अर्थशास्त्र प्रश्नमंजुषा ०२


खालील विधानापैकी योग्य विधानांची निवड करा.

1) जेव्हा उत्पादक आपल्यावरील कर उत्पादन घटकावर ढकलतो. त्याला अप्रत्यक्षकराचे प्रतिगामी कर संक्रमण असे म्हणतात.

2) जेव्हा उत्पादक किंवा विक्रेता आपल्यावरील कर ग्राहकावर ढकलतो. तेव्हा त्याला अग्रगामी कर संक्रमण असे म्हणतात.

 

अ) 1 बरोबर

ब) 2 बरोबर

क) दोन्ही बरोबर

ड) दोन्ही चुक

Show Answer

अमर्त्यसेन आणि गाऊलेट डी. यांनी वर्णन केलेली विकासाची मुल्ये कोणती ? खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा.

अ) उपजीविका, स्वत:बद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार / हक्क

ब) आरोग्य, भरणपोषण, शिक्षण, अधिकार / हक्क

क) अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता

ड) राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दरडोई उत्पन्न, मूलभूत गरजा, स्वातंत्र्य, शिक्षण

Show Answer

खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दिष्ट्ये आहेत ?

1) महत्तम उत्पादन

2) संतुलित विकास

3) देश आत्मनिर्भर

4) आर्थिक उदारीकरण

अ) 1, 2, 3

ब) 1, 2

क) 2, 3

ड) 1, 2, 3, 4

Show Answer

महानोबीस यांनी तयार केलेल्या व्युव्हरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला ?

1) सार्वजनिक क्षेत्र

2) मूलभूत उद्योग क्षेत्र

3) आयात-प्रतिस्थापन उद्योग

4) लघु व कुटीर उद्योग

अ) 1, 3

ब) 2, 4

क) 3, 4

ड) 1, 2, 3, 4

Show Answer

2011 च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशांतील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवीत आहे?

अ)1/2

ब) 1/3

क) 1/4

ड) 1/5

Show Answer

भूविकास बँकेसंबंधी अचूक पर्यायाची निवड करा.

1) भारतातील पहिली सहकारी तत्वावरील भूविकास बँक 1920 रोजी पंजाबमध्ये झांब येथे स्थापन झाली.

2) भारतात संधानुवर्ती व एकात्मिक अशा दोन प्रकारच्या भू-विकास बँका दिसतात.

3) या बँकेद्वारे लघु मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो.

4) कर्ज परतफेडीची मुदत 15 ते 30 वर्ष अशी प्रदीर्घ असते.

अ) 1, 2, 4,

ब) 2, 3, 4,

क) 1, 2,

ड) 3, 4, 1

Show Answer

खालील विधानांपैकी अचूक पर्यायांची निवड करा.

1) भारतातील पहिला रोखे बाजार मुंबई येथे फेब्रुवारी 1988 मध्ये स्थापन झाला.

2) रोखे बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दि बॉम्बे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस कंट्रोल अॅक्ट 1925 ला पास करण्यात आला

3) राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना 27 नोव्हेंबर 1992 मध्ये करण्यात आली.

अ) 1 व 3 बरोबर

ब) 2 व 3 बरोबर

क) 1 व 2 बरोबर

ड) वरील सर्व बरोबर

Show Answer

सामाजिक बँक सुविधा यांचा अर्थ ---------------

अ) ग्रामीण भागासाठी बँक सुविधा

ब) सरकारला अर्थसहाय्य करणे

क) दारिद्र्य निर्मुलन कार्यक्रमांसाठी अर्थ सहाय्य करणे.

ड) सामाजिक प्रकल्पांना अर्थसहाय्य करणे

Show Answer

'जवाहर ग्रामसमृद्धी योजना' आणि 'आश्वासक रोजगार योजना खालीलपैकी कोणत्या एका योजनेत विलीन केल्या गेल्या ?

अ) जवाहर रोजगार योजना

ब) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

क) स्वर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजना

ड) राष्ट्रीय रोजगार हमी योजना

Show Answer

खालीलपैकी कशास 'नॅरो मनी' ही संज्ञा देता येईल ?

अ) लोकांजवळ असलेली रोख रक्कम + त्वरित रोखता प्राप्त ठेवी

ब) लोकांकडील रोख रक्कम + दागदागिने व अन्य मालमत्ता

क) लोकांच्या बचत ठेवी + दीर्घ मुदतीच्या ठेवी

ड) लोकांकडील विविध मुदतीच्या ठेवी + रोखे

Show Answer

Top