RAMESH BHATKAR

 1. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचा वयाच्या 70व्या वर्षी (4 फेब्रुवारी) निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 2. रमेश भाटकर यांचा रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोटा पडदा अशा तिन्ही मंचावर वावर होता. मात्र त्यांचं खरं प्रेम हे रंगभूमीवरच होतं. आजपर्यंत त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं असून त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

 3. रमेश भाटकर यांना खरी ओळख रंगभूमीमुळे मिळाली. त्यांच्या अनेक नाटकांचं आजही आवर्जुन नाव घेतलं जातं. 1975 साली रंगमंचावर सादर झालेल्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकामुळे रमेश भाटकर यांची वेगळी ओळख निर्माण झाली. या नाटकात ते मुख्य भूमिकेत झळकले होते.

 4. या नाटकांव्यतिरिक्त अशी बरीच नाटक आहेत ज्यामध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘मुक्ता’, ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘देणाऱ्याचे हात हजार’ या नाटकांमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले असून या नाटकांनी त्याकाळी रंगभूमी गाजविली होती.

 5. विशेष म्हणजे रमेश भाटकर यांनी 50 हून अधिक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले होते. तर गेल्या वर्षी त्यांना 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.


Field medal winner, British mathematician Michael Atiyah passes away

 1. जागतिक ख्यातीचे ब्रिटिश गणितज्ञ डॉ. मायकेल अटियाह यांचे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
 2. गणित आणि भौतिकशास्त्राला आयझॅक न्यूटन यांच्या एकत्रित करण्याच्या पद्धतीनंतर, तेव्हापासून 1960च्या दशकात प्रथमच एखाद्याने ती पद्धत अवलंबली होती आणि ती व्यक्ती म्हणजे मायकेल अटियाह.
 3. डॉ. अटियाह 1990 च्या दशकात लंडनमधील रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. ते एडिनबर्ग विद्यापीठात स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्सचे मानद प्राध्यापक देखील होते.
 4. डॉ. अटियाह 20 व्या शतकातले एक सर्वात महत्त्वाचे गणितज्ञ म्हणून समजले जात होते.
 5. ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांमध्ये असताना इसाडोर सिंगर यांच्या सहकार्याने त्यांनी स्ट्रिंग सिद्धांत आणि गेज सिद्धांत यासंदर्भात गणित आणि भौतिकशास्त्र या दोन क्षेत्रामधील एक अप्रत्यक्ष संबंध शोधून काढला. त्यांनी के-सिद्धांत, अटियाह-सिंगर इंडेक्स प्रमेय, इंडेक्स सिद्धांत असे नवे सिद्धांत मांडले, जे भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण ठरलेत.
 6. डॉ. अटियाह यांनी जगात शांती प्रस्थापित करण्यामध्ये देखील योगदान दिले होते.
 7. ते सन 1997-2002 या काळात ‘विज्ञान आणि जागतिक कल्याण विषयक पगवाश परिषद’चे अध्यक्ष होते.
 8. त्या काळात त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुशक्तीवरून चाललेला वाद सोडविण्यामध्ये आणि मध्य-पूर्व क्षेत्रात तणाव कमी करण्यामध्ये मध्यस्थी घेतली होती.
 9. त्यांना त्यांच्या कार्यासाठी गणित क्षेत्रातले दोन सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले, ते म्हणजे – त्यांच्या शोधासाठी 1966 साली फील्ड पदक तर 2004 साली अॅबेल पारितोषिक. शिवाय बरेच सन्मान देखील प्राप्त झाले होते.


