MPSC chalu ghadamodi, current affairs

1. विप्रो कंपनीचे एके काळचे प्रमुख अझीम प्रेमजी हे आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले. फोर्ब्ज मासिकाने आशियातील 30 दानशूर व्यक्तींची यादी प्रकाशित केली असून, त्यात प्रथमच स्थानावर अझीझ प्रेमजी आहेत.

2. तर या 30 दानशूरांच्या यादीत भारतातील किरण मजुमदार-शॉ, त्यांचे पती जॉन शॉ व हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक व चेअरमन अतुल निशार यांचीही नावे आहेत.

3. तसेच अझीम प्रेमजी सुमारे 50 वर्षे विप्रोचे कार्यकारी संचालक होते. ते जुलैमध्ये निवृत्त झाले. नंतर त्यांनी आपण दानधर्म व समाजसेवा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी अझीम प्रेमजी फाऊडेशनला 760 कोटींचे समभाग देणगीपोटी दिले आहेत. ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करीत आहे. त्यांनी 21 अब्ज डॉलर्सची संपत्ती देणगीच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे.

4. बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉ व त्यांचे पती जॉन शॉ यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोला 53 कोटी 45 हजार लाखांची देणगी दिली. त्यांनी अन्य संस्थांना दिलेल्या देणग्यांची रक्कम ४0 कोटी रुपयांहून अधिक आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिल्याने आता त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अग्निशमन दलात आता 435 पदांची भरती केली जाणार आहे.

2. तर त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 250 पदे भरण्यात येणार असून त्यात महिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, सुमारे 81 महिलांचीही भरती केली जाणार आहे.

3. तसेच यासंदर्भातील जाहिरात येत्या 15 दिवसांच्या आत प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर साधारणपणे चार महिन्यांच्या आत त्या अग्निशमन दलात सामील होणार आहेत.

4. अग्निशमन दलात महिलांना स्थान देणारी ठाणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. यंदा भारतीय उपखंडातील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात गेल्या सव्वाशे वर्षातील सर्वाधिक 12 चक्रीवादळे निर्माण होण्याचा प्रकार घडला.

2. तर त्यातील 7 चक्रीवादळे ही अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़. एकावेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रकार अरबी समुद्रात यंदा दोनदा झाले आहेत़.

3. तसेच सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात 7 चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़.

4. हवामान विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडीवारीनुसार 1891 पासून गेल्या 128 वर्षात प्रथमच अरबी समुद्रात इतकी चक्रीवादळे व कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाली आहेत़.

5. तर यापूर्वी 1998 मध्ये अरबी समुद्रात 6 चक्रीवादळे निर्माण झाली होती़. अरबी समुद्रात यंदा चक्रीवादळांची संख्या वाढली असतानाच बंगालच्याउपसागरातील चक्रीवादळाच्या संख्येत मात्र घट झाली आहे़.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशभरात वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय (एमबीबीएस/ बीडीएस) अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश (नीट) परीक्षा 3 मे रोजी घेण्यात येणार आहे.

2. तर या परीक्षेच्या आधारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण-संशोधन संस्थेसह (जेआयपीएमईआर) देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व वैद्यकीय अभ्यासकम्रांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.

3. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे (एनटीए) महासंचालक विनित जोशी यांनी सांगितले की, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेचा ताण कमी होईल. शिवाय विद्यार्थी आणि पालकांना खर्चही कमी लागेल.

4. तसेच मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जागी नॅशनल मेडीकल कमीशन स्थापन केले आहे.

5. आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, अ‍ॅलोपॅथी, युनानी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकाच परीक्षेचे आयोजन केले जाईल. त्याच आधारे प्रवेश दिले जातील. लेखी परीक्षा व्हावी, ही मंत्रालयाची शिफारस एनटीएने मान्य केली आहे. राज्यांच्या मागणीची दखल घेऊन यावेळी लेखी परीक्षा घेतली जाईल.

6. तर इंग्रजी आणि अन्य दहा भाषेत परीक्षा घेण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. नौदलाने दीर्घकालीन योजनेत तीन विमानवाहू युद्धनौका ताफ्यात सामील करण्याचे ठरवले आहे, असे नौदल प्रमुख अडमिरल करमबीर सिंह यांनी सांगितले.

