MPSC chalu ghadamodi, current affairs

1. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मुकुट अभिमानाने मिरवणाऱ्या बार्सिलोनाच्या लिओनेल मेसीने विक्रमी सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरले.

2. महिलांमध्ये विश्वविजेत्या अमेरिकेची खेळाडू मेगान रॅपिनोने कारकीर्दीत पहिल्यांदाच या पुरस्काराला गवसणी घातली.

3. तर पॅरिसमधील शॉटलेट थिएटर येथे झालेल्या या सोहळ्यात मेसीने यंदाच्या चॅम्पियन्स लीगमधील लिव्हरपूलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हर्गिल व्हॅन डिक आणि पोतुर्गाल व युव्हेंटसचा नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर मात करून हा पुरस्कार पटकावला.

4. तसेच 2019 या वर्षांत अर्जेटिना आणि बार्सिलोना संघाकडून खेळताना मेसीने सर्वाधिक 54 गोल केले आहेत.

5. त्याचप्रमाणे बार्सिलोनाला ला लिगाचे विजेतेपद आणि चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून देण्यात मेसीचा सिंहाचा वाटा होता. मेसीने सर्वाधिक 686 गुण मिळवले,


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी अ‍ॅथलेटिक्स आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवत 11 सुवर्णपदकांसह एकूण 27 पदकांची लयलूट केली आहे.

2. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या खात्यावर 18 सुवर्ण, 16 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकूण 43 पदके जमा आहेत.

3. तर पहिल्या स्थानावरील यजमान नेपाळच्या खात्यावर 44 पदके (23 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्य) जमा आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. उत्तर प्रदेशचा फलंदाज प्रियम गर्ग दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या भारताच्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल.

2. अखिल भारतीय ज्युनिअर निवड समितीने रविवारी येथे झालेल्या बैठकीनंतर 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत खेळल्या जाणार्‍या स्पर्धेसाठी संघाची निवड केली.

3. आघाडीच्या फळीतील फलंदाज गर्गच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि लिस्ट ‘अ‘ सामन्यात शतकाची नोंद आहे. त्याचवेळी, यशस्वी जैस्वाल, अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या मुंबईकरांचीही भारतीय संघात वर्णी लागली आहे.

4. गेल्या महिन्यात देवधर ट्रॉफी स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या भारत ‘सी’ संघात गर्गने प्रतिनिधित्व केले होते. त्याने अंतिम सामन्यात भारत ‘ब’विरुद्ध 74 धावांची खेळी केली होती. रणजी टचषक 2018-19 च्या मोसमात गर्ग उत्तर प्रदेशतर्फे दुसरा सर्वोत्तम धावा फटकावणारा फलंदाज होता.

5. भारत या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी संघ आहे. भारताने 2018 च्या गेल्या स्पर्धेसह एकूण चारवेळा जेतेपद पटकावले आहे.

6. भारताने 2018 मध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला होता.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. जालंधरमध्ये टाटा मोटर्सच्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या अंतिम दिवशी गुरप्रीत सिंग आणि सुनील कुमार दोघांनी सुवर्णपदक मिळवत आपली प्रतिष्ठा कायम ठेवली. तर गुरप्रीत यांचे हे चौथे वरिष्ठ राष्ट्रीय पदक होते.

2. पंजाबच्या या मल्लाने दोन वेळा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचे पदक विजेते सजन भानवालला नमविले. त्याने रेल्वेचे प्रतिनिधीत्व केले. गुरप्रीतने आपल्या तरुण प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व कायम ठेवले आणि आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात चौथ्या विजयाची नोंद केली.

3. सुनिलने पंजाबच्या प्रभाळवर विजय मिळवला. रेल्वेच्या या मल्लाने पंजाबच्या खेळाडूवर 5-1 असा विजय नोंदवला.तसेच 55 किलो वजनी गटात कर्नाटकाच्या अर्जुनने सर्व्हिसेसचे प्रतिनिधित्व केले आणि अजयचा 9-0 ने पराभव करून सुवर्ण जिंकले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने झळकावलेल्या नाबाद त्रिशतकी खेळाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे.

2. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 589 धावांवर आपला डाव घोषित केला. वॉर्नरने 418 चेंडूत 335 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 39 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

3. या खेळीदरम्यान वॉर्नरने माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला.

4. कसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतक झळकावणारा वॉर्नर चौथा खेळाडू ठरला आहे. याचसोबत अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आता वॉर्नरच्या नावे जमा झाला आहे.

5. तर याआधी 29 जानेवारी 1932 रोजी ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावर नाबाद 299 धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज त्रिशतक झळकावत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आशियाई तिरंदाजी स्पध्रेतील रीकव्‍‌र्ह प्रकारात दीपिका कुमारीने सुवर्ण आणि अंकिता भाकटने रौप्यपदकाची कमाई केली. या दोघींनीही पदकांसहित ऑलिम्पिकमधील एका स्थानाची निश्चितीसुद्धा केली आहे.

2. तर टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेची तीन वैयक्तिक स्थाने गुरुवारी निश्चित होणार होती. जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पध्रेत सहभागी झाले होते. परंतु याही स्थितीत अग्रमानांकित दीपिका आणि सहावी मानांकित अंकिताने लक्षवेधी कामगिरी केली.

3. तसेच महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असणाऱ्या दीपिकाने मलेशियाच्या नूर अफिसा अब्दुल हलिला 7-2, इराणच्या झाहरा नेमातीला 6-4 आणि थायलंडच्या नरीसारा खुनहिरनचायोचा 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठताना ऑलिम्पिकमधील स्थान पक्के केले.

4. नरीसाराविरुद्धच्या सामन्यात दीपिकाने आपला आयुष्याचा जोडीदार अतानू दासकडे 28 गुण साधेन, असा दावा केलाहोता. परंतु तिने एकूण 29 गुण कमावले. यापैकी दोनदा 10 आणि एकदा 9 गुण मिळवले. मग दीपिकाने एनग्युऐटला6- 2 अशा फरकाने नामोहरम करीत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम सामन्यात दीपिकाने अंकिताचा 6-0 असा सहज पाडाव केला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.

2. मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते. तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला.

3. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.1. 


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले.


2. अभिषेक-ज्योती जोडीने अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा १५८-१५१ असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.

3. दिवसाच्या पूर्वार्धात अभिषेकने फक्त एका गुणाच्या फरकाने कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक गमावले. कोरियाने २३३-२३२ असा पराभव केल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिषेक, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या त्रिकुटाने पहिल्या सत्रातसुद्धा अप्रतिम खेळ करीत बरोबरी साधली.

4. परंतु दुसऱ्या सत्रात जाईवॉन यांग, याँगची चॉय आणि ईऊन-क्यू चोय यांनी सामन्यावरील नियंत्रण सोडले नाही. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर यांनी कोरियाकडून २१५-२३१ अशी हार पत्करल्याने जेतेपद गमावले.
 

5. जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक रीकव्‍‌र्ह प्रकारात भारताच्या अतानू दाससह तीन खेळाडूंनी मंगळवारी कांस्यपदके जिंकली. याचप्रमाणे किमान तीन रौप्यपदकांची निश्चिती केली.

2. भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यामुळे अतानू हा त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाला होता.

3. तर कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहचा 6-5 असा पराभव केला. मग दासने तरुणदीप राय आणि जयंत तालुकदार यांच्या साथीने पुरुष सांघिक गटात चीनचा 6-2 असा पराभव करून दुसरे कांस्यपदक पटकावले.

4. त्यानंतर, महिलांच्या रीकव्‍‌र्ह सांघिक गटात दीपिका कुमारी, लैश्राम बोम्बायला देवी आणि अंकिता भाकट यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याच्या नावाचं स्टॅण्ड आता नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर दिसणार आहे.

2. तर मंगळवारी छोटेखानी सोहळ्यात औपचारिक घोषणा करण्यात आली. या स्टेडियमवर बिशन सिंह बेदी, मोईंदर अमरनाथ आणि विराट कोहली यांच्या नावाचं स्टॅण्ड आहे.

3. तर या स्टेडियमच्या एका गेटला वीरेंद्र सेहवाग आणि अंजुम चोपडा यांचे नाव दिलेले आहे.

4. 38 वर्षीय गंभीरनं याच स्टेडियमवरून क्रिकेटची सुरुवात केली. त्यानं भारतासाठी 58 कसोटी, 147 वन डे आणि 37 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयी संघाचा तो सदस्य होता.


Top