Veteran journalist and writer Muzaffar Hossain passed away

 1. इस्लामी देशांतील विविध घडामोडींवर मराठीतून अभ्यासपूर्ण लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन यांचे  निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
 2. २० मार्च १९४० रोजी जन्मलेले मुझफ्फर हुसेन महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रातील प्रसिद्ध आणि प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सर्वांना सुपरिचित होते.
 3. पाकिस्तान वा अरब देशांतील महत्त्वाच्या घटनांवर विविध वृत्तपत्रांचे संपादक त्यांना आवर्जून लिहायला सांगत.
 4. कोणताही पूर्वग्रह न ठेवता एखाद्या विषयाचे नेमके विवेचन करणे, हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा पैलू होता.
 5. मुझफ्फर हुसेन यांनी लिहिलेली अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली. त्यापैकी इस्लाम व शाकाहार, मुस्लिममानसशास्त्र, दंगों में झुलसी मुंबई, अल्पसंख्याक वाद : एक धोका, इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन, लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान, समान नागरी कायदा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 6. मुंबईतील विश्व संवाद केंद्राच्या स्थापनेपासून ते उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा जवळचा संबंध होता. परभणी येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 7. २००२साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकाकिता पुरस्कार (२०१४) देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 8. याशिवाय राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कार त्यांना मिळाले होते.


Sumita Mitra's 'US National Inventors Hall of Fame' included

 1. भारतीय वंशाच्या कल्पक वैज्ञानिक सुमिता मित्रा यांचा अमेरिकेत ‘यूएस नॅशनल इनव्हेन्टर्स हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
 2. एकंदर ९८ पेटंट सुमिता मित्रा यांच्या नावावर आहेत. अमेरिकन केमिकल सोसायटीत त्या विज्ञान प्रशिक्षक होत्या.
 3. गेली तीन दशके रसायनशास्त्रातील ज्ञानाचा वापर त्यांनी मानवी कल्याणासाठी केला आहे. दातांचे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांनी नॅनोकणांवर आधारित दंतभरण (नॅनो डेंटल फिलर्स) पदार्थ तयार केले.
 4. त्यांनी जे दंतभरण तयार केले आहे त्याचे नाव फिलटेक असून, त्याचे रीतसर व्यापारचिन्हही घेण्यात आले आहे.
 5. थ्री एम ओरल केअरमध्ये काम करताना त्यांनी हे दंतभरण तयार करण्यात यश मिळवले.
 6. त्यांनी अनेक दंत उत्पादने तयार केली असून, त्यांनी तयार केलेली दंतभरणे भक्कम असल्याने दंतरोगतज्ज्ञांकडे वारंवार जाण्याची वेळ येत नाही.
 7. त्यांच्या या संशोधनाने थ्री एम कंपनीला दोन अब्ज डॉलर्सचा फायदा झाला हेही एक व्यावसायिक यश आहे.
सुमिता मित्रा
 1. मित्रा या मूळ पश्चिम बंगालच्या असून, कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी घेतली. कार्बनी रसायनशास्त्रात त्यांनी कोलकाता विद्यापीठातून एमएस्सी पदवी घेतली.
 2. उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी मिशिगन विद्यापीठातून कार्बनी व बहुवारिक रसायनशास्त्रात पीएचडी केली.
 3. थ्री एम कंपनीतील ३० वर्षांच्या सेवेनंतर २०१०मध्ये त्या निवृत्त झाल्या, आता त्या मित्रा केमिकल कन्सलटन्सी ही कंपनी त्यांच्या पतीसह चालवतात.
 4. सुमिता यांनी एकूण १२० शोधनिबंध लिहिले आहेत. २००९मध्ये त्यांना हिरोज ऑफ केमिस्ट्री पुरस्काराने गौरवण्यात आले.


