चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५९


१) पुढीलपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) २०१७ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र झाझरिया आणि सरदार सिंग यांना जाहीर झाला आहे.

ब) अर्जुन पुरस्कार साठी १७ खेळाडूंची निवड झाली.

क) रिओ पॅराऑलम्पिक मध्ये देवेंद्र झाझरिया यांनी गोळाफेक मध्ये सुवर्ण पदक मिळविले होते.

ड) भारताचा स्टार सरदार सिंग हा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.

१) अ व ब

२) ब व क

३) अ, क व ड

४) अ, ब, क व ड

Show Answer

२) खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?

अ) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा(गुजरात) येथे उभारण्यात येत आहे.

ब) सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (मेलबर्न) हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ व ब दोन्ही

४) एकही नाही

Show Answer

३) पुढील विधानांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) शेरबहादूर देऊबा हे सध्या नेपाळचे पंतप्रधान आहेत.

ब) नेपाळच्या पंतप्रधान यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.

क) २४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट,२०१७ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले होते.

१) अ व क

२) अ व ब

३) ब व क

४) अ, ब व क

Show Answer

४) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

अ) अजय त्यागी यांची नुकतीच 'भारतीय रोखे व प्रतिभूती मंडळाचे (SEBI)' अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.

ब) अजय त्यागी हे यापूर्वी वित्त मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आर्थिक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव (गुंतवणूक) होते.

१) अ बरोबर, ब चूक

२) अ चूक, ब बरोबर

३) अ व ब दोन्ही बरोबर

४) अ व ब दोन्ही चूक

Show Answer

५) खालीलपैकी अयोग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार भेटीमध्ये शेवटचा मोगल सम्राट बहादूरशहा जफर याच्या कबरीला भेट दिली.

ब) म्यानमारच्या सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या 'श्वेदगॉन पॅगोडा' ला भेट देऊन उभय देशातील सांस्कृतिक वारशाचे प्रतिक म्हणून बोधी वृक्षाच्या रोपाचे रोपन केले.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ व ब दोन्ही

४) यापैकी नाही

Show Answer

६) ९ जून, २०१७ रोजी ब्रिटनमधील संसदीय निवडणूकांचा निकाल जाहीर झाला. याबाबत योग्य विधाने निवडा.

अ) या निवडणूका मध्यावधी स्वरूपाच्या होत्या.

ब) हुजूर पक्षाला ६५० पैकी ३२८ जागा प्राप्त झाल्या.

क) मजूर पक्षाला ६५० पैकी २६१ जागा प्राप्त झाल्या.

१) फक्त अ बरोबर

२) अ व ब बरोबर

३) अ व क बरोबर

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

७) खालील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा.

अ) ५ ऑगस्ट,२०१७ रोजी जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आले.

ब) गौरी लंकेश ह्या 'गौरी लंकेश पत्रिका' या साप्ताहिकाच्या संपादिका होती.

क) गौरी लंकेश या केरळ राज्याच्या नागरिक होत्या.

ड) हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विरोधात लेखन करणाऱ्या निर्भिड पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती.

१) अ चूक

२) ब चूक

३) अ व ब चूक

४) क चूक

Show Answer

८) भारत सरकारने नोव्हें. २०१६ मध्ये चलनात आणलेल्या नवीन ५०० रु.च्या नोटची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत -

अ) रंग : राखाडी (Stone Grey)

ब) आकार : १५० मिमी ६६ मिमी

क) नोटच्या पाठीमागील बाजूवर 'मंगल यानाची प्रतिमा'

ड) दृष्टीबाधित व्यक्तींसाठी समोरील बाजूवर अशोकस्तंभाच्या चिन्हाच्या वरती '५००' हा आकडा एका आडव्या आयतात मुद्रित केलेला आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने असत्य आहे/आहेत?

१) अ व क

२) ब व ड

३) क व ड

४) ब, क व ड

Show Answer

९)  खालील विधानांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव नुकतेच बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले आहे.

ब) मुगलसराय रेल्वे स्थानकावरच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा १८६८ मध्ये मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता.

क) मुगलसराय हे गाव माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांचे जन्मस्थळ आहे.

१) अ व ब

२) अ व क

३) अ, ब व क

४) फक्त अ

Show Answer

१०) टेलिव्हिजन चॅनल अल-जझीरा वर बंदी घालणे आणि इराण बरोबर असलेले संबंध कमी करण्यासंदर्भात कतार या देशांबरोबर किती देशांनी संबंध तोडले?

१) ४ देश (सौदी अरब, इजिप्त, बहारीन, युएई)

२) ५ देश (सौदी अरब, इजिप्त, बहारीन, युएई, यमन)

३) ७ देश (सौदी अरब, इजिप्त, युएई, यमन, मालदीव, लिबिया, बहारीन)

४) वरीलपैकी नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.