MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मध्य प्रदेशच्या 18 वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने आर. आर. लक्ष्य चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर वरिष्ठ गटाचे रविवारी सुवर्णपदक पटकावले.

2. तर वर्षांच्या पूर्वार्धात 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिक पात्रता स्थान निश्चित करण्याची किमया साधणारा ऐश्वर्य पहिल्या 10 फैरींमध्ये राजस्थानच्या 16 वर्षीय यश वर्धनपेक्षा पिछाडीवर होता; परंतु 10.7, 10.8 आणि 10.9 असे सातत्याने गुण मिळवणाऱ्या ऐश्वर्यने एकूण 252.2 गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.

3. यशने 250.7 गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर हृदय हझारिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

4. गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

5. तसेच कनिष्ठ गटात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने 249.9 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर पवन अंधारेला रौप्यपदक मिळाले. सौरव लगडने कांस्यपदक पटकावले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली. राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला.

2. तसेच राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

3. तर यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.

4. हेमंत सोरेन हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. सोरेन यांच्यासह काँग्रेसचे विधिमंडळ नेते आलमगिर आलम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरान आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोक्त यांनी देखील यावेळी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं.

2. चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती.

3. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.

4. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1 .सार्वजनिक मालकीच्या दूरसंचार कंपन्या – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांच्या पुनर्घडणीसाठी 69 हजार कोटी रुपयांची योजना केंद्र सरकारने आखली असून, या योजनेच्या जलद गतीने अंमलबजावणीसाठी सात सदस्यांचा उच्चस्तरीय मंत्रिगटही आता स्थापण्यात आला आहे.

2. केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण करण्यासह, त्यांच्या फेरघडणीसाठी 69 हजार कोटी रुपये खर्चाची पुनरूज्जीवन योजना घोषित केली आहे. त्यानंतर दोन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आणि त्याला एकूण 92 हजार 700 कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी वेतन खर्चापोटी दरसाल 8 हजार 800 कोटी रुपयांची बचत या मोठा कर्जभार असणाऱ्या कंपन्यांना शक्य होणार आहे.

3. तसेच दोन्ही कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निर्धारीत योजनेच्या अंमलबजावणीसह, काही मालमत्तांची विक्रीतून निधी उभारणी तसेच 4जी ध्वनीलहरींचे या कंपन्यांना वाटपाच्या मुद्दय़ांचाही पाठपुरावा हे कृतीदल करणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

4. तसेच या आंतर-मंत्रिमंडळ स्तरावरील कृतीदलात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, दूरसंचारमंत्री रवी शंकर प्रसाद, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांचा समावेश आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तिहेरी तलाक पीडित महिलांना पुढील वर्षापासून पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तिहेरी तलाक पीडित महिलांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

2. तर यासंबंधीचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआर किंवा फॅमिली कोर्टातील खटल्याच्या आधारावर ही पेन्शन दिली जाणार आहे.

4. तसेच यासाठी सरकारने राज्यातील तिहेरी तलाक पीडित 5 हजार महिलांची नोंद घेतली आहे. पहिल्या टप्प्यात या पीडित महिलांसाठी पेन्शनची योजना लागू करण्यात येणार असल्याचे समजते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मुंबई आयआयटीच्या 3 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या टेकफेस्टमध्ये यावेळी हाँगकाँगमधून येणाऱ्या आईन्स्टाईन रोबो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. हॅन्सन रोबोटिक्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या रोबोची निर्मिती केली आहे.

2. तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोर उभ्या असणाया व्यक्तीच्या चेहयावरील भावनांना ओळखून समोरील व्यक्तीची भावना तो ओळखू शकतो. व्यक्ती आनंदी, दु:खी, संतप्त, घाबरलेली, गोंधळलेली आहे हे रोबो सांगेल. एवढेच नव्हे तर व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याचे वय किती याची माहितीही तो देईल.

