चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६९


1) TREAD योजनेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ) TREAD चे संक्षिप्त रूप Trade Related Entrepreneur Ship Assistance & Development असे आहे.

ब) TREAD या योजनेची सुरुवात नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली.

क) ही योजना केवळ व्यापार क्षेत्रात महिलांनाच प्रशिक्षण देणे व उद्योजक बनविण्याच्या हेतूने सुरु करण्यात आली आहे.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) वरील सर्व

४) यापैकी एकही नाही

Show Answer

2) प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान नोव्हेंबर २०१६ संबंधी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत?

अ) या अभियानाची अंमलबजावणी नीती आयोग करणार आहे.

ब) यात नऊ महिन्यांची गरोदर महिला किंवा नुकतीच बाळंत झालेल्या महिलेची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.

क) यातील सहभागी महिलांना रु.३०००/- दरमहा दिले जाणार आहेत.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) फक्त क

४) वरील सर्व

Show Answer

3) सत्य विधाने निवडा.

अ) २०१६ चा अर्थशास्रातील नोबेल पुरस्कार ब्रिटिश वंशीय अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंट हॉमस्ट्रॉम यांना जाहीर झाला आहे.

ब) हार्ट आणि हॉमस्ट्रॉम यांच्या करार सिद्धांतातील संशोधनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

क) आठ दशलक्ष स्विडीश क्रोनर व पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

१) अ व क

२) फक्त अ

३) ब व क

४) वरील सर्व

Show Answer

4) स्वर्ण मुद्रा योजनेसंदर्भात खालीलपैकी काय सत्य आहे ?

अ) स्वर्ण मुद्रा योजनेत कमीतकमी ३० ग्रॅम स्वर्ण जमा केले जाऊ शकते.

ब) स्वर्ण मुद्रा योजनेचा अल्प कालावधी १ ते ३ वर्षे आहे.

क) स्वर्ण मुद्रा योजनेचा मध्यम कालावधी ५ ते ७ वर्षे आहे.

ड) स्वर्ण मुद्रा योजनेचा दीर्घ कालावधी १२ ते १५ वर्षे आहे.

१) अ आणि ब

२) अ,क आणि ड

३) क आणि ड

४) अ,ब,क आणि ड

Show Answer

५) जीएसटी विधेयकाच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा व चूक असलेले विधान ओळखा.

अ) जीएसटीला राष्ट्रपतींची ८ सप्टेंबर ला मंजुरी मिळाली.

ब) या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी ३ ऑगस्ट,२०१६ ला मिळाली.

क) या विधेयकाला लोकसभेची मंजुरी ८ ऑगस्ट, २०१६

ड) हे विधेयक लागू झाले १ जुलै, २०१७ ला.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) फक्त क

४) यापैकी एकही नाही

Show Answer

6) पंतप्रधान वय वंदना योजनेसंदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) ही योजना फक्त ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे.

ब) जेष्ठ नागरिकांना गुंतवणूकीवरवार्षिक कमीत कमी ८% दराने व्याजासह पेन्शनची रक्कम देण्यात येणार आहे.

क) या योजनेतंर्गत पॉलिसी टर्म १० वर्षापर्यंत असणार आहे.

वरील विधानापैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहेत ते ओळखा.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) फक्त अ व क

४) वरील सर्व

Show Answer

७) एम.बालमुरलीकृष्ण यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले, यांच्याबद्दल चुकीची विधान/ने शोधा.

अ) मिले सुर मेरा तुम्हारा या गीतातील तामीळ सुर बालमुरलीधर यांचा आहे.

ब) १९६७ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटात सर्वप्रथम नारदाची भूमिका त्यांनी साकारली.

क) हे कर्नाटकी संगीतातील जेष्ठ गायक होते.

१) अ व ब

२) फक्त ब

३) यापैकी नाही

४) वरील सर्व

Show Answer

8) खालील विधाने विचारात घ्या.

अ) महाराष्ट्रातील अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्या उत्तम आरोग्यासाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते.

ब) शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक, संतुलित, आहार वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी देशातील पहिले मध्यवर्ती स्वयंपाक गृह महाराष्ट्रात उभारले गेले आहे.

१) अ बरोबर ब चूक

२) ब बरोबर अ चूक

३) दोन्ही बरोबर

४) दोन्ही चूक

Show Answer

9) २०१६ च्या आंतरराष्ट्रीय मुलगी दिनाची संकल्पना काय आहे?

१) “Every Girl in Society Progress with Dignity”

२) “Girl Progress=Goal’s Progress: What Counts for Girls.”

३) “Progress of each girl is the progress of whole world”

४) Opportunity for Girl, is the Unique Challenge Girls Face Around the World.”

Show Answer

10) फिडेल कॅस्ट्रो यांच्यासंबंधी पुढील विधाने विचारात घ्या.

अ) त्यांनी १९५९ साली क्युबामध्ये कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली.

ब) त्यांनी क्युबाचे पंतप्रधान म्हणून कार्य केले आहे.

क) त्यांनी क्युबाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.

१) फक्त अ बरोबर

२) अ व क बरोबर

३) अ व ब बरोबर

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.