चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६४


१) हार्ट ऑफ एशिया परिषद २०१६ मध्ये अमृतसर जाहीरनामा मांडण्यात आला ज्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता?

१) दहशदवादाचा समुळ नाश करणे हा आहे.

२) व्यापारास उपयुक्त वातावरण निर्माण करणे.

३) अफगाणिस्तान चा विकास करण्याचा मुख्य आराखडा.

४) वरील सर्व

Show Answer

२) नुकतेच राजस्थानातील सांभर सरोवर चर्चेत होते त्यासंबंधी विधाने पडताळा.

अ) या सरोवरातील मिठागरांवर बंदी आणण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय हरित लवादाने दिले.

ब) हा भारतातील सर्वात मोठा सीमेअंतर्गत असलेला खाऱ्यापाण्याचा सरोवर आहे.

क) हा राजस्थानातील नागौर व जयपूर जिल्ह्यांमध्ये आहे.

ड) या सरोवराची रामसर यादीत नोंद झाली आहे.

वरीलपैकी अचूक विधाने असलेला पर्याय ओळखा.

१) अ,ब व ड

२) अ व ड

३) ब,क व ड

४) वरील सर्व

Show Answer

३) महाराष्ट्र व तेलंगाणा या दोन राज्याच्या पाणीवाटप व हक्काच्या प्रश्नावर आंतरराज्य पाणी वाटप मंडळ स्थापन केले असून त्या माध्यमातून परस्पर सामंजस्याने पाणी प्रश्न सोडविण्यात आला आहे. या मंडळाच्या बैठकीत खालीलपैकी कोणत्या बंधाऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे हे शोधा.

१) प्राणहिता नदीवर तुकडीहेटी बंधारा

२) गोदावरी नदीवर मेडिगट्टा

३) पैनगंगा नदीवर चनाखा कोर्टा

४) वरीलपैकी सर्व

Show Answer

४) खालील विधाने वाचा.

अ) प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात स्वस्त औषधांचा पुरवठा करण्याचा आहे.

ब) या योगानेंतर्गत राज्यातील बस स्थानकांवर स्वस्त औषध दुकाने (जेनेरिक) सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

क) भारतीय जन-औषधी योगानेंतर्गत राज्यातील बस स्थानकांवर स्वस्त औषध दुकाने (जेनेरिक) उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

वरील विधानांपैकी योग्य विधान/ने शोधा.

१)अ फक्त २)अ व ब ३)सर्व योग्य ४)एकही नाही

१) अ फक्त

२) अ व ब

३) सर्व योग्य

४) एकही नाही

Show Answer

५) महाराष्ट्राच्या फ्लाय अँश धोरणासंबंधीची योग्य विधाने शोधा.

अ) राज्याच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या दगडी कोळशाच्या राखेची विल्हेवाट, सिमेंट उद्योग, विटा बनविणे रस्ते व घर बांधणीसाठी राज्याने हे धोरण स्वीकारले आहे.

ब) या प्रकारचे धोरण राबविलेल हे दुसरे राज्य आहे.

क) या राखेचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य Mahagems (Maha.Gen.Management Services) ही कंपनी उभारणार आहे.

१) अ,ब

२) ब,क

३) अ,क

४) अ,ब,क

Show Answer

६) 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०१७' संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) हा रिपोर्ट संयुक्त राष्ट्राद्वारा प्रसिद्ध केला जातो.

ब) या रिपोर्टमध्ये भारताची क्रमवारी १२२ आहे.

क) या रिपोर्टमध्ये सर्वोच्च रँकिंग नॉर्वेची आहे तर सर्वात खाली बुरुंडी देश आहे.

वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

 

१) अ आणि क

२) अ आणि ब

३) ब आणि क

४) अ, ब आणि क

Show Answer

७) उदय योजनेसंबंधी पुढील विधाने विचारात घ्या.

अ) राज्य वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता आणि आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.

ब) उदय योजनेत सहभागी होणारे महाराष्ट्र हे देशातील १७ वे राज्य ठरले आहे.

क) या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाने ५ नोव्हेम्बर २०१५ रोजी परवानगी दिली होती.

वरीलपैकी सत्य विधाने कोणती?

१) अ व क

२) अ व ब

३) फक्त अ

४) वरील सर्व

Show Answer

८) केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने देशात सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या राज्यांना कृषी कर्मण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. २०१५-१६ या वर्षाचे हे पुरस्कार खालील राज्यांना दिले आहेत. त्यापैकी खालील दिलेल्या जोडयांपैकी अयोग्य जोडी ओळखा.

१) तामिळनाडू - सर्वाधिक उत्पादन : १ मिलियन टनहून अधिक

२) हिमाचल प्रदेश - मध्य उत्पादन : १-१० मिलियन टन

३) त्रिपुरा - लघु वर्ग : १ मिलियन टन पेक्षा कमी

४) तेलंगणा - लघु वर्ग : १ मिलियन टन पेक्षा कमी

Show Answer

९) इस्त्रो कडून 'पृथ्वी-२' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्याविषयी खालील कोणते विधान बरोबर आहे?

१) जमिनीवरून अवकाशात मारा करण्याची क्षमता आहे.

२) जमिनीवरून जमीनवर मारा करण्याची मारक क्षमता आहे.

३) अवकाशातून पाण्यावर मारा करण्याची क्षमता आहे.

४) जमिनीवरून पाण्यात मारा करण्याची मारक क्षमता आहे.

Show Answer

१०) 'पंतप्रधान युवा योजना' संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) ९ नोव्हेंबर,२०१६ रोजी देशातील युवकांमध्ये उद्योगशीलता व त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.

ब) आगामी पाच वर्षात म्हणजे २०१६-१७ ते २०२०-२१ या काळात देशातील ३०५० संस्थांमधून ७ लाख युवकांना तांत्रिक शिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहे/त.

१) फक्त अ

२) अ व ब

३) फक्त ब

४) वरीलपैकी नाही

Show Answer

Top