इतिहास प्रश्नमंजुषा ०२


मौर्य काळात सम्राट अशोकाविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

1) राज्याच्या गादीवर येण्याअगोदर अशोक ग्वाल्हेर व विदिशा येथे व्हॉ होता.

2) अशोकाला 'देवानाम' आणि 'पीयदस्सी' असे म्हणत असत.

3) अशोकाच्या प्रशासकीय सुधारणांतून सत्तेचे विकेंद्रीकरण साध्य झाले

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

अ) 1 आणि 2

ब) फक्त 2

क) फक्त 1

ड) 2 आणि 3

Show Answer

दक्षिण भारतातील राज्य व राजधान्या यांच्या योग्य जोड्या जुळवा.

गट 'अ'               गट 'ब'

A) राष्ट्रकुट         1) मान्यखेत

B) गडवाल        2) कनौज

C) पाल             3) मुंगेर

D) वाकाटक     4) नंदिवर्धन

अ) A - 1, B - 3, C - 2, D - 4

ब) A - 1, B - 2, C - 3, D - 4

क) A - 4, B - 3, C - 2, D - 1

ड) A - 1, B - 3, C - 4, D - 2

Show Answer

खालील विधानांपैकी चुकीची पर्यायांची निवड करा.

1) कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्की गुलाम होता.

2) चौगन हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.

अ) फक्त 1

ब) फक्त

क) वरीलपैकी दोन्ही

ड) यापैकी नाही

Show Answer

'वाकाटक घराण्यांसंबंधीत' पुढील विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा.

1) ज्या काळात गुप्त साम्राज्याचा उदय उत्तर भारतात झाला त्याचकाळात उत्तरेस वाकाटक घराण्याची शक्तिशाली सत्ता उदयास आली.

2) विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्यातील पहिला राजा असून तो वाकाटक घराण्याचा संस्थापक मानला जातो.

3) विंध्यशक्तीनंतर त्याचा पुत्र गौतमीपुत्र हा वाकाटकांचा राजा झाला.

अ) फक्त 1 व 2

ब) फक्त 2 व 3

क) फक्त 2

ड) वरील सर्व

Show Answer

खालील विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा.

1) 'अष्टाध्यायी' या ग्रंथाची रचना पणिनीने केलेली असून प्राचीन भारतीय भाषा ज्ञान आणि शिक्षण पद्धतीची माहिती या ग्रंथावरूनच आपणास मिळते.

2) 'नितीसार' या ग्रंथाची रचना कालीदासने केली. नितीसार हा ग्रंथ कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथावर आधारित आहे.

अ) फक्त 1

ब) फक्त 2

क) दोन्ही बरोबर

ड) दोन्ही चूक

Show Answer

पुढील विधाने विचारात घेऊन अचूक विधानांची निवड करा.

1) अकबरचा पोर्तुगीजांना विरोध होता कारण त्यांनी दख्खनी राज्यांसोबत तह केले होते.

2) 1601 साली असीरगढ जिंकल्यानंतर अकबराने खानदेशाचे नामकरण रहमतदेश असे केले.

3) 'अकबरनामा' हा ग्रंथ बदायुनी याने लिहिला.

4) अकबरावर हिंदू तत्त्वज्ञानातील कर्म व आत्म्याचे निर्गमन या संकल्पनांचा सर्वाधिक प्रभाव पडला.

अ) 1, 2 व 3

ब) 2, 3 व 4

क) 1 व 4

ड) 1 व 3

Show Answer

1717 साली ........... नावाच्या एका इंग्रज डॉक्टराने मोगल बादशहा फरुख सियर याला आजारातून बरे केले, तेव्हा त्याचा फायदा इंग्रज व्यापार्यांनी उठवून बंगालमध्ये जकातमुक्त व्यापार करण्याचे आणि हिंदुस्थानात व्यापारासाठी कोठेही स्थायिक होण्याचे फर्मान मिळविले.

अ) जेम्स कॉट

ब) विल्यम जॉन्स

क) विल्यम हॅमिल्टन

ड) जेम्स हॅमिल्टन

Show Answer

खालील विधानांपैकी अयोग्य विधानांची निवड करा.

1) वेलस्लीच्या कारकीर्दीतच दुसरे इंग्रज-मराठा युद्ध घडून आले.

2) यावेळी दुसरा बाजीराव पेशवेदार होता.

3) दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळेस 'वसईचा तह' घडून आला.

अ) फक्त 1, 2

ब) फक्त 2 व 3

क) वरील सर्व

ड) यापैकी नाही

Show Answer

"लक्ष्मीराणी आमची आहे, हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. इंग्लंडच्या इतिहासात तो मन अजून मिळालेला नाही" झाशीची राणी लक्ष्मीबाई बद्दल वरील उद्गार ............ यांनी काढले आहेत.

अ) वि. दा. सावरकर

ब) ह्युरोज

क) न. र. फाटक

ड) मुजुमदार

Show Answer

राष्ट्रीय सभा (काँग्रेस) च्या स्थापनेच्या संबंधीत योग्य विधानांची निवड करा.

1) राष्ट्रीय सभेच्या स्थापनेआधी अॅलन ह्यूम यांनी 1883 मध्ये 'इंडियन नॅशनल युनियन' ची स्थापना केली.

2) डिसेंबर 1885 मध्ये पुण्यास कॉलऱ्याची साथ सुरु होती. म्हणून पुण्याऐवजी मुंबईस अधिवेशन घेण्याचे ठरले.

3) अध्यक्षस्थानी कानपूरचे थोर कायदेपंडित व्योमेश्चंद्र बॅनर्जी हे होते.

4) सर्व हिंदुस्थानातून एकूण 72 प्रतिनिधी राष्ट्रसभेला पहिल्या अधिवेशनास उपस्थित होते.

अ) फक्त 1 व 2

ब) 2 व 4

क) 3 व 4

ड) 2 व 3

Show Answer

Top