Famous Kathakali dancer, Madavoor Vasudevan Nair passed away

 1. केरळचे प्रसिद्ध कथकली नर्तक मदावूर वासुदेवन नायर यांचे आंचल येथील अगस्त्यकोड महादेव मंदिरात कथकली नृत्य सादर करीत असताना निधन झाले.
 2. कथकली नृत्याची अजोड समर्पणाने आराधना केलेल्या नायर यांना आपल्या आवडत्या कलेची आराधना करीत असतानाच मृत्यू आला.
 3. तिरुअनंतपुरम येथे ७ एप्रिल १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामा कुरूप हे लोकनर्तक होते तर आई शास्त्रीय गायिका.
 4. सुरुवातीला त्यांचा ओढा कर्नाटकी शास्त्रीय संगीत व भक्तिगीतांकडे होता. पण नंतर ते नृत्याकडे वळले.
 5. त्यांना कंबडीकाली व कुथीयोत्तम या लोकनृत्यप्रकारात विशेष प्रावीण्य होते. वयाच्या तेराव्या वर्षी नायर यांनी कथकलीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
 6. मदावूर परमेश्वरन पिल्ले हे त्यांचे कथकलीतील पहिले गुरू. नंतर ते कुरिची कुंजन पणिक्कर यांनी सुरू केलेल्या कथकली कलारी या संस्थेत दाखल झाले. नंतर ते पद्मश्री चेंगानूर रामन पिल्ले यांचे शिष्य बनले.
 7. ते काठी, पाचा, वेलाथाडी, मिनुकू पात्रांच्या आविष्करणात तरबेज होते. तसेच त्यांनी हनुमान, हंसम, रावण, दुर्योधन, कीचक, जरासंध, हिरण्यकश्यपू, नरकासुर हीपौराणिकपात्रेही साकारली.
 8. भारताशिवाय सिंगापूर, हाँगकाँग, फिजी, इंडोनेशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका या देशात त्यांचे कार्यक्रम झाले होते.
 9. थुलासीवनम पुरस्कार, अल्लापुझा क्लब पुरस्कार, केरळीय कलाक्षेत्र पुरस्कार, तपस्या अभिनंदन पत्र, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण (२०११) असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.


'A Century is Not Enough' - Autobiography of Sourav Ganguly

 1. सौरव गांगुली लिखित ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ: माय रोलर-कोस्टर राइड टु सक्सेस’ हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे.
 2. गौतम भट्टाचार्य यांच्या सहकार्याने त्यांचे हे पहिले पुस्तक आहे.
 3. ‘जगरनॉट’ हे प्रकाशक आहेत.
 4. सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार आहेत.
 5. 2002 साली, विस्डेन क्रिकेटर्सच्या 'अल्मनॅक’ ने त्यांना सहाव्या क्रमांकावर क्रम दिला, जो एकदिवसीय क्रिकेटपटूने प्राप्त केलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक आहे. 
 6. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 100 पेक्षा जास्त कसोटी आणि 300 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला एक खेळाडू आहे. 
 7.  सौरव गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 
 8. ते पद्मश्रीने सन्मानित आहेत.


Balarangbhoomi's born Sudha Karmarkar dies

 1. मराठी बालरंगभूमीच्या जन्मदात्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका सुधा करमरकर यांचे  हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले.
 2. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. मिलिंद करमरकर आहे. 
 3. शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नी दिला.
 4. यावेळी जयंत सावरकर, विजय केंकरे, लीला हडप, विलास गुर्जर, संजय क्षेमकल्याणी, प्रवीण कारळे, अरविंद पिळगावकर, अरुण काकडे, श्रीनिवास नार्वेकर, सुचित्रा बांदेकर, मधुरा वेलणकर, तुषार दळवी, विनय येडेकर, अशोक समेळ, रमेश भाटकर आदी उपस्थित होते.
 5. अखेरच्या श्‍वासापर्यंत सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीला वाहून घेतले होते.
 6. 2 ऑगस्ट 1969 रोजी केवळ बालनाट्याला वाहिलेली लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमीची स्थापना त्यांनी केली होती. या रंगभूमीसाठी त्यांनी आयुष्य वेचले. नाट्यशिक्षणासाठी करमरकर परदेशी गेल्या.
 7. त्यांनी अमेरिकेत बालरंगभूमी अभ्यासली. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली, आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले.


