India's atomic Pvt. Baldev Raj dies

 1. भारताचे अणुवैज्ञानिक प्रा. बलदेव राज त्यांचे ६ जानेवारी रोजी पुणे येथे एका परिषदेसाठी आले असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 2. त्यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला पण नंतर ते बंगलोरला स्थायिक झाले. रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठातून त्यांनी पदवी व नंतर बंगलोरच्या आयआयएससी या संस्थेतून पीएचडी केली.
 3. त्यांचे बहुतांश संशोधन अणुक्षेत्रात असले तरी पदार्थ विज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान व विज्ञानविषयक धोरणे यांवरही त्यांनी बरेच काम केले होते.
 4. वैज्ञानिक राजनय व वैज्ञानिक धोरण यात त्यांनी सरकारला मोठी मदत केली.
 5. अणुशक्ती विभागात ते ४५ वर्षे कार्यरत होते. त्यांनी एकूण ८० पुस्तके, १३०० शोधनिबंध व १०० लेख लिहिले आहेत.
 6. सध्याच्या काळात ऊर्जा, पाणी, आरोग्य सुविधा, उत्पादनक्षमतेत वाढ अशा बहुअंगी आव्हानांचा वेध त्यांच्या संशोधनाने घेतला.
 7. सोडियम फास्ट रिअ‍ॅक्टर्स व त्याच्याशी संबंधित इंधनचक्र याचे संशोधन त्यांनी केले. तसेच वेल्डिंग करोजन, फेरोफ्लुइड्स व सेन्सर्स हेदेखील त्यांचे संशोधनाचे विषय होते.
 8. कलपक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटॉमिक रीसर्च या संस्थेत त्यांनी काम केले होते. सध्या ते नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेचे संचालक होते.
 9. इंटरनॅशनल न्यूक्लियर एनर्जी अ‍ॅकॅडमी, इंटरनॅशनल अमेरिकन सोसायटी ऑफ मेटल्स, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्डिंग इंटरनॅशनल अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले.
 10. कलपक्कम येथे संशोधन करताना त्यांनी फास्ट ब्रीडर टेस्ट रिअ‍ॅक्टर व फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर या दोन्ही प्रकारच्या अणुभट्टय़ांची प्रारूपे तयार करण्यात यश मिळवले.
 11. अणुसाहित्य, यांत्रिकी, नॅनोसायन्स (अब्जांश तंत्रज्ञान), रोबोटिक्स या क्षेत्रात अनेक संस्था उभ्या करण्यात त्यांचा वाटा होता.
 12. पद्मश्री, होमी भाभा सुवर्णपदक, एच के फिरोदिया पुरस्कार, ओमप्रकाश भसीन पुरस्कार, वासविक पुरस्कार, इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा जीवनगौरव, गुजरमल मोदी पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.


Former Deputy Speaker of Legislative Council Vasant Davkhare passed away

 1. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले.
 2. किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर बॉम्बे रूग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
 3. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस अशी डावखरे यांची ओळख होती. राष्ट्रवादीसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
 4. हिवरे गावच्या सरपंचापासून थेट विधान परिषद उपसभापतीपदापर्यंतचा प्रवास या अभ्यासू कार्यकर्त्याने पूर्ण केला.
 5. डावखरे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरे या गावी झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले.
 6. पदवीधर झाल्यानंतर त्यांची ओळख राजकारणातील तत्कालीन मातब्बर नेते बाळासाहेब देसाई यांच्याशी झाली. काही काळ देसाई यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. 
वसंत डावखरे यांचा राजकीय प्रवास
 1. १९८०साली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डावखरे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
 2. १९८६साली त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून ठाणे महापालिकेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले.
 3. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९८७मध्ये प्रथमच महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आली. १९८७ ते १९९३पर्यंत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. काही काळ त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषविले.
 4. १९९२पासून सतत चार वेळा ते राज्य विधानपरिषदेवर निवडून गेले. त्यानंतर सलग १८ वर्षे त्यांनी परिषदेचे उपसभापती पद भूषविले.
 5. २५ मे १९९९ला शऱद पवार यानी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी काँग्रेस सोडून डावखरे राष्ट्रवादीत गेले.
 6. राजकारणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला.
 7. कार्यकर्तृत्वाच्या चढ्या आलेखामुळेच राजकारणातील देव माणूस म्हणूनही ते ओळखले जात होते.