Neha Narkhede In America's top-tech women

 1. फोर्ब्सने नुकतीच 2018 या वर्षाची औद्योगिक क्षेत्रातील टॉप 50 महिलांची यादी जाहीर केली आहे.
 2. जगभरातील महिलांचा यामध्ये समावेश असला तरीही भारतीयांसाठी आणि मराठी लोकांसाठी ही यादी विशेष खास आहे. 
 3. कारण यामध्ये चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश असून त्यातील एक महिला मराठमोळी आहे.
 4. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी महिला आपले स्थान निर्माण करत असल्याचे  चित्र आहे.
 5. नेहा नारखेडे या मराठमोळ्या तरुणीने यामध्ये बाजी मारल्याने मराठी लोकांसाठी तर ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.
 6. नारखेडे यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्या कोफ्लूएंट या कंपनीच्या  सहसंस्थापक आहेत.
 7. सुरुवातीला त्यांनी लिंक्डइन या कंपनीत सॉफ्टवेअर इंदिंनिअर म्हणून काम केले.
 8. अपाची काफका हे सॉफ्टवेअर विकसित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
 9. तर नेटफ्लिक्स, गोल्डमॅन सॅशे आणि उबर यांसारख्या कंपन्या नारखेडे यांच्या कंपनीच्या ग्राहक कंपन्या आहेत.
 10. नारखेडे यांचे वय अवघे 32 असून त्यांनी या यादीत 35व्या स्थान पटकावले आहे.


Brigadier Kuldip Singh Chandpuri, hero of Battle of Longewala during the 1971 Indo-Pak war dies at 78

 1. 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या ब्रिगेडियर (निवृत्त) कुलदीप सिंग चंदपुरी यांचे मोहालीत निधन झाले.
 2. ते 78 वर्षांचे होते.
 3. राजस्थान येथील लोगेंवाला सीमेवर पाकिस्तानकडून दिनांक 5 आणि 6 डिसेंबर 1971 रोजी मध्यरात्री हल्ला करण्यात आला होता.
 4. यावेळी पंजाब तुकडीचे नेतृत्व कुलदीप सिंग चंदपुरी यांनी केले होते.
 5. या युद्धात त्यांनी भारताला विजय मिळवून दिला होता.
 6. कुलदीप सिंग यांना त्यांच्या या शौर्यासाठी महावीरचक्राने सन्मानित करण्यात आले.


stan-lee-creator-of-spider-man-and-other-marvel-superheroes-dead-at-95

 1. जगप्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक स्टेन ली यांचे 12 नोव्हेंबर रोजी निधन झाले. 
 2. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 3. स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क यांच्यासारख्या सुपरहिरोंच्या पात्रांची निर्मिती करणाऱ्या स्टेन ली यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 
 4. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा अशी ली यांची ओळखहोती.
 5. स्टेन ली यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलीने दिली. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 
 6. ली यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता.
 7. सन 1961 मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले. त्यानंतर यामध्ये स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला.
 8. स्टेन ली काही हॉलीवूड चित्रपटांमध्येदेखील दिसले होते.


N. D. Tiwari passes away

 1. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
 2. दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सप्टेंबर महिन्यात पक्षाघाताचा झटका आल्याने तिवारी यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 3. तिवारी यांचा जन्म नैनितालमधील बलौटी गावात ऑक्टोबर १९२५ साली झाला होता. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले.
 4. राज्यशास्त्रात त्यांनी एमए केले होते. यानंतर त्यांनी एलएलबीदेखील केले. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते काँग्रेसशी संबंधित विद्यार्थी संघटनेत सामील झाले.
 5. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते राजकारणात उतरले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे दुर्मिळ योगायोगही त्यांच्या नशिबी आला.
 6. गांधी घराण्याचे निकटवर्तीय असल्याने १९७६ मध्ये त्यांना पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदावर संधी मिळाली.
 7. १९८४ मध्ये ते पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. मात्र, विजयाच्या दोन महिन्यांनंतरच एन. डी. तिवारी यांची उचलबांगडी करण्यात आली.
 8. तिवारी १९८८ मध्ये तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, १९८९ मधील निवडणुकीत काँग्रेसचा उत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभव झाला.
 9. तिवारी यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. मात्र, तिन्ही वेळा त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहता आले नाही. ते राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये खासदारही होते.
 10. २००२ साली ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले. तिवारी यांनी २००७ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशचे राज्यपालपद सांभाळले होते. त्या वेळी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने त्यांनी राजीनामा दिला.
 11. एन. डी. तिवारी आणि वाद:-
  1. रोहित शेखर या तरुणाने २००७मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका करून एन. डी. तिवारी हे आपले जैविक पिता असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी केली होती.
  2. न्यायालयाने तिवारी हे रोहितचे पिता असल्याचे जाहीर केल्यानंतर तिवारी यांनीही हे मान्य केले.
  3. त्यानंतर उज्ज्वला शर्मा यांनी तिवारी यांच्या घरासमोर निदर्शने केली होती. शेवटी तिवारी यांनी आपल्या आयुष्यात तिला प्रवेश दिला.