3. तसेच या रोबोला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

4. मुंबई आयआयटीचे टेकफेस्ट यंदा 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या टेकफेस्टमध्ये 5 जानेवारी रोजी टेकवेडे आईनस्टाईनला भेटू शकतील. टेकफेस्टमध्ये येणायांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आईन्स्टाईनप्रमाणे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हा रोबो देईल, असा दावा आयोजकांनी केला आहे.

5. याआधी ह्युमनॉइड सोफिया नावाचा रोबो टेकफेस्टमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा सोफियाने ‘नमस्ते इंडिया’ म्हणून मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. सोफियापेक्षा हा रोबो अधिक विकसित आहे. कारण तो केवळ बोलणारच नाही तर भावभावना ओळखून त्याबाबत उपस्थितांशी संवाद साधेल, त्यांना यासंदर्भातील अधिक माहिती देईल, असे आयोजकांनी सांगितले.

6. आईन्स्टाईन व्यक्तीकडे बघून त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, त्याच्या भावना ओळखू शकतो. जसे की त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती आनंदात आहे की दु:खात हे रोबो ओळखू शकेल. एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती असेल तर तीदेखील तो अचूक ओळखेल, असे आयोजकांनी सांगितले. सोबतच त्या व्यक्तीचे लिंग, वय अशा बयाच गोष्टी हा रोबो सांगणार आहे. तसे प्रशिक्षणच आईन्स्टाईनला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आईन्स्टाईन हा हाँगकाँगचा रोबो असून तो भारतात पहिल्यांदाच येणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. वीस वर्षांपूर्वी 1999 च्या कारगिल युद्धात मोठी भूमिका पार पाडणारी मिग 27 विमाने शुक्रवारी सेवेतून काढून घेण्यात आली. या विमानांनी शुक्रवारी येथील विमानतळावरून शेवटचे उड्डाण केले.

2. भारतात ‘बहादूर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानांनी शांतता व युद्धकाळात मोठी भूमिका पार पाडली असून कारगिल युद्धात शत्रूच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकण्यात आघाडीवर होती. ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये ती सहभागी होती.

3. मिग 27 विमानांचा वापर काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सरावांमध्ये करण्यात आला होता.

4. तसेच रशियन बनावटीचे हे विमान असून त्याचे इंजिन शक्तिशाली होते. त्याच्या पंखांची भौमितिक रचना ही वैमानिकाला पंखाचा कोन सहज बदलता येईल अशा तऱ्हेने केलेली होती. आता ही विमाने 31 मार्च 2020 रोजी हवाई दलाच्या संग्रहालयात ठेवली जातील.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. रवाइन हॉटेलतर्फे आयोजित केलेल्या ‘एमएसएलटीए’ अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सालसा आहेरने दुहेरी मुकुट पटकावला.

2. तर एकेरी गटात तिने तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा पराभव केला, तर दुहेरी गटात युब्रानी बॅनर्जीच्या साथीने तेजस्वी काटे व सृष्टी दास जोडीला नमवले.

3. तसेच चौथ्या मानांकीत सालसाने तेलंगणाच्या दुसऱ्या मानांकित संस्कृतीचा 6-1, 6-1 एक तास, 10 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या अंतिम सामन्यात सालसाने पश्चिम बंगालच्या युब्रानीसह खेळताना महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि सृष्टीचे आव्हान 6-2, 6-3 असे मोडीत काढले.

4. पुरुष एकेरीत कर्नाटकच्या अव्वल मानांकित सूरज प्रबोधने महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित कैवल्य कलमसेचा 6-3, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. तरुण वयात नोकरी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या अनेक जणांना आपल्या वृद्धापकाळाची चिंता सतावत असते. त्यामुळे अनेक जण आपल्या कमावत्या वयात विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या जीवनाच्या उत्तरार्धासाठी आर्थित तरतूद करत असतात. दरम्यान, सरकारनेही अशी एक योजना आणली आहे.

