MPSC chalu ghadamodi, current affairs

1. एकवीस वर्षीय मंयक प्रताप सिंह हा तरुण विधी सेवा परीक्षा 2018 उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कोर्टाचे कामकाज पाहणार आहे.

2. तर 21 व्या वर्षीच तो आता कोर्टात निकाल सुनावणार आहे. या अभुतपूर्व यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

3. तसेच मयंकने सन 2014 मध्ये राजस्थान विद्यापीठातून पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. त्याचा हा कोर्स याच वर्षी पूर्ण झाला आहे.

4. सन 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा 23 वर्षे होती. मात्र, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 21 वर्षे केली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतामध्ये दररोज सुमारे २५ हजार टनांपेक्षा अधिक प्लास्टिकचा कचरा जमा होतो. त्यापैकी ४० टक्के कचरा गोळाही केला जात नाही. तो रस्ते आथवा अन्यत्र ठिकाणी पडून असतो. या कचऱ्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरोच्या काळात दिली.

2. केंद्रीय पर्यावर नियंत्रण मंडळाने देशातील ६० मुख्य शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार येथे दररोज ४,०५९ टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो.

  • देशात ४,७७३ नोंदणीकृत प्लास्टिक पुनर्प्रक्रिया केंद्र आहेत.
  • रोज जमा होणाऱ्या एकूण प्लास्टिकच्या कचऱ्याच्या ६० टक्के म्हणजेच १५,३८४ टन कचरा गोळा करून त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यापासून विविध उत्पादने तयार केली जातात.
  • उर्वरित ४० टक्के अर्थात सुमारे १०,५५६ टन कचरा गोळाच केला जात नाही.
  • स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात; २०२२पर्यंत एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा केंद्राचा मानस आहे.
  • २०१६मध्ये केंद्र सरकारने प्लास्टिकच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी नियमावली तयार केली होती.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. वाढत्या कर्जभाराच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांना दिलासा देताना केंद्र सरकारने ध्वनिलहरींसाठी त्यांनी भरावयाचे उर्वरित हप्ते पुढील दोन वर्षांसाठी न भरण्याची मुभा दिली आहे.

2. सरकारच्या ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या दूरसंचार कंपन्यांना द्यावा लागणाऱ्या रकमेपासून पुढील दोन वर्षांसाठी मोकळीक मिळाली आहे. मात्र या कंपन्यांना याच ध्वनिलहरींसाठी देय असलेल्या रकमेवरील व्याज मात्र भरावे लागणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

3. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या निर्णयानुसार, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओला आता 2020-21 व 2021-22 करिता एकूण 42,000 कोटी रुपये लगेच चुकते करण्याची गरज राहिलेली नाही. निरंतर तोटा नोंदवत असलेल्या आणि भांडवलाची चणचण असलेल्या या कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. शबरीमला मंदिराच्या प्रशासकीय बाबींसाठी वेगळा कायदा केरळ सरकारने करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

2. न्या. एन.व्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सांगितले की, या कायद्याचा मसुदा नवीन वर्षांत जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत सादर करण्यात यावा.

3. शबरीमला हे प्राचीन देवस्थान असून भक्त कल्याणाच्या पैलूंसह अनेक बाबींच्या समावेशासह नवीन कायदा तयार करण्यात यावा असे न्यायालयाने म्हटले आहे.

4. दरम्यान या मुद्दय़ावर सप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात 10-50 वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाच्या मुद्यावरील सुनावणीवेळी वाद झाला होता.

5. राज्य सरकारने म्हटले आहे,की तूर्त तरी मंदिर सल्लागार समितीत पन्नास वयावरील महिलांना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. छोट्या किराणा दुकांनांना ई-कॉमर्स कंपन्यांच्या तुलनेत मदत करण्यासाठी सरकार नॅशनल रिटेल फ्रेमवर्क तयार करत आहे.

2. याअंतर्गत एकदाच नोंदणी शुल्क, वर्किंग कॅपिटलसाठी सॉफ्ट लोन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंटसारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. सध्या एका नॅशनल फ्रेमवर्कवर काम सुरू करण्यात आले असून राज्य त्यावर काम करू शकतात, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

3. किरकोळ बाजाराशी निगडीत विषय हे राज्य सरकारच्या अंतर्गत येतात. सर्व राज्यांनी या किरकोळ बाजारासाठी वेगवेगळी योजना आखली आहे.

4. ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड’ या संस्थेनं सर्व राज्यांना अशा दुकानांची यादी सोपवण्यास सांगितलं आहे. देशाच्या जीडीपीमध्ये लोकल ट्रेडचा 15 टक्के हिस्सा आहे.

5. देशात सहा कोटींपेक्षा अधिक बिझनेस एन्टप्राईझेस आहेत. डोमेस्टीक ट्रेडमधून 25 कोटी लोकांना रोजगार मिळतो आणि हा आकडा दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढतो, असा अंदाज बांधण्यात येतो.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आसाम सरकारने अरुंधती योजनेला नववधूंना 1 तोळा सोनं मोफत देण्यास मान्यता दिली. गुवाहाटी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी समाजातील दुर्बल घटकातील नववधू पालकांना 1 तोला सोनं (11.66 ग्रॅम) देण्याची या योजनेला मंजुरी दिली.

