MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

2. Star Sports वाहिनीच्या एका कार्यक्रमात इरफानने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीची अखेर करत असल्याचं जाहीर केलं.

3. तर इरफानने आतापर्यंत 120 वन-डे, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

4. तसेच 2006 साली पाकिस्तान दौऱ्यात इरफान पठाणने कसोटी सामन्यात हॅटट्रीक नोंदवत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. इरफानने सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या फलंदाजांना माघारी धाडलं होतं.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगतदार कुस्त्या झाल्या. मागच्या वर्षीच्या 57 किलो आणि 79 किलो माती गटातील रौप्यपदक विजेत्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले.

2. माती विभागात 57 किलो वजनी गटात सोलापूरच्या आबासाहेब अटकळेने आणि 79 किलो गटात उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सुवर्णपदक पटकावले.

3. पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी 57 व 79 किलो वजनी गटाच्या माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. त्यात 79 किला गटाच्या अंतिम सामन्यात उस्मानाबादच्या हणमंतने सोलापूरच्या सागर चौगुलेला 5-0 गुणाने हरवत जेतेपद पटकावले.

4. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदेने परभणीच्या गिरिधारी दुबेवर 8-2 अशी मात केली.

5. तसेच 57 किलो गटात आबासाहेबने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम फेरीत आबासाहेब व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये 8-8 अशी बरोबरी झाली.

6. आबासाहेबने शेवटचा गुण मिळवल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. हे दोघेही काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीचे मल्ल आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताच्या महिला हॉकी संघाची बचावपटू सुनीता लाक्राने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती पत्करली आहे.

2. भारताच्या महिला हॉकी संघाने 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

3. तसेच त्या संघात सुनीताचा समावेश होता. 28 वर्षीय सुनीताच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे.
4. सुनीताने 139 सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

 


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. खेळाडूंच्या दुखापतींवर कमी वेळेत अचूक उपाययोजना करण्यात अनेकदा अपयशी ठरल्यामुळे टीकेचा धनी ठरलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी (एनसीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) लवकरच वैद्यकीय चमूची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुधारित योजनेचा भाग म्हणून नव्या समाजमाध्यम विभागाचीसुद्धा लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.

2. ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविड आणि अन्य सदस्यांमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीदरम्यान यासंबंधी चर्चा करण्यात आली. भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान सहा यांच्या दुखापतींवर उपचार करण्यात ‘एनसीए’ला अपयश आल्यामुळे नवीन वर्षांत ही मोहीम ‘बीसीसीआय’ने हाती
घेतली आहे. त्याचप्रमाणे हार्दिक पंडय़ा आणि जसप्रीत बुमरा यांनीही ‘एनसीए’मध्ये उपचार घेण्यापेक्षा वैयक्तिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेतले.

3. खेळाडूंच्या दुखापतींवर गांभीर्याने उपचार करण्यासाठी लंडनच्या ‘फोर्टिअस’ यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय चमूची नेमणूक करण्यात येणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीच्या प्रशिक्षकाचीसुद्धा लवकरच नेमणूक करण्यात येईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

4. तर खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी माहिती विश्लेषकाची नियुक्ती करण्यात येणार असून पुढील 18 महिन्यांत ‘एनसीए’मध्ये सर्व पदांवर योग्य व्यक्ती कार्यभार सांभाळत असेल, असे आश्वासनही त्या अधिकाऱ्याने दिले आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

 

1. अखेरच्या तीन डावांत पराभव पत्करल्यामुळे जलद (रॅपिड) प्रकारातील विश्वविजेतेपदानंतर अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारातील जगज्जेतेपद पटकावण्यात भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला अपयश आले. दोन दिवसांच्या जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत हम्पीला 12व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

2. अतिजलद प्रकारात महिलांमध्ये रशियाच्या कॅटरिना लॅग्नोने आणि पुरुषांमध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

3. तर शनिवारी चीनच्या लेई टिंगजीला आर्मागेडॉन डावात पराभूत करून हम्पीने जागतिक महिला जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर अतिजलद प्रकारात पहिल्या दिवशी हम्पीने दिमाखदार कामगिरी करीत नऊपैकी सात गुण मिळवून दुसरे स्थान राखले होते; परंतु दुसऱ्या दिवशी हे सातत्य तिला राखता आले नाही.

