chala jaguya upsc mpsc chya jagat

चला जगुया UPSC-MPSC च्या जगात......


7 वाजले की रोजची धावपळ सुरु
होते...धावपळ लवकर आवरण्याची....हेतु अभ्यास
जास्त करण्यासाठी नाही तर लवकर जावून
अभ्यासिकेत जागा पकडण्यासाठी...कारण fan
खाली जागा नाही मिळाली तर
अभ्यासाचा विषय सोडाच घाम पूसण्यामधेच 4 cal energy
जाते....एकदा का जागा मिळाली की
स्वारी जाते सलीम च्या नाश्ता सेन्टर वर....
रोजच ठरलेले पोहे...आवडतात म्हणून नाही तर
quantity जास्त येते आणि तेही affordable rate
मध्ये...सगळेच मन लावून अभ्यास करतात... दूसरा पर्यायच
नसतो...रोजच तोच अभ्यास...ठरलेली पुस्तके...त्या
पुस्तकांची पारायणे..सगळ्यांच एकच ध्येय
वाघाची शिकार करण्याच(class 1).....पण वाटेत मिळाला
तर ससा पण घेवून येन्याच... तसही वाघ
कमीच झालेत...दिसतच नाहीत लवकर...
तोपर्यन्त ससा तरी कामी येतोच..रविवार
असो वा शनिवार सगळेच वार सारखे...काहीजण
महिन्याचा खर्च चालवण्यासाठी जॉब करतात तर
काहीजण part time lectureship
करतात....काहीजण हे युद्ध लढण्यासाठी
सर्व दोर कापून आलेले असतात.. युद्धच म्हणवा
लागेल....आधी युद्ध लढला जायच शारिरिकपने ... पण
हे युद्ध आहे मानसिक level वर...कदाचित शारिरिक जखमा बऱ्या
होतात आणि विसरून ही जातात पण इथे एक एक
अपयश मनाला बेजार करुन जात....आनंदाची गोष्ट
म्हणजे इथे शोक करायला वेळच नाहीये ...इथे एकच
त्रिकालबाधित सत्य आहे जो या युद्धात शोक करत थांबला तो
नक्कीच संपला....विषयच नाहीये
थांबयचा....दूसरा नियम इथे चुकीला माफी
नाहीये.....कोणत्याही
पायरीमधून बाहेर पडला तर तुम्हाला सुरवात
अगदी पहिल्यापासून करायची
आहे....चिडिचा डाव पण इथे नाहीये....त्यात वर
समोरिल पार्टी कायम गंडवत असते...कधी
प्रश्न चुकले म्हणुन तर कधी जागाच
कमी काढुन तर कधी कधीच न
वाचलेले बालिश प्रश्र विचारुन....इथे अस का गंडवल म्हणून
विचारायला पण कुणाला वेळ नाहीये....जाहिर
आली की cafe mde गर्दी
होते... झुंडिने फॉर्म भरला जातो... एक प्रकारे युद्धामधे प्रवेश
घेतला जातो लढण्यासाठी...शस्त्र एकच... Reynolds
liqi flow black ball pen....शत्रु अंधारात...पहिल युद्ध
जिंकला की दुसऱ्या पायरीसाठी
थोडा वेळ....त्यानंतर तिसर....शेवटी सर्व जिंकला
की फ़ोटो direct digital flex वर...निकाल लागायच्या
आधी आणि निकालानंतर साहेब ह्या 3 च अक्षरांच
अंतर असतय...पण तेच अंतर पार करण्यासाठी काहिना
स्वतःच्या डोक्याचा albedo व्हायची वेळ
येते....अधिकारी झालेत त्यांची
दिवाळी .....आणि जे बाहेर पडलेत त्यांचा शिमगा सुरु...
एकच स्वप्न उराशी...digital flex वर येवून साहेब
म्हणुन घेण्याच....आणि त्यासाठी मर मर अभ्यास
करण्याच... इथे प्रत्येक अपयश नविन धड़ा शिकवून जातय आणि
मनाला दगड बनवतय हेच तेवढ समाधान....लोकांना वाटतंय काय येड
पंचवार्षिक योजनेसारख घूटमळत बसलय... पण त्याना कुठे माहित
आहे की इथे कुठे चूक झाली हेच
कळायला एक वर्ष जातय...बाहेरील लोकांच सोडा घरातले
पण कधी कधी संशय घेतात
की खरच येड झालय की काय
म्हणून...पण इथे खेळामधे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व
नक्कीच घडवल जात....हे वीर
कधीच माणस ओळखायला चुकत नाहीत
आणि कोणत्याच समस्येला घाबरत नाहीत
...काहितरी मार्ग काढतातच... कारन पंचवार्षिक योजने
मधे 4 option पैकी 1 select करण्याच logic
develop झालेलच असत...हे अस जगन कुठेच
नाहीये..इथे match fixing नाहीये....जो
लढला संयम आणि सात्यताने तोच जिंकला....शेवटी
सगळेच जिंकनार आहेत...कोणी आज जिंकनार आहेत
तर कोणी उदया...पण जिंकणार आहेत हे
नक्की..opposite पार्टी खुपच दयावान
आहे....काही नाही मिळाला
तरी फक्त युद्ध लढला म्हणून उंदीर
तरी देतेच....फक्त आपल्यालाच ठरवायच
की ससा ,उंदीर घेवून थांबयच
की वाघाची शिकार
करायची...निर्णय आपलाच आहे.....सगळेच
यशस्वी होतील आणि एकत्र जमल्यानंतर
अमृततुल्य चहा जवळ परत ह्याच आठवणी काढत
बसतील....
संगळ्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारा
मी एक upsc/mpsc
वारकरी....काही चुकल असेल तर मोठ्या
मनाने माफ करा....


Top

Whoops, looks like something went wrong.