2. तर स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका 2022 पर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

3. वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यास नौदल सज्ज आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 2022 पर्यंत कार्यान्वित होईल तसेच त्यावर मिग 29-के विमाने तैनात करण्यात येतील.

4. तसेच नौदलासाठी वार्षिक अर्थसंकल्पातील तरतूद गेल्या पाच वर्षांत 18 टक्क्य़ांवरून 13 टक्के झाली आहे. नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तरतुदीतील ही कपात योग्य नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. स्थलांतरित कामगार आणि रोजंदारी मजूर यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची 1 जून 2020 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.

2. तर या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.

3. बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

4. तसेच या योजनेचा लाभ मुख्यत्वे स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांना होणार आहे, हा वर्ग रोजगारासाठी सातत्याने देशभरात फिरतीवर असतो.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सलग दोन जीएसटी विवरणपत्रे न भरणार्‍या व्यावसायिकांना आता ई-वे बिल तयार करता येणार नाही. यामुळे त्याला मालवाहतूकही करता येणार नाही.

2. तर जीएसटी चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबाजवणी 1 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

3. जीएसटीकडे नोंदणीकृत व्यावसायिकांना पन्नास हजारांपेक्षा अधिक किमतीच्या मालवाहतुकीसाठी संगणकीकृत बिल बनवावे लागते. त्याला ई-वे बिल म्हणतात. वाहतुकीदरम्यान तपासणी झाली तर ते दाखवणे सक्तीचे आहे. त्यामुळे बिलाशिवाय मालवाहतूक शक्य होत नाही.

4. एखाद्या व्यावसायिकाने सलग दोन मासिक किंवा सहामाही विवरणपत्रे भरली नसतील तर. त्याची नाकेबंदी केली जाणार आहे. पुरवठादार आणि खरेदीदाराचे ई-वे बिल फायलिंग पोर्टल ब्लॉक केले जाईल. त्यामुळे दोघांनाही ई-वे बिल बनवता येणार नाही. कुरिअर व्यावसायिक आणि ऑनलाईन व्यावसायिक कंपन्यांनाही हा नियम लागू
आहे.

5. तसेच आंतरराज्य अणि राज्यांतर्गत अशा दोन्ही वाहतुकीला हा नियम लागू असेल. अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या 28 टक्के करदाते विवरणपत्रे नियमित भरत नाहीत. तरीही ई-वे बिल तयार करून मालवाहतूक करतात. व्यवसाय करूनही त्याचा कर भरला जात नसल्याचा संशय आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. हवाई दलानंतर आता नौदलालादेखील देशातील पहिली महिला पायलट मिळणार आहे. बिहारची शिवांगी स्वरूप ही देशातील पहिली नौदल पायलट बनणार आहे. ती कोच्चीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

2. तिला ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॅच लावण्यात येणार आहे.
नौदल कोच्चीच्या ऑपरेशन ड्यूटीमध्ये शिवांगी सहभागी होईल. ती
फिक्स्ड विंग डोर्नियर सर्विलांस विमान उडवेल. हे विमान कमी अंतराच्या समुद्री मिशनसाठी पाठवले जाते. यामध्ये आधुनिक सर्विलांस, रडार, नेटवर्किंग आणि इलेक्ट्रॉनिक सेंसर आहेत.

3. शिवांगीला मागील वर्षी जूनमध्ये व्हाइस एडमिरल एके चावला यांनी औपचारिकरित्या नौदलात सहभागी केले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. व्होडाफोन, आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ने मंगळवार, 3 डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे 50 टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले.

2. तर त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जियो’नेही 6 डिसेंबरपासून सुमारे 40 टक्के दरवाढीची घोषणा केल्याने मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

3. रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत.

4. तसेच मोबाइल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान 49 रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. खासगी क्षेत्रातील नोक-यांमध्ये भूमिपुत्रांसाठी 80 टक्के आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कायदा करेल, तसेच शेतक-यांना कर्जमुक्ती देऊन चिंतामुक्त करण्याची ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहातील अभिभाषणात दिली.

2. राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. महिलांना समान संधी आणि त्यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे.

3. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन व उच्च शिक्षण मोफत देण्याचा आटोकाट प्रयत्न राहील. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील 865 गावांतील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल.

4. तसेच नुकसानग्रस्त शेतक-यांना तत्काळ साहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, असेही राज्यपाल म्हणाले.


Top