/professor-k-j-purohit-aka-shantaram-dies-at-the-age-of-95

 1. ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांचे बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वांद्रे येथील साहित्य सहवासमधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
 2. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री १० वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 3. पुरोहित यांनी १९८९ मध्ये अमरावती येथे झालेल्या ६२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. कथाकार म्हणून त्यांचा नावलौकिक मोठा होता.
 4. पुरोहित यांचे पूर्ण नाव केशव जगन्नाथ पुरोहित. त्यांनी 'शांताराम' या टोपणनावाने लेखन केले.
 5. सन १९८९मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. पुरोहित यांचा जन्म नागपूरचा.
 6. त्यांनी कर्मभूमी म्हणून मुंबईची निवड केली. नागपूर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
 7. जोगेश्वरीच्या ईस्माइल युसुफ महाविद्यालयात ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते. जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते.
 8. गृहस्थी लेखक हरपले:- 
  1. ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांना सन २०११चा राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यांनी विपुल कथालेखन केले.
  2. शांताराम यांनी कथांमधून वेगवेगळे विषय हाताळले. त्यांच्या लेखनामध्ये स्थिरता होती. तसेच ते गृहस्थी लेखक म्हणून मानले जायचे.
  3. अंधारवाट, आठवणींचा पार, उद्विग्न सरोवर, काय गाववाले, चंद्र माझा सखा, चेटूक, छळ आणि इतर गोष्टी, जमिनीवरची माणसं, ठेवणीतल्या चीजा, धर्म, मनमोर, रेलाँ रेलाँ, लाटा, शांताराम कथा, शिरवा, संत्र्यांचा बाग, संध्याराग, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे (अनुवाद) आदी पुरोहित यांची साहित्य संपदा आहे.