BJP MLA Hukum Singh passed away

 1. उत्तरप्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे आमदार हुकूम सिंह यांचे निधन झाले आहे.
 2. ते 82 वर्षांचे होते.
 3. हुकूम सिंह हे कैराना मतदारसंघामधून सभेवर सलग सातवेळा निवडून आलेले होते.
 4. ते उत्तरप्रदेशामधून सात वेळा विधानसभेवर निवडून आले होते.
 5. वर्तमानात आमदार बनल्यानंतर ते लोकसभा अध्यक्षच्या संसदीय समितीमध्ये सदस्य आणि भारत सरकारच्या जल मंडळ समितीचे अध्यक्ष देखील होते.


The famous cartoonist Chandi Lahiri passed away

 1. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चंडी लाहिरी यांचे निधन झाले. त्यांनी ५० वर्षे व्यंगचित्रकार म्हणून काम केले.
 2. साधेपणा व सोपेपणा ही त्यांच्या व्यंगचित्राची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या विनोदबुद्धीची धार तीक्ष्ण होती, पण त्यामुळे कधी कुणी दुखावले गेले नाही.
 3. त्यांचा जन्म १३ मार्च १९३१ रोजी नडिया जिल्ह्यात झाला. १९४२च्या राजकीय चळवळीत सहभागी होते.
 4. पत्रकारितेत त्यांची सुरुवात १९५२मध्ये दैनिक ‘लोकसेवक’ या बंगाली वृत्तपत्रात वार्ताहरम्हणून झाली. पण नंतर ते १९६१मध्ये व्यंगचित्रकलेकडे वळले.
 5. त्यानंतर ते ‘आनंदबझार पत्रिका’ समूहात काम करू लागले. त्यांची राजकीय व्यंगचित्रे ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत.
 6. भारताच्या राजकीय इतिहासाचे व स्वातंत्र्यलढय़ाचे सखोल ज्ञान त्यांना होते, ते त्यांच्या व्यंगचित्रातून जाणवत असे.
 7. कारकीर्दीच्या आरंभीच ट्राम अपघातात त्यांचा एक हात गेला होता तरी त्यावर मात करून ते जीवनात यशस्वी झाले.
 8. मिश्के, नेंगटी, बिदेशीदर चोखे बांगला, चंडीर चंडीपथ, बांगलार कार्टून इतिहास ही त्यांची बंगाली, तर चंडी लुक्स अराउंड व सिन्स फ्रीडम ही इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 9. कोलकाता दूरदर्शन केंद्रासाठी सचेतपटकार (ॲनिमेटर) म्हणूनही त्यांनी मोठे काम केले.
 10. तसेच रुद्रप्रसाद सेनगुप्ता यांच्या ऑबिराटो चेनामुख या मालिकेत त्यांनी रंगीत व्यंगचित्रांचे अ‍ॅनिमेशन केले होते.
 11. संवेदनशील मनाच्या चंडीदांनी बाल कर्करोग रुग्णालयासाठी मोफत व्यंगचित्रे काढून दिली होती.
 12. बंगाल व कोलकाता या दोन विषयांवर त्यांना व्यंगचित्र मालिका काढायची होती. त्यांनी ती तयारही करून दिली, पण ती पुस्तकरूपात येणे राहिले.

 


Bollywood's 'Detective Nanny' is behind the scenes of the era

 1. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘देवदास’ या चित्रपटात शाहरुखच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या अवा मुखर्जी यांचे निधन झाले.
 2. वयाच्या ८८व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 3. चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलेल्या अवा मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
 4. चित्रपटांसोबतच त्यांनी जाहिराती आणि छोट्या पडद्यावरही मोलाचे योगदान दिले.
 5. अवा मुखर्जी यांनी १९६३ मध्ये एका बंगाली चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली.
 6. तारु मुखर्जी दिग्दर्शित ‘राम ढाका’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
 7. त्यानंतर २००० मध्ये ‘स्निप’ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. पुढे २००२ मध्ये अवा यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटात शाहरुखच्या आजीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
 8. राम गोपाल वर्मा यांच्या ‘डरना जरुरी है’ या चित्रपटातही त्या झळकल्या होत्या.
 9. २००९ मध्ये अवा यांची मुलगी रोमिला मुखर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टिव नानी’ या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळाल्या.
 10. अवा मुखर्जी यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून सोशल मीडियावरही त्यांना अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Pandit Buddudev Dasgupta, the famous sarod player, passed away

