) कोणत्याही सभागृहात

Show Answer

आर्कियालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था कोणत्या मंत्रालयातर्गत काम करते?

अ) सांस्कृतिक मंत्रालय

ब) पर्यावरण मंत्रालय

क) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

ड) वरीलपैकी नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.