Due to the demise of Kashinath Wadekar, mourning at the literary movement

 1. मुळचे सांगलीकर असलेले सहित्यिक प्रा. काशीनाथ बंडो वाडेकर यांनी आपले अर्धे आयुष्य सावंतवाडीत प्राध्यापक म्हणून काढले आहे.
 2. प्राध्यापक आणि एक यशस्वी साहित्यिक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्गाचीसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे.
 3. येथील साहित्य चळवळीचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता. आरती मासिकातील मात्रा आणि वेलांट्या हे सदर तर त्यांचे खूपच गाजले होते. त्यांच्या या सदरांची दखल खुद्द कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी ही घेतली होती. तसेच त्यांच्या या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावनाही दिली होती.
 4. प्रा. काशीनाथ वाडेकर हे मूळचे सांगली येथील पण त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हा सावंतवाडीमध्ये घालवला.
 5. ते येथील पंचम खेमराज महाविद्यालयात मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी वर्गाबरोबरच सावंतवाडीतील सर्वच क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे जवळचे संबध होते.
 6. वाडेकर सरांना पूर्वीपासूनच लेखनाची आवड होती. त्यामुळे त्यांनी आपला बराच काळ हा सिंधुदुर्गातील सहित्य क्षेत्रात घालवला.
 7. ते कोकण मराठी साहित्य परिषदेशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांचा आरती मासिकाशी विशेष संबध आला. त्यांनी आरती मासिकामध्ये मात्रा आणि वेलांटी हे सदर सुरू केले.
 8. हे सदर त्यांचे विशेष गाजले होते. सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे हे सदर होते. त्यांच्या या सदराची तेव्हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांनीही विशेष दखल घेतली होती.
 9. त्यानंतर मात्रा व वेलांट्या या नावाने पुस्तकही प्रसिद्ध झाले. त्याला पाडगावकर यांनी खास अशी प्रस्तावनाही दिला होती. अनेक जण आरती मासिकातील मात्रा व वेलांटी हे सदर वाचण्यासाठी उत्सुक असायचे. त्यामुळे मात्रा व वेलांटीमुळे सरांचे विशेष नाव झाले आणि ते साहित्य क्षेत्रात नावारूपास येऊ लागले.
 10. सावंतवाडीत मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या आयोजनातही सरांचा मोठा वाटा होता. सर फु. मा. भावे या राज्यस्तरावर संस्थेचे सहकार्यवाह म्हणून काम पाहात होते. ते आणि कै. प्रा. रमेश चिटणीस यांच्यात चांगला स्नेह होता.
 11. चिटणीस यांचे निधन झाल्यानंतर प्रा. वाडेकर यांनी त्यांच्यावर विशेष असे आनंदयात्री हे पुस्तक लिहले होते. आणि ते स्वखर्चाने प्रसिद्ध केले होते.
 12. सावंतवाडीत असताना त्यांनी अनेक कथा कादंबऱ्याही लिहील्या आहेत. अनेक लेखकांच्या कथा कादंबऱ्यांवर समिक्षा किंवा चर्चा ते घडवून आणत असत. सावंतवाडीतील नाट्यदर्शन चळवळीशी त्यांचा जवळचा संबध होता. त्यानी अनेक नाटकात स्वत: हून काम केले आहे.
 13. साहित्य चळवळीशी जोडले गेल्याने त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले होते. सावंतवाडीत झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाला वाडेकर सर यांनी खास उपस्थिती लावली होती. सिंधुदुर्गमध्ये साहित्याच्या संबधित कोणतेही काम असले की वाडेकर सर पुढे असायचे.
 14. आपली ३५ वर्षे त्यानी प्राध्यापक म्हणून सावंतवाडीत घालवली. या काळात ते शहरातील माठेवाडा भागात राहात असत. पंचम खेमराज महाविद्यालयातून ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मूळ सांगली येथे जाणे पंसत केले. मात्र त्यांचे सावंतवाडीवरचे प्रेम कमी झाले नाही.
 15. कोकण मराठी साहित्य परिषद असो अगर सावंतवाडीतील साहित्यातील कोणतीही घडामोड असू दे वाडेकर सर हे सावंंतवाडीत येणारच, असे ठरले होते.

 


Microsoft's co-founder Paul Allen passed away

 1. जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे. काही वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.
 2. त्यानंतर सोमवारी (15 ऑक्टोबर) कर्करोगाने त्यांचे निधन झाले आहे.
 3. पॉल यांच्या 'वल्कन इंक' या कंपनीने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
 4. 2009 पासून ते कर्करोगावर उपचार घेत होते.
 5. पॉल अॅलन आणि त्यांचा बालपणीचा मित्र बिल गेट्स यांनी मिळून 'मायक्रोसॉफ्ट' या कंपनीचा पाया रचला होता.
 6. 1975 मध्ये त्यांनी 'मायक्रोसॉफ्ट'ची स्थापना केली आणि काही काळातच 'मायक्रोसॉफ्ट' ही एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी बनली.


After 111 days fast G. D. Agrawal passed away

 1. गंगा नदी वाचवण्यासाठी गेल्या 111 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले कानपूर IITचे माजी प्राध्यापक जी. डी. अग्रवाल यांचे दिनांक 11 ऑक्टोबरला निधन झाले.
 2. गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार पातळीवर कोणत्याही उपायोजना न झाल्याच्या निषेधार्थ अग्रवाल आमरण उपोषणाला बसले होते.
 3. ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 4. अग्रवाल स्वामी ग्यान स्वरुप सानंद म्हणूनही ओळखले जात.
 5. त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले होते.
 6. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली होती.


Top

Whoops, looks like something went wrong.