'Lagaan' fame actor Shrivallabh Vyas passed away

 1. अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे रविवारी सकाळी जयपूर येथे निधन झाले.
 2. ते ६० वर्षांचे होते. जवळपास ६० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारलेल्या व्यास यांना काही वर्षांपूर्वी एका भोजपुरी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच अर्धांगवायूचा झटका आला होता.
 3. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा व्यास आणि दोन मुली असे कुटुंब आहे. २००८ नंतर व्यास रुपेरी पडद्यापासून दूर होत गेले.
 4. व्यास यांच्या कुटुंबियांना चित्रपटसृष्टीतून आमिर खान, इमरान खान आणि मनोज वाजपेयी वगळता इतर कोणीही कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे केला नाही, अशी खंत त्यांची पत्नी शोभा व्यास यांनी व्यक्त केली.
 5. दर महिन्याला आमिर हा व्यास यांच्या कुटुंबियांना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत करत होता.
 6. त्याशिवाय त्यांच्या मुलींच्या शाळेचा आणि व्यास यांच्या वैद्यकीय उपचारांसाठीचा सर्व खर्चसुद्धा आमिरच पाहात होता.
 7. ‘लगान’मध्ये व्यास यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
 8. त्याशिवाय ‘सरफरोश’, ‘अभय’, ‘आन- मेन अॅट वर्क’, ‘शूल’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस- द फॉरगॉटन हिरो’ आणि ‘संकेत सिटी’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. याशिवाय रंगभूमीवरही ते बऱ्यापैकी सक्रिय होते.


Adv. Madhukar Pratikra passes away

 1. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मधुकर उपाख्य मामा किंमतकर यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
 2. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
 3. रामटेकमध्ये १० ऑगस्ट १९३२ला जन्मलेल्या मधुकरराव किंमतकर यांचे प्राथमिक शिक्षण रामटेकला झाले.
 4. १९५५मध्ये पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला आले. नरेंद्र तिडके यांच्या आग्रहास्तव मॉडेल मिल कामगार चळवळीत सहभागी झाले.
 5. त्यांनी १९५८मध्ये वकिलीचे शिक्षण घेतले आणि न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली सुरू केली.
 6. महाविद्यालयीन जीवनातच ते काँग्रेस सेवादलात सहभागी झाले होते.
 7. १९८०मध्ये त्यांनी काँग्रेसकडून रामटेकमधून विधानसभेची निवडणूक लढवली व विजयी झाले.
अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांचा राजकीय प्रवास
 1. १९८२मध्ये बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे वित्त, नियोजन कामगार, विधि व न्याय या विभागाचा कार्यभार होता.
 2. राजकीय जीवनात त्यांनी सुरुवातीपासूनच विदर्भाच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केले होते. सरकार या भागाकडे लक्ष देत नसल्याची त्यांची धारणा होती.
 3. १९८५च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांची राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. १९९०पर्यंत या पदावर कार्यरत होते.
 4. १९९२मध्ये म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १९९२ ते ९८ या काळात विधान परिषद सदस्य होते.
 5. १९९४ मध्ये राज्यपालांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून ते या मंडळाचे तज्ञ सदस्य म्हणून काम करीत होते.
 6. अलीकडेच त्यांना रामटेक भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.


