इतिहास प्रश्नमंजुषा ०१


महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक ‘इंडिया हाऊस’ मध्ये राहून इंग्लंड मधून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकून भारतात आणले?

अ) वि. दा. सावरकर    
ब) पांडूरंग खानखोजे
क) सेनापती बापट
ड) मादाम भिकाई कामा

Show Answer

गो. कृ. गोखले बाबत योग्य विधाने कोणती ती निवडा.

१) डेक्कन एज्युकेशन सोसायटीत काही काळ शिक्षक

२) सार्वजनिक सभेचे काही काळ सचिव

३) भारतमंडळाचे काही काळ सदस्य

४) वेल्बी कमिशन समोर मुद्देसुद व तर्कयुक्त साक्ष

अ) १, २, ३ योग्य

ब) २, ३, ४ योग्य

क) १, २, ४ योग्य

ड) वरील सर्व योग्य

Show Answer

भारतीय उच्चायुक्ताची नेमणूक कोणत्या कायद्याने करण्यात आली?

अ) मॉन्टेग्यु – चेम्सफर्ड कायदा

ब) मोर्ले – मिंटो कायदा

क) भारत सरकारचा कायदा

ड) इंडिया पिट्स अॅक्ट

Show Answer

“एक जुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा” असा संदेश कोणी दिला?

अ) दादाभाई नौरोजी

ब) लो. टिळक

क) रविंद्रनाथ टागोर

ड) बंकिमचंद्र चटर्जी

Show Answer

योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट                 ‘ब’ गट

१) लॉर्ड बेंटींग       i) पेधाऱ्याचा बंदोबस्त

२) लॉर्ड हेस्टींग     ii) पुरातत्व कायदा

३) लॉर्ड कर्झन      iii) ठगांचा बंदोबस्त

४) लॉर्ड लिटन      iv) व्हर्नाकुलर प्रेस अॅक्ट

अ) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

ब) १-iii, २-i, ३-ii, ४-iv

क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

ड) १-iii, २-iv, ३-ii, ४-i

Show Answer

आझाद हिंद फौजेने कोणाविरुध्द युद्धाची घोषणा केली?

अ) माणुसकीचे शत्रु

ब) जपान, चीन

क) अमेरिका, रशिया, जर्मनी

ड) इंग्लंड, अमेरिका

Show Answer

योग्य विधान ओळखा. (तह व वर्ष)

पाँडेचेरी तह – १७५४

पॅरीसचा तह – १७६३

वसईचा तह – १८०२

मँगलोरचा तह – १७८४

अ) १, २, ३, ४ योग्य

ब) १, २, ३ योग्य

क) १, ४ योग्य

ड) ३, ४ योग्य

Show Answer

सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले?

अ) दिनशॉ पेटीट

ब) मोरारजी गोकुळदास

क) अबॉय नॉट

ड) सोराबजी

Show Answer

खालील पर्यायातून योग्य विधान ओळखा.

अ) सदाशिव निळकंठ जोशी यांनी बीड येथील उठावाचे नेतृत्व केले होते.

ब) १८९९ मध्ये जोशी यांनी उठाव करण्याची योजना आखली होती.

क) ही योजना फसल्या गेली व जोशी भूमिगत झाले.

ड) वरील सर्व योग्य

Show Answer

योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट                          ‘ब’ गट

१) श्यामजी कृष्ण वर्मा       i) गदर पार्टी

२) आचार्य जावडेकर        ii) इंडिया हाऊस

३) बाबू गेनू                     iii) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

४) उषा मेहता                 iv) परदेशी कापडाविरोधी चळवळीत हौतात्म्य

                                    v) गुप्त रेडिओ स्टेशन

                                    vi) भूमिगत चळवळीचे नेतृत्व

अ) १-ii, २-iii, ३-iv, ४-v

ब) १-v, २-iii, ३-iv, ४-vi

क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

ड) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

Show Answer

Top