2. बाल विवाह प्रतिबंध कायद्यात बालविवाह कमी करण्याच्या उद्देशाने आणि मुलीचे लग्न  वय 18 वर्ष आधी होऊ शकत नाही आणि 21 वर्षापूर्वीच मुलगा लग्न करू शकत नाही, याची औपचारिक नोंदणी करून ही योजना मिळू शकते. विवाहाच्या वेळी विशेष विवाह (आसाम) नियम 1954 अंतर्गत विवाह. हे केवळ समाजातील दुर्बल वर्गापुरते मर्यादित आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न जात, पंथ, धर्म इत्यादीकडे दुर्लक्ष करून 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

3. या योजनेंतर्गत वधू आणि तिचे पालक (वडील, आई) यांचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त 5 लाख रुपये असावे. चहा बाग आणि आदिवासी जमातींसाठी सुरुवातीला किमान शैक्षणिक पात्रता शिथिल करण्यात आली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लवकरच ‘रामसर’चा दर्जा मिळणार असल्याचे संकेत येथे सुरू असलेल्या पाणथळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाले. बॉम्बे नॅचरल सोसायटी (बीएनएचएस)ने ही परिषद आयोजित केली आहे.

2. नवेगाव बांध, माहुल (शिवडी खाडी), हतनूर धरण, ठाणे खाडी, नांदूर मधमेश्वर, लोणारसह जायकवाडी धरण परिसराला ‘रामसर’चा दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यातील नांदूर मधमेश्वर आणि लोणारला लवकरच संमती मिळेल, असे सूतोवाच मँग्रोव्ह फाऊंडेशनचे अप्पर प्रधान वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी केले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त दिले होते.

3. ‘रामसर’च्या यादीत भारतातील 26 पाणथळ जागांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. या दोन जागांच्या समावेशामुळे महाराष्ट्रही या यादीत झळकेल.

4. नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या 265 प्रजातींची नोंद झाली आहे.

5. रामसरमध्ये आढळणाऱ्या 148 स्थलांतरित पक्ष्यांपैकी 88 प्रजाती नांदूर मधमेश्वरमध्ये आढळतात. या अभयारण्यात एकूण 5 हजार 687 पक्षी आढळले आहेत.

6. तर हे सर्वात छोटे पक्षी अभयारण्य आहे. विविध प्रजातींच्या पक्षांचे अस्तित्व इथे आहे. सरोवरातील पाण्याचा सामू (पीएच) 10.5 असून यातील स्पुरूलिना शैवालामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. अरुणाचल प्रदेश राज्य पर्यटन विभाग आणि भागधारकांना नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बेस्ट इमर्जिंग ग्रीन टूरिस्ट डेस्टिनेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. ट्रॅव्हल अँड लेजर मॅगझिनने हा पुरस्कार प्रदान केला. दिया मिर्झा यांना हा पुरस्कार मिळाला.

2. हरित पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी विभागाच्या अथक परिश्रमांना या पुरस्काराने मान्यता दिली. विजेत्यास मासिकाच्या एका ऑनलाइन पोलद्वारे निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये वाचकांनी आपले मत व्यक्त केले.

3. अरुणाचल प्रदेश हे जगातील शेवटचे खरोखर न पाहिलेले ठिकाण आहे. हे पर्यटकांना एक विस्मयकारक अनुभव देते. शाश्वत पर्यटनाद्वारे राज्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाच्या प्रयत्नांना चालना देण्याचे उद्दीष्ट बेस्ट उदयोन्मुख ग्रीन टूरिस्ट डेस्टिनेशन अवॉर्डचे आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

2. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.

3. भारत पेट्रोलिअम कॉर्पोरशन लिमिटेडने (बीपीसीएल) सचिवांच्या एका गटाने ऑक्टोबरमध्ये सरकारची पूर्ण 53.29 टक्के हिस्सा विक्रीसाठी सहमती व्यक्त केली होती. बीपीसीएलचा बाजार भांडवल सुमारे 1.02 लाख कोटी रुपये आहे.

4. तर याची 53 टक्के हिश्याच्या विक्रीसह 65000 कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होईल अशी सरकारला आशा आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पदाची शपथ दिली. बोबडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे.

2. न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द 17 महिन्यांची असेल आणि ते सरन्यायाधीश पदावरून 23 एप्रिल 2021 या दिवशी निवृत्त होतील.

3. तसेच सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त झाले. सरन्यायाधीशपदी त्यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली आहे. दरम्यान, न्याय संस्थेतील सर्वोच्च पदावर विराजमान होणारे न्यायमूर्ती शरद बोबडे हे चौथे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. तर त्यांच्यापूर्वी न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह, न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचुड यांनी सरन्यायाधीशपदी काम केलं आहे.

4. 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी न्यायमूर्ती बोबडे मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. 12 एप्रिल 2013 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली.


Top