DRDO: 106th IS Winner of 'Exhibit of the Year' award at ISC

 1. भारताची संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) 106 व्या ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC)’ या कार्यक्रमात 'एक्झीबिटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा विजेता ठरला आहे.
 2. जालंधर (पंजाब) येथे दि. 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत 'फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या संकल्पनेखाली ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC) 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
 3. DRDO ने 'कलाम्स व्हिजन: डेयर टू ड्रीम' या विषयावर माहिती प्रदान केली. प्रदर्शनीमध्ये DRDOने त्यांनी विकसित केलेल्या विविध उपकरणांचे प्रदर्शन मांडले होते.
 4. भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA):-
 5. भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे मुख्यालय असलेली भारतातली एक प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे.
 6. याची 1914 साली स्थापना करण्यात आली आणि ते दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटतात.
 7. यामध्ये 30,000 हून अधिक वैज्ञानिक सदस्य म्हणून आहेत.
 8. 15-17 जानेवारी 1914 या काळात ISCA ची पहिली बैठक एशियाटिक सोसायटी (कलकत्ता) येथील परिसरात झाली.
 9. ISCA च्या नेतृत्वात आयोजित भारतीय विज्ञान परिषद (Indian Science Congress -ISC) हा विज्ञान क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे.


Approval of Indian Human Space Campaign

 1. दि. 28 डिसेंबर 2018 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘गगनयान’ उपक्रमाला मंजुरी देण्यात आली. यामधून भारतीय मानवी अंतराळ मोहीम चालवली जाणार आहे.
 2. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत अंतराळवीर घेऊन जाणारे अंतराळयान सोडण्यात येणार. त्याचा कालावधी एक कक्षीय कालावधी (एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी) ते किमान सात दिवस असेल.
 3. तीन सदस्यांसाठी आवश्यक तरतुदी असलेली ही मोहिम ‘GSLV Mk-3’ अग्निबाणाच्या सहाय्याने पाठवली जाणार आहे.
 4. गगनयान उपक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय संस्था, प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग यांच्याशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) समन्वय साधणार आहे.
 5. गगनयान उपक्रमासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
 6. यात तंत्रज्ञान विकास, उड्डाणासाठीचे हार्डवेअर आणि आवश्यक पायाभूत घटकांच्या खर्चाचा समावेश आहे.
 7. गगनयान उपक्रमात दोन मानवविरहित आणि एक मानवसहित अंतराळयानाचा समावेश आहे. उड्डाण यंत्रणेची पूर्तता भारतीय उद्योगांमार्फत होणार आहे.
 8. गगनयान उपक्रम हा एक राष्ट्रीय प्रयत्न आहे.
 9. सदस्यांचे प्रशिक्षण, मानव जीव विज्ञान, तंत्रज्ञान विकास तसेच आरेखन अवलोकनात राष्ट्रीय संस्था, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्था यात सहभाग होतील.
 10. अंतराळवीर घेऊन जाणाऱ्या पहिल्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक मंजुरीपासून 40 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उदिृष्ट ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी पूर्ण तयारीनिशी दोन मानवरहित अंतराळयाने सोडण्यात येतील.


SpaceX sent the US Air Force's most powerful GPS satellite

 1. अमेरिकेच्या ‘स्पेसएक्स’ (SpaceX) या खासगी अंतराळ कंपनीने अमेरिकेच्या वायुदलाचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली GPS उपग्रह अवकाशात पाठवला आहे.
 2. ‘व्हेस्पुक्की’ या शृंखलेचा हा पहिलाच उपग्रह आहे.
 3. दि. 23 डिसेंबर 2018 रोजी फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हेरल येथून ‘फाल्कन 9’ अग्निबाणाच्या सहाय्याने हा उपग्रह प्रक्षेपित केला गेला आहे.


NASA's New Year Calendar

 1. नासाच्या २०१९च्या वार्षिक कॅलेंडरवर जगभरातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र लावण्यात आली आहेत. या कॅलेंडरच्या मुखपृष्ठावरील चित्र उत्तर प्रदेशातील दिपशिखा हिने रंगवलं असून एकूण तीन भारतीय मुलांनी रेखाटलेली चित्र या कॅलेंडरमध्ये झळकली आहे.
 2. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नासाने बारा महिन्यांचं एक थीम कॅलेंडर काढलं आहे.
 3. अंतराळ विज्ञान ही थीम असलेल्या या कॅलेंडरमध्ये तीन भारतीय विद्यार्थ्यांची चित्र समाविष्ट करण्यात आली आहे.
 4. दिपशिखाने रेखाटलेले अंतरिक्षातील वैज्ञानिक आश्चर्यांकडे कुतुहलाने पाहणाऱ्या मुलीच्या चित्राची निवड मुखपृष्ठासाठी करण्यात आली आहे.
 5. तर महाराष्ट्रातील इंद्रयुद्ध आणि श्रीहन या दोघांनी काढलेल्या चित्रही या कॅलेंडरमध्ये निवडलं गेलं आहे.
 6. अंतराळावीरांचे अंतराळातील आयुष्य आणि कार्य यात रंगवलं आहे.
 7. तर तामिळनाडूतील थेमूकिलिमनने रंगवलेलं स्पेस फूड हे चित्रही या कॅलेंडरमध्ये झळकलं आहे.
 8. याशिवाय जगातील इतर ही देशातील मुलांची चित्र या कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यावर्षी या कॅलेंडरसाठी नासाने चित्रकला स्पर्धाच आयोजित केली होती.


