चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६८


1) साखारोव्ह मानवी हक्क पारितोषिक संबंधीची योग्य विधाने शोधा.

अ) सोव्हिएत शास्रज्ञ आंद्रे साखारोव्ह यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

ब) १९८८ साली या पुरस्काराची स्थापना झाली.

क) सर्वात पहिले साखारोव्ह पारितोषिक नेल्सन मंडेला आणि अनातोजी मार्चेन्को यांना विभागुन देण्यात आले होते.

ड) दरवर्षी मानवी हक्क दिन १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार देण्यात येतो.

१) फक्त अ, ब व क

२) फक्त अ,क व ड

३) फक्त अ व ब

४) वरील सर्व

Show Answer

2) गोल्डन ग्लोब पुरस्कार - २०१७ संबंधी खालील योग्य जोडया लावा.

पुरस्कार पुरस्कर्ते

1) सर्वोत्कृष्ट अभिनेता (ड्रामा)                                i ) कॅसी अफतेक

2) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ड्रामा)                                ii) इसोबल ह्युपर्ट

3) सर्वोत्कृष्ट अभिनेता (म्युझिकल)                          iii) एमा स्टोन

4) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (म्युझिकल)                          iv) रायन गॉसलिंग

   अ        ब       क     ड

1) i         ii        iii      iv

2) i         ii        iv      iii

3) iii       iv        i        ii

४) iv       iii        ii        i

Show Answer

3) जेष्ठ लेखक तसेच समीक्षक जॉन बर्जर यांचे पॅरिस येथे २ जाने, २०१७ रोजी निधन झाले, त्यांच्यासंबंधी पुढीलपैकी योग्य विधाने शोधा.

अ) १९७२ साली त्यांना जी या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार देण्यात आला होता.

ब) बीबीसी वरील नवा राजकीय दृष्टिकोन मांडणाऱ्या त्यांची वेज ऑफ सीइंगफ ही मालिका खूप प्रसिद्ध झाली होती.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) वरीलपैकी दोन्ही

४) यापैकी एकही नाही

Show Answer

4) 'हार्ट ऑफ एशिया' परिषदेविषयी पुढील विधाने विचारात घ्या.

अ) 'हार्ट ऑफ एशिया' परिषद डिसेंबर २०१६ मध्ये भारतात आयोजित केली गेली आहे.

ब) ही सहावी 'हार्ट ऑफ एशिया' मंत्रीपरिषद आहे.

क) अफगाणिस्तान या देशाला केंद्रस्थानी ठेवून सभोवतालच्या देशांनी प्रादेशिक शांतता व स्थैर्य विकसित करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

ड) 'इस्तंबुल प्रक्रिया २०११' अनुसार हार्ट ऑफ एशिया परिषदेचे आयोजन केले जाते.

इ) या परिषदेमध्ये एकूण १४ देश हे सहभागी देश म्हणून भाग घेतात.

१) अ,ब,क आणि इ बरोबर

२) अ,ब,क आणि ड बरोबर

३) सर्व बरोबर

४) सर्व चूक

Show Answer

5) Excusive Economic Zone बाबत खालील माहिती विचारात घ्या व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) देशाच्या किनारपट्टीपासून समुद्रात २०० नॉटिकल मैल पर्यंतच्या समुद्राचा समावेश यात होतो.

ब) यात कोणताही दुसरा देश तेल उत्खनन करू शकतो.

क) या प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची मालकी संबधीत देशाची असते.

१) अ व ब योग्य

२) फक्त अ योग्य

३) फक्त क योग्य

४) अ व क योग्य

Show Answer

6) शांघाय सहयोग संघटन (SCO) शी संबंधित खालील विधानांचा विचार करा.

अ) भारत आणि पाकिस्तान सदस्य झाल्यानंतर या संघटनेची सदस्य संख्या आठ झाली आहे.

ब) शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना २००१ मध्ये झाली आहे.

क) या संघटनेचे मुख्यालय 'बीजिंग' येथे आहे.

ड) या संघटनेची अधिकृत भाषा चिनी व रशियन आहे.

वरीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती?

१) फक्त अ व ब

२) फक्त अ, ब व क

३) यापैकी एकही नाही

४) वरील सर्व

Show Answer

७) खालील विधाने वाचा.

अ) वॉशिंग्टन येथील आंतराष्ट्रीय कापूस सल्लागार संस्थेच्या तांत्रिक विभागाच्या डॉ. केशव राज क्रांती यांची निवड झाली आहे.

ब) ही संस्था जगभरातील ४० देशांनी एकत्र येऊन स्थापन केली पैकी भारत हा या संस्थेचा सदस्य आहे.

वरील विधानांपैकी योग्य विधान/ने ओळखा.

१) फक्त अ

2) फक्त ब

३) अ व ब दोन्ही

४) दोन्हीही नाही

Show Answer

8) योग्य पर्याय निवडा.

अ) साहित्य अकादमी या संस्थेची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी नवी दिल्ली येथे झाली.

ब) ही संस्था केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्य करते.

क) डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

ड) मराठी साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या 'आलोक' या साहित्यकृतीस २०१६ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.

इ) 'इडा पीडा टळो' हा आसाराम लोमटे यांचा प्रसिद्ध लघुकथासंग्रह आहे.

१) फक्त अ,ब आणि ड बरोबर

२) अ,ब,क,ड आणि इ बरोबर

३) फक्त अ,ब,क आणि ड बरोबर

४) सर्व चूक

Show Answer

9) 'पहल योजने' संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान / विधाने शोधा.

अ) पहल योजनेअंतर्गत गॅस अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येते.

ब) लाभार्थ्यास १७ अंकी Digit LPG ID देण्यात येतो.

क) पहल योजनेची सर्वात मोठी रोख हस्तांतरण योजना म्हणून 'गिनिज बुक' मध्ये नोंद करण्यात आली.

ड) पहल योजनेअंतर्गत लाभार्थ्यास आधारकार्ड नंबर देणे सक्तीचे करण्यात आले.

१) अ आणि ड चूक

२) फक्त ड चूक

३) ब आणि ड चूक

४) क आणि ड चूक

Show Answer

10) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते २४ ऑक्टोबर, २०१६ रोजी वाराणसी येथे गंगा ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले, या प्रकल्पासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

अ) गंगा ऊर्जा हे एक गॅस पाईपलाईन प्रकल्प आहे.

ब) देशाच्या पूर्व भागातील रहिवाशांना पाईपलाईन द्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करण्याचे या प्रकल्पाचे उद्धिष्ट आहे.

क) हा प्रकल्प गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. या सार्वजनिक कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे.

वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) फक्त अ व क

४) वरील सर्व

Show Answer

Top