 1. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध सरोद वादक पंडित बुद्धदेव दासगुप्ता यांचे १५ जानेवारी रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
 2. बुद्धदेव दासगुप्ता यांचा जन्म १ फेब्रुवारी १९३३ रोजी बिहारमधील भागलपुर येथे झाला. घरातील संगीतामय वातावरणामुळे त्यांनाही सुरुवातीपासून संगीतात रूचि निर्माण झाली.
 3. त्यांनी सरोद उस्ताद संगीताचार्य राधिका मोहन मित्र यांच्याकडून सरोद वादनाचे धडेघेतले. घराण्याच्या परंपरेत राहून वेगळी वाट चोखाळणारे सरोदिये म्हणून त्यांची ओळख होऊ लागली.
 4. सरोदवर रबाब या वाद्यातील विशिष्ट शैली त्यांनी आत्मसात केली. त्याबरोबरच या वाद्यावर तालवाद्यातील बोलकारीचाही अंतर्भाव केला.
 5. रागदारी संगीतात रवींद्र संगीताचा मिलाफ कसा करता येईल, याचा विचार त्यांनी केला, त्यामुळेही त्यांचे सरोदवादन वेगळेपणाने उठून दिसू लागले.
 6. संगीत प्रभाकर आणि संगीत प्रवीण या पदव्या त्यांना मिळाल्या. आकाशवाणीवरील एक नामांकित वादक म्हणून त्यांना मान्यता मिळाली.
 7. संगीत नाटक अकादमी, शिरोमणी पारितोषिक, अल्लादीन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांबरोबरच २०१२साली भारत सरकारचा पद्मभूषण हा किताबही त्यांना मिळाला.
 8. त्यांच्या जीवनावर आधारित ‘बामानेर चंद्रस्पर्शविलास’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
 9. २००४मध्ये हे पुस्तक बंगाली आत्मकथांमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले.
 10. सरोद वादनातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल २०११मध्ये त्यांना पद्मश्री किताब प्रदान करण्यात आला. परंतु दासगुप्ता यांनी तो नाकारला.


Writings by Google Dudal to author Mahaswad Devi

 1. साहित्यक्षेत्रात आपल्या लेखनशैलीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या लेखिका म्हणजे महाश्वेतादेवी.
 2. त्यांच्याजयंतीनिमित्त गुगल या सर्च इंजिनने  डुडलद्वारे महाश्वेतादेवींना अभिवादन केले आहे.
 3. 14 जानेवारी 1926 रोजी महाश्वेतादेवींचा जन्म आता बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये झाला.
 4. त्यांच्या आईचे नाव धरित्री देवी आणि वडिलांचे नाव मनिष घटक असे होते. हे दोघेही साहित्यिक होते.
 5. त्यांच्याकडूनच महाश्वेतादेवींना लेखनाचे धडे मिळले.
 6. भारताची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब पश्चिम बंगालमध्ये आले.
 7. महाश्वेता देवी यांनी विश्वभारती विद्यापीठ आणि शांतीनिकेतन मधून इंग्रजी विषय घेऊन बी.ए. केले. तर कोलकाता विद्यापीठातून एम.ए. केले.
 8. शिक्षिका आणि पत्रकार म्हणून महाश्वेतादेवींनी दीर्घकाळ काम केले.
 9. महाश्वेता देवी यांचे पहिले पुस्तक 1956 मध्ये प्रकाशित झाले. 'झांसी की रानी' असे या पुस्तकाचे नाव होते.
 10. रुदाली, हजार चौरासी की माँ, माटी माई या त्यांच्या पुस्तकांवर सिनेमांचीही निर्मिती करण्यात आली.


Top

Whoops, looks like something went wrong.