Doctor of Education MV Pelli dies

 1. केरळमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमांची पायाभरणी करणारे द्रष्टे शिक्षण व्यवस्थापक डॉ. एम व्ही पैली यांचे वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले.
 2. त्यांचे पूर्ण नाव मूलमत्तम् वर्के पैली होते. ५ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांचा जन्म पुलिकुन्नू या बेटवजा गावात झाला.
 3. लखनऊ विद्यापीठातून त्यांनी कलाशाखेतील पदव्युत्तर पदवी घेऊन, हावर्ड विद्यापीठाची एलएलएम ही कायद्यातील उच्च पदवी त्यांनी मिळविली.
 4. त्यांनी १९६२मध्ये लिहिलेले ‘इंटरनॅशनल जॉइंट बिझनेस व्हेंचर्स’ हे पुस्तक अमेरिकेतील ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस’ने प्रकाशित केले.
 5. राज्यघटनाविषयक अनेक पाठय़पुस्तकांचे तसेच कामगार कायदे आणि मनुष्यबळ विकास या विषयावरील पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.
 6. कायदा आणि व्यवस्थापन यांचे जाणकार असलेल्या पैली यांनी लखनऊ, पाटणा, दिल्ली येथे प्राध्यापकी केली.
 7. त्यांच्या आग्रहामुळे कोचीनमधील ‘क्युसॅट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठात केरळमधील पहिला व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू झाला.
 8. ‘क्युसॅट’मधून निवृत्तीनंतर ते कोचीमधील ‘आशियाई विकास व उद्योजकता संस्थे’च्या प्रमुखपदी राहिले.
 9. देशभरच्या शिक्षण क्षेत्राची नेमकी नस ओळखून, गुणी प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्युसॅट’मार्फत त्यांनी ‘एम व्ही पैली पुरस्कार’ सुरू करविला. रोख १ लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
 10. देशभरातील अनेक विद्यापीठांचे तसेच केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित उच्चशिक्षण संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
 11. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २००६साली ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.


Educator, Social reformer - Savitribai Phule On January 3, 168th birth anniversary of

 1. जन्म :- जानेवारी ३, इ.स. १८३१ , नायगाव, सातारा, महाराष्ट्र.
 2. मृत्यू :- मार्च १०, इ.स. १८९७, पुणे, सातारा, महाराष्ट्र.
 3. सावित्रीबाई फुले  या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. 
 4. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
 5. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत.

 

जीवन 
 1. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. 
 2. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. 
 3. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
 4. सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. 
 5. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. 
 6. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. 
 7. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. 
 8. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

 

 

शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्य

 1. १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. 
 2. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
 3. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. 
 4. सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.
 5. १८४७-१८४८ साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या.
 6. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण  समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. 
 7. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. 
 8. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.
 9. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.
 10. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
 11. इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या  साथीने धुमाकूळ घातला.  हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
 12. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते.
 13. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
 14. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.


Renowned scientists and father of DNA technology in India, Lalji Singh passed away

 1. भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह (७०) यांचे दिल्लीला जात असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
 2. सिंह यांनी बीएचयूमधूनच त्यांनी बीएससी, एमएससी आणि पीएचडीची पदवीधर होते.
 3. तसेच बीएचयूचे २५वे उपकुलगुरू असलेल्या सिंह यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
 4. सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक असलेले सिंह यांनी या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिलेले आहे.
 5. डॉ. लालजी सिंह यांनी १९८८ मध्ये डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचा शोध लावला.
 6. डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानासाठी त्यांना सर्वाधिक आठवले जाईल.
 7. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला.
 8. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होेते.
 9. सर्व उपाय निकामी ठरल्यानंतर डॉ. सिंह यांनीच डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला.
 10. त्यांच्याच निर्देशांवरून प्रियंका गांधी यांच्या नखाचा नमुना घेण्यात आला आणि त्याचा डीएनए मृतदेहाच्या डीएनएशी जोडून पाहिला.
 11. त्यावरून ओळख पटली.
 12. म्हणूनच सिंह यांना भारतातील डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचे जनक म्हटले जाते.


 1. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे.
 2. शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.
 3. १९८४ मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर एकटे राहायला लागले होते. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले.
 4. २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 5. शशी कपूर यांनी हिंदी तसेच इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे. निर्माते म्हणून त्यांनी ‘जुनून’ (१९७८), ‘कलियुग’ (१९८०), ‘३६ चौरंगी लेन’ (१९८१), ‘विजेता’ (१९८२), ‘उत्सव’ (१९८४) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली होती. तसेच ६० आणि ७० च्या दशकांत त्यांनी ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मीली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ आणि ‘फकीरा’ या सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या होत्या.
 6. शशी कपूर यांचे समकालीन कलाकार व्यावसायिक चित्रपटांमध्येच अडकलेले असताना कपूर यांनी त्याबरोबरीने कलात्मकतेची कास धरत निर्माता होण्याचे धाडस दाखवले. फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्टय़ दाखवतात. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले.

पुरस्कार

 1. २०११ मध्ये पद्म भूषण
 2. २०१५ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
 3. १९९४ मध्ये ‘मुहाफीज’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
 4. १९७९ मध्ये जुनून या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
 5. २०१० मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार


Top

Whoops, looks like something went wrong.