2. ज्यामधये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

3. सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडून संचालित होणाऱ्या ”प्रधानमंत्री वय वंदन योजने”च्या माध्यमातून केंद्र सरकारने वयोवृद्धांसाठी पेन्शन योजनेची व्यवस्था केली आहे.

4. तर या योजनेसाठी किमान पात्रता वय 60 वर्षे इतके आहे. त्यामुळे वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

5. तसेच या योजनेंतर्गत 10 वर्षांपर्यंत एका विशिष्ट्य दराने पेन्शन मिळते. जर तुम्हाला 10 वर्षांनंतर पुन्हा पेन्शन सुरू करायची असेल तर पुन्हा एकदा या योजनेत गुंतवणूक करावी लागेल.

6. प्रधानमंत्री वय वंदन योजनेंतर्गत पेंशन मिळवण्यासाठी गुंतवणूकदारास एक विशिष्ट्य तारीख, बँक खाते आणि वेळेची निवड करावी लागते. जर तुम्हाला पेन्शन 30 तारखेला हवी असेल तर ती तारीख निवडावी लागेल. त्याचबरोबर गुंतवणूकदाराला मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पर्यायांसह पेन्शनच्या क्रेडिटसाठी वेळेचा पर्याय निवडावा लागेल.

7. या योजनेत एक व्यक्ती किमान दीड लाख आणि कमाल 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकते. तसेच पॉलिसी खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराने जमा केलेली रक्कम 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत मिळू शकेल.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. इंडियन एअर फोर्सचं अत्यंत घातक विमान MIG-27 आज सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-27 विमानांची तुकडी शेवटचं उड्डाण करणार आहे.

2. मिग-27 फायटर विमाने इंडियन एअर फोर्सच्या वैभवशाली परंपरेची साक्षीदार आहेत. मागच्या चार दशकापासून ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती.

3. जोधपूर एअर बेसवर मिग-27 ची शेवटची स्क्वाड्रन तैनात असून या स्क्वाड्रनमध्ये सात विमाने आहेत. “मिग-27 चे स्क्वाड्रन आज आपले शेवटचे हवाई कौशल्य सादर करेल. त्यानंतर ही विमाने निवृत्त होईल. देशभरात पुन्हा कुठेही ही विमाने उड्डाण करणार नाहीत.

4. भारताने 1980 च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत युनियन म्हणजे आताच्या रशियाकडून ही फायटर विमाने विकत घेतली होती.

5. कारगिल युद्धातील मिग-27 ची कामगिरी पाहून हे विमान चालवणाऱ्या फायटर वैमानिकांनी या विमानाला ‘बहादूर’ हे टोपण नाव दिले होते.

6. शक्तीशाली इंजिन असलेल्या मिग-२७ मध्ये मोहिमेच्या गरजेनुसार काही बदल करता यायचे.

7. कॉकपीटसह विमानातील अत्याधुनिक सिस्टिममुळे वैमानिकाला अत्यंत अचूकतेने शत्रूवर प्रहार करणे शक्य झाले. 20 वर्षांपूर्वी 1999 साली पाकिस्तान बरोबर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात मिग-27 ने अत्यंत उत्कृष्ट भूमिका बजावली.

8. कारगिल युद्धात हजारो फूट उंच शिखरावर दडून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर या विमानातून अत्यंत अचूकतेने बॉम्बफेक करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला आपल्या चौक्या सोडून पळ काढावा लागला. मागच्या काही वर्षात मिग-27 च्या अपघातामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे 2017 सालापासून भारतीय हवाई दलाने टप्प्याटप्प्याने या विमानांचा वापर बंद केला.

9. मिग-27 ने ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.

10. आयएएफची 29 क्रमांकाची स्क्वाड्रन फक्त अपग्रेडेड मिग-27 ऑपरेट करते. 10 मार्च 1958 साली ही स्कवाड्रन स्थापन झाली आहे.


Top