A successful launch of 'GSAT 7A' from Isro

 1. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन 19 डिसेंबर रोजी ‘जीसॅट-7 ए’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
 2. नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी GSLV-F11 रॉकेट जीसॅट-7 ए उपग्रहाला घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावला. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे.
 3. भारतीय हवाई दलासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचे आहे. कारण जीसॅट-7 ए या दळणवळण उपग्रहामुळे हवाई दलाला जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि अॅवाक्स विमानांचे नेटवर्क परस्परांशी जोडणे शक्य होईल.
 4. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे.
 5. या दळणवळण उपग्रहाचा खर्च ५०० ते ८०० कोटी रुपये आहे. या उपग्रहाच्या चार सौर पॅनलमध्ये ३.३ किलोवॅट इलेक्ट्रीक पावर निर्माण करण्याची क्षमता आहे.
 6. जीसॅट ७ ए आधी इस्त्रोने जीसॅट ७ ज्याला रुक्मिणी म्हटले जाते तो उपग्रह २९ सप्टेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केला आहे. खास नौदलासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
 7. जीसॅट ७ च्या मदतीने नौदलाला २ हजार सागरी मैल क्षेत्रावर लक्ष ठेवता येते. भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडया आणि लढाऊ विमाने कुठे आहेत त्याची माहिती मिळते.


GSAT-11 launch of the country's largest satellite, Revolution in Internet Speed

 1. अखेर तो क्षण आलाच जेव्हा देशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण करण्यात आलं.
 2. 5,854 वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आलं.
 3. हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुमइतका असल्याचं सांगितलं जात आहे.
 4. याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 5. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवलं होतं. Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
 6. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.
 7. यानंतर GSAT-11 चं प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 8. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच GSAT-11 चं प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
 9. हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरेल असा दावा केला जात आहे. उपग्रहाचं काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल.
 10. GSAT-11 च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला 100 गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.


Visions of 'Jaminid' Meteorite on 13-14 December

 1. उल्कावर्षाव ‘फाएथोन (Phaethon) मधील मोठ्या उल्कामुळे होतो.
 2. किमान दहा ते बारा उल्का दरवर्षी पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात.
 3. पृथ्वीवर आजपर्यंत सुमारे 150 उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत.
 4. पृथ्वीच्या सभोवती अजूनही काही उल्का प्रदक्षिणा घालत आहेत. त्यातील काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात.
 5. उल्कावर्षावाविषयी -
  1. अवकाशात फिरणाऱ्या छोट्या-छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी संबोधले जाते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात.
  2. पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहेत. त्यामुळे ज्या नक्षत्रातून उल्कावर्षाव झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला त्या उल्कावर्षावाचे उगमस्थान असे म्हणतात.
 6. हे पुढीलप्रमाणे -
  1. ययाती (Pereus) नक्षत्रातून होणाऱ्या उल्कावर्षावाला पर्सीड्‌ज म्हणतात. (दरवर्षी 1-20 ऑगस्ट दरम्यान)
  2. सिंह राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला लिओनिड्‌ज म्हणतात. (दरवर्षी 11-20 नोव्हेंबर)
  3. स्वरमंडळ (Lyra) तारकापुंजातून होणाऱ्या उल्कावर्षावाला लिरिड्ज म्हणतात. (दरवर्षी 16-26 एप्रिल)
  4. देवयानी (Andromeda) यातून होणाऱ्या उल्कावर्षावाला ॲन्ड्रोमीडस म्हणतात. (दरवर्षी 24-27 नोव्हेंबर)
  5. मिथुन (Gemini) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला जेमिनिड्ज म्हणतात. (दरवर्षी 9-14 डिसेंबर)
  6. मेष (Aries) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला एरिड्‌ज म्हणतात. (दरवर्षी 30 मे ते 14 जून)
  7. डेल्टा ॲक्वेरी या ताऱ्याच्या जवळून होणाऱ्या उल्कावर्षावाला डेल्टा ॲक्वेरिड्‌ज म्हणतात.


