भूगोल प्रश्नमंजुषा ०२


जर जागतिक तापमान 2o सेल्सिअस वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे?

1) वार्षिक पूर

2) कीटकांमुळे होणारे आजार, जसे मलेरिया

3) शेती विभागात बदल

4) प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील.

अ) 1, 2, 3, 4,

ब) 1, 2, 3,

क) 2, 3, 4,

ड) फक्त 4

Show Answer

खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही ?

अ) येथे हिवाळा नसतो

ब) दुपारी पाऊस पडतो

क) वर्षभर सारखेच तापमान असते

ड) प्रतीरोध पर्जन्य

Show Answer

खालील विधाने विचारात घेऊन अयोग्य विधानांची निवड करा.

1) भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे.

2) एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक आहे.

3) तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मुदा 2 वर्गवारीत मोडते : जुनी - बांगर आणि नवी - खादर

4) खादर मृदा बांगर पेक्षा अधिक सुपीक असते.

5) गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटॅश, फोस्फोरिक अॅसिड व लाइम असते.

अ) 3

ब) 4

क) 5

ड) एकही नाही

Show Answer

पृथ्वीच्या अंतर्गत भागात वेगेवेगळे गुणधर्म असलेले तीन विभागात ओळखले गेले. उदा. कवच, प्रावरण व गाभा

1) सीयाल व सायमा यांच्यामधील घनतेत बदल होणाऱ्या क्षेत्रास कॉनरॉड विलगता म्हणून ओळखले जाते.

2) भूकंप लहरींच्या गतीमध्ये अचानक बदल होणाऱ्या क्षेत्रास मोह विलगता म्हणून ओळखले जाते.

3) प्रावरण - गाभा सीमारेषा ही गटेनबर्ग विलगतेने ठरविली जाते.

वरील विधानांपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत ?

अ) 1 फक्त

ब) 2 आणि 3

क) 1 आणि 3

ड) 1, 2 आणि 3

Show Answer

पश्चिमी किनारी प्रदेशांत नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे ?

अ) आयताकार

ब) समांतर

क) जाळीसदृश्य

ड) वरीलपैकी एकही नाही

Show Answer

खालीलपैकी आदिवासी जमात व राज्य यांची चुकीची जोडी ओळखा.

अ) अंगामी - नागालँड

ब) कोटा - निलगिरी पर्वत तामीळनाडू

क) मुंडा - झारखंड

ड) भुतिया - उत्तरप्रदेश

Show Answer

पुढील विधानांचा विचार करा.

1) उष्ण कटिबंधीय सदाहरी वने : एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे, उदा. शिसव

2) उष्ण कटिबंधीय सादापर्णी वने : झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ, उदा. साग

अ) फक्त 1 बरोबर

ब) फक्त 2 बरोबर

क) 1 व 2 दोन्ही बरोबर

ड) 1 व 2 दोन्ही चूक

Show Answer

खालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतुपरत्वे सौरऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात ?

1) पृथ्वीच्या आसाचा कललेला पणा

2) दिवस व रात्र प्रमाण

3) ढगांचे प्रमाण

4) सूर्य किरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन

 

अ) 1 व 2

ब) 2 व 3

क) 3 व 4

ड) वरील सर्व

Show Answer

पुढील वाक्य योग्यरित्या पूर्ण करावे.

गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्या अंतर्गत असलेला भूभाग --------------------------

अ) दक्षिण अमेरिका, आफ्रीका, युरोप,

ब) भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका

क) उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया

ड) भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तरअमेरिका, दक्षिण अमेरिका,

Show Answer

पहाटे 3.00 वाजता लंडन येथून प्रसारीत होणारी बातमी अलाहाबाद (82o30' पूर्व रेखावृत्त) येथे किती वाजता ऐकायला येईल ?

अ) रात्री 8.30 वाजता

ब) सकाळी 9.30 वाजता

क) सकाळी 7.30 वाजता

ड) सकाळी 8.30 वाजता

Show Answer

Top