इतिहास  प्रश्नमंजुषा ०३


जपानने 1905 साली ----------- वर मिळविलेल्या विजयाने हिंदी समाजाच्या नेत्यांत आत्मविश्वास वाढला व हिंदी समाजही युरोपियनांवर मात करू शकेल ही त्यांची भावना वाढीस लागली.

अ) अमेरिका

ब) रशिया

क) इजिप्त

ड) इटली

Show Answer

-------------- यांना फासावर लटकवण्यात आले, त्यावेळी त्यांच्या मातेने वीरमातेस शोभणारे उद्गार काढले, "मातृभूमीच्या चरणी आपले प्राण अर्पण करणाऱ्या एका स्वातंत्र्ययोध्यास मी जन्म दिला याचा मला मोठा अभिमान वाटतो! खरे म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मुलावर देशाचाच अधिक हक्क आहे. माझ्या मुला, उदात्त ध्येयासाठी तू हौतात्म्य पत्करले आहेस आणि म्हणूनच मला दु:ख करण्याचे काही कारण नाही"

अ) भगतसिंग

ब) रामप्रसाद बिस्मिल्ला

क) खुदिराम बोस

ड) राजगुरू

Show Answer

1919 च्या माँटेग्यू चेम्स्फर्ड सुधारणा कायद्याचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सायमन कमिशनच्या अहवालात पुढीलपैकी कुठल्या बाबींचा समावेश करता येणार नाही ?

1) एकंदर लोखसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मताधिकार मिळाला. जातीय मतदार संघ व राखीव संघ असेच चालू राहावेत.

2) हिंदुस्थानपासून ब्रम्हदेश वेगळा करावा. मुंबई प्रांतापासून सिंधप्रदेश वेगळा करावा.

3) राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था यांची अंतिम जबाबदारी सरकारवर असल्यामुळे गव्हर्नराकडे खास अधिकार असावेत.

4) प्रांतामध्ये द्विदल राज्यपद्धती लागू करण्यात आली.

अ) 1, 2 व 4

ब) 2, 3 व 4

क) 1, 2 व 3

ड) वरील सर्व योग्य

Show Answer

मराठी लोकांचे राजकीय नेतृत्व करण्यासाठी कायमस्वरूपी एखाद्या राजकीय संघटनेची गरज निर्माण झाल्यावर 1937 मध्ये महाराष्ट्र परिषद स्थापन झाली.

या संघटनेच्या वेळी खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?

1) रा. गो. परांजपे

2) माणिकचंद पहाडे

3) वामनराव नाईक

4) गोविंदभाई श्रॉफ

5) दिगंबरराव बिंदू

अ) 1, 2, 4, 5

ब) 2, 3, 4, 5

क) 1, 3, 4, 5

ड) यापैकी नाही

Show Answer

अस्पृश्य लोकांना लष्कर व पोलिस खात्यात नोकऱ्या मिळाव्यात व त्यांच्या मुलाचे शिक्षण सरकारने करावे यासाठी शाळा व वाचनालय सुरु करण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये 1904 मध्ये ---------- यांनी श्री शंकर प्रासादीक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली.

अ) गोपाळबाबा वलंगकर

ब) वि. रा. शिंदे

क) किसन फागुजी बंदसोडे

ड) शिवराम जानबा कांबळे

Show Answer

काँग्रेसचे राजगोपालचारी यांनी कोणत्या दोन संघटनांना एकत्र आणण्यासाठी योजना सदर केली?

अ) काँग्रेस व मुस्लीम लिग

ब) काँग्रेस व स्वराज्य पक्ष

क) मुस्लीम लिग व हिंदू महासभा

ड) काँग्रेस व हिंदू महासभा

Show Answer

‘बालहत्या प्रतिबंधगृहा’ची स्थापना कोणी केली?

अ) पंडिता रमाबाई

ब) रमाबाई रानडे

क) महात्मा फुले

ड) राजर्षी शाहू

Show Answer

आदीवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते विधान अयोग्य आहे?

१) शामराव गोदावरी परुळेकर यांनी वारळीच्या उन्नतीसाठी बरेच परिश्रम घेतले.

२) बाळासाहेब खेर यांनी आपले कार्य हिंदू सेना समाजाची स्थापना करून सुरु केले.

३) ताराबाई मोडक यांनी ठाणे जिल्ह्यात कोसबाड येथे काम केले.

४) अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेतली.

Show Answer

गांधी कालखंडात काँग्रेसने संमत केलेले ठराव कोणकोणते आहेत?

१) संपूर्ण स्वराज्य

२) नियोजित अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा

३)साम्राज्यवाद विरोधी ठराव

४) वसाहतीचे स्वराज्य

अ) १, २, ३ योग्य

ब) २, ३ ४ योग्य

क) १, २ योग्य

ड) वरील सर्व योग्य

Show Answer

‘जंगल बचाव-मानव बचाव’ हे आंदोलन कोणी सुरु केले?

अ) सुखदेव बाबुराव उईके

ब) बाबुराव मडावी

क) काळूराम दोथडे

ड) ठक्करी बाप्पा

Show Answer

Top