The Indian Navy included a rescue system for the submarine that was found in the crash

 1. खोल समुद्रात दुर्घटनेदरम्यान पाणबुड्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणारी मदत आणि बचाव प्रणाली दि. 11 डिसेंबर 2018 रोजी मुंबईत नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते नौदल गोदीत समाविष्ट करण्यात आली.
 2. नौदलात प्रथमच दोन खोल सागरी बचाव वाहने (Deep Submergence Rescue Vehicles -DSRVs) समाविष्ट करण्यात आली आहेत.
 3. या प्रणालीमुळे खोल समुद्रात पाणबुडी बचाव कार्यात नौदलाची क्षमता वाढली आहे.
 4. भारतीय नौदलाच्या या नवीन क्षमतेचे संचालन आणि तैनात करण्याचे काम नौदलाच्या पाणबुडी बचाव गटाच्या चालक दलाकडून मुंबईतून केले जाणार आहे.
 5. या सुविधेमुळे भारत अपघातात सापडलेल्या पाणबुडीतून लोकांचे जीव वाचविण्यासाठी शोध आणि बचाव कार्य चालविण्यास सक्षमता असणार्‍या नौदलांच्या श्रेणीत सामील झाले आहे.
 6. सध्या भारतीय नौदलाकडे सिंधुघोष, शिशुमार, कलवारी श्रेणीच्या पारंपरिक पाणबुड्या तसेच अणुशक्तीवर चालणार्‍या पाणबुड्या आहेत.
 7. हे वाहन जेम्स फिशर अँड सन्स कंपनीच्या स्कॉटलंड येथील JFD उप-कंपनीकडून विकसित करण्यात आले आहे.
 8. हे वाहन पाण्याखाली 650 मीटर खोलीपर्यंत पाणबुडीतून बचाव करण्यास सक्षम आहे आणि एकाच वेळी 14 लोकांना वाचवू शकते.


Insight From Mars to Earth, 'Selfie'

 1. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने मंगळावर पाठवलेल्या इनसाइट यानाने यांत्रिक बाहू व कॅमेरा यांच्या मदतीने सेल्फी छायाचित्र घेतले असून त्यात एकूण अकरा प्रतिमांचे ते संकलन आहे असे सांगण्यात आले.
 2. क्युरिऑसिटी रोव्हर मोहिमेतही याच पद्धतीने छायाचित्रे काढण्यात आली होती.
 3. नंतर ती एकत्र जुळवण्यात आली होती. या स्वप्रतिमेत (सेल्फी) लँडरचे सौर पंख व सगळी वैज्ञानिक उपकरणेही दिसत आहेत. 
 4. इनसाइट लँडर मंगळावर खडकाळ भागात उत्खननाचे काम सुरू करणार असून हे यान 26 नोव्हेंबरला मंगळावर उतरले आहे.
 5. इनसाइट लँडर मोहिमेतील वैज्ञानिकांनी सांगितले की, सेल्फी छायाचित्र चार बाय दोन मीटर आकाराचे असून त्यात इनसाइट यानाची सगळी पार्श्वभूमीही दिसत आहे.
 6. एकूण 52 छायाचित्रे जुळवून हे छायाचित्र तयार करण्यात आले आहे.


Hysis (PSLV-C43): ISRO's state-of-the-art Earth Observation Satellite

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) दि. 29 नोव्हेंबर 2018 रोजी ‘PSLV-C43’ या प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी 31 उपग्रहांना अवकाशात यशस्वीपणे पाठवले आहे.
 2. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण केले गेले. हे PSLVचे 45वे उड्डाण होते.
 3. प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये “हायसिस (हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटलाइट -HysIS)” हा भारताचा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे.
 4. अन्य उपग्रहांमध्ये अमेरिकेचे 23 तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, मलेशिया, नेदरलंड आणि स्पेन यांचा प्रत्येकी एक असे एकूण 30 उपग्रह आहेत. कोलंबियाने पहिल्यांदाच स्वतःच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी ISROची निवड केली आहे.
 5. भारताचा “हायसिस (हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटलाइट -HysIS)” उपग्रह –
  1. 380 किलो वजनाच्या हायसिसच्या मदतीने पृथ्वीवरील जमीन, पाणी, वनस्पती आणि अन्य घटकांबाबत माहिती मिळवता येणार आहे.
  2. शिवाय प्रदूषणाची माहिती देखील हा उपग्रह पुरविणार आहे.
  3. हायसिसचे आयुष्य पाच वर्षांचे असणार आहे.
 6. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) –
 7. ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे.
  1. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  2. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
  3. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 
  4. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.
  5. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोही म यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.
  6. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


Top