4. तसेच 17 डावांपैकी तिच्या खात्यावर 10.5 गुण जमा होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या द्रोणावल्ली हरिकाला 25वे स्थान मिळाले.


           MPSC chalu ghadamodi, current affairs

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वर्षअखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान कायम राखले. मात्र भारताचा कसोटी विशेषज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजाराची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
  • कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी स्पर्धेतही अव्वल स्थानी आहे.
  • कोहलीचे 928 गुण असून त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (911 गुण), न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (822 गुण), ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबूशेन चौथ्या स्थानावर आहेत.
  • मात्र पाचव्या स्थानावरील पुजाराचे 791 गुण आहेत. भारताच्या अजिंक्य रहाणेलाही 759 गुणांसह सातवे स्थान मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 95 धावा करून दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या क्विंटन डी कॉकने 10वे स्थान मिळवले आहे.
  • तर गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमरा 794 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (772 गुण) नवव्या आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (771 गुण) 10व्या स्थानावर आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष वेधलेल्या बॉक्सिंग लढतीत शनिवारी सहा वेळा विजेत्या एमसी मेरी कोमने निखत झरीनला नामोहरम केले आणि पुढील वर्षी चीनला होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान पक्के केले.

2. तर 36 वर्षीय मेरी कोमने 23 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या झरीनचा 9-1 असा पराभव केला. मेरी कोमसाठीसुद्धा निवड चाचणीचा निकष असायला हवा, अशी मागणी करीत या लढतीविषयीची उत्कंठा झरीनने वाढवल्याने बॉक्सिंग हॉलमधील वातावरण तणावपूर्ण शांततेचे होते.

3. तसेच अन्य लढतींत, 57 किलो वजनी गटात आशियाई पदकविजेत्या साक्षी चौधरीने दोन वेळा रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेरला नमवले.

4. 60 किलो गटात राष्ट्रीय विजेत्या सिम्रनजीत कौरने माजी विश्वविजेत्या एल. सरिता देवीचा पराभव केला. दोन वेळा जागतिक पदकविजेत्या लव्हलिना बोर्गोहेनने 69 किलो गटात ललिताला सहज पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या पूजा राणीने 75 किलो गटात नूपुरला नामोहरम केले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. बांगलादेशमध्ये होणाऱ्या जागतिक एकादश संघाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-20 सामन्यांत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आशियाई एकादश संघाकडून एकत्रित खेळणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी सांगितले.

2. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुढील वर्षी मार्च महिन्यात दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

3. तसेच 18 आणि 21 मार्चला होणाऱ्या या दोन सामन्यांसाठी भारताच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे.गेली सात वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेल्या नाहीत. परंतु विश्वचषक आणि आशियाई स्पर्धामध्ये या उभय संघांमध्ये सामने झालेले आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताच्या आघाडीच्या रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी 63व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखली आहे. अंजुम मुद्गिलने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.

2. तर याचप्रमाणे अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देसवालने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या हर्षदा निथावे आणि अनिकेत जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

3. मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने कनिष्ठ मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक मिळवताना राष्ट्रीय स्पर्धेतील सातव्या सुवर्णाची नोंद केली. तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि सांघिक गटांमध्ये चार सुवर्णपदके जिंकली होती.

4. अंजुमने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान मिळवताना 1172 गुण मिळवले. मग अंतिम फेरीत सुवर्णलक्ष्य साधताना अंजुमने 449.9 गुण मिळवले, तर तमिळनाडूच्या एन. गायत्रीला 2.6 गुण कमी मिळाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मागील दहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांवर वर्चस्व गाजवणारा भारताचा कर्णधार विराट कोहली याला ‘द क्रिकेटर’ या पाक्षिकाने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.

2. तर पाक्षिकाने गेल्या 10 वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 50 क्रिकेटपटूंची यादी तयार केली असून, त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.

3. भारताकडून कोहलीसह रविचंद्रन अश्विन 14 व्या, रोहित शर्मा 15 व्या, महेंद्रसिंग धोनी 35 व्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा 36 व्या स्थानावर आहे.

4. तसेच महिला क्रिकेटपटू मिताली राज 40 व्या स्थानी आहे.


Top