International Human Integration Day - 20th December

 1. दरवर्षी 20 डिसेंबरला देशादेशात आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस (International Human Solidarity Day) साजरा करतात.  
 2. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा करण्यामागचा उद्देश्य हा आहे की, लोकांच्या विविधतेमधील एकताचे महत्त्व स्पष्ट करत जागरूकता फैलावने.
 3. ‘हेल्प 4 ह्यूमेन रिसर्च अँड डेवलपमेंट’ या संस्थेने भारतीयांना एकताच्या सूत्रात बांधण्याचा पुढाकार घेतला आहे.

 

पार्श्वभूमी
 1. 22 डिसेंबर 2005 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने मानव एकता संदर्भात एक निर्णय घेत दरवर्षी 20 डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस’ घोषित करण्याचा निर्णय घेतला.  
 2. फेब्रुवारी 2002 मध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी UNDP चा ‘जागतिक एकता कोष’ स्थापन करण्यात आला आहे.
 3. नवीन शाश्वत विकास उद्दीष्टे (SDG) पुर्णपणे लोक आणि ग्रहावर केंद्रित आहे, ज्यात मानवाधिकारांना पाठबळ दिले जात आहे आणि दारिद्र्य, उपासमार आणि रोगराई यामधून लोकांना बाहेर काढण्यासाठीच्या निर्धारासाठी वैश्विक भागीदारीने  समर्थित आहे. त्यादृष्टीने जागतिक सहकार्य आणि एकात्मतेची पायाभरणी केली जात आहे.
 4. त्याचाच एक भाग म्हणून जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस’ साजरा करतात.


International immigrant person days - 18th December

 1. ‘सेफ मायग्रेशन इन ए वर्ल्ड ऑन द मुव्ह’ या संकल्पनेखाली 18 डिसेंबर 2017 रोजी ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिवस’ साजरा केला जात आहे.

जागतिक परिस्थिती:-

 1. आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची एकूण लोकसंख्या 2000 सालच्या 175 दशलक्षांवरून 2015 साली 244 दशलक्ष इतकी झाली आहे.
 2. आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी जवळजवळ दोन तृतीयांश लोकसंख्या युरोप (76 दशलक्ष) किंवा आशिया (75 दशलक्ष) मध्ये वास्तव्यास आहे.

पार्श्वभूमी:-

 1. दरवर्षी 18 डिसेंबरला संपूर्ण जगात ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिवस’ (International Migrants Day) साजरा केला जातो.
 2. 18 डिसेंबर 1990 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेने स्थलांतरित श्रमिकांच्या अधिकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणार्थ आंतरराष्ट्रीय कराराला अंगिकारले होते.
 3. या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी 4 डिसेंबर 2000 ला संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेने जगात स्थलांतरित व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्या अधिकारांविषयी जागृती निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी ‘18 डिसेंबर’ या दिवशी हा दिवस साजरा केला जावा, असे आवाहन करण्यात आले होते.
 4. 19 सप्टेंबर 2016 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेने निर्वासित आणि स्थलांतरित लोकांसंबंधित प्रथम शिखर परिषदेत निर्वासित आणि स्थलांतरितांचे संरक्षण वाढवण्यासाठी निश्चित केलेल्या प्रतिबद्धतेच्या संचाचा स्वीकार केला.
 5. हे दस्तऐवज ‘निर्वासित आणि स्थलांतरित व्यक्तींसाठी  न्यूयॉर्क घोषणापत्र’ म्हणून देखील ओळखल्या जाते. 


National Energy Conservation Day

 1. ऊर्जा कार्यक्षमता विभागाकडून दरवर्षी १४ डिसेंबरला 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस' साजरा करण्यात येतो.
 2. यावर्षी ३२२ औद्योगिक प्रकल्प तसेच प्रमुख क्षेत्रांतील आस्थापने '२७ व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्‍कार' साठी सहभागी झाले होते.
 3. ऊर्जा कार्यक्षमता आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व यासंबंधी जनजागृती फैलावण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
 4. विद्युत मंत्रालयांतर्गत ऊर्जा कार्यक्षमता विभाग (Bureau of Energy Efficiency) कडून दरवर्षी १४ डिसेंबरला 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस' साजरा करण्यात येतो.
 5. या दिवसानिमित्ता ऊर्जेच्या वापर कमी करण्यामध्ये उद्योगांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे आणि त्यांना प्रोत्‍साहित करण्यासाठी 'राष्‍ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्‍कार' प्रदान केले जातात.
 6. हा पुरस्कार ५६ उपश्रेणींमध्ये दिला जातो.


International Human Rights Day 10 December

 1. दरवर्षी १० डिसेंबरला जगभरात 'आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस' साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
 2. या वर्षी 'लेट्स स्टँड अप फॉर इक्वेलिटी, जस्टीस अँड ह्यूमन डिगनीटी' या विषयाखाली हा दिवस साजरा केला गेला आहे. मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights) याचे हे ७० वे वर्ष आहे.
 3. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात तसेच पॅरीस मधील पॅलेस डे चाएलोट येथे '# स्टँडअप 4 ह्यूमन राइट' या वर्षभर चालणार्‍या मोहिमेला सुरुवात केली गेली आहे.
 4. मानवी अधिकार किंवा मानवाधिकार म्हणजे सर्व मनुष्यप्राण्यांचे मूलभूत अधिकार आहेत, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, रहिवासी, लिंग, राष्ट्रीय, जात, वर्ण, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो.
 5. वैश्विक मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे, करार, सरावपद्धती, सर्वसाधारण तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे अन्य स्रोत अश्या विविध पद्धतीचा अवलंब केला जातो.
 6. १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये (UNGA) मानवाधिकाराचे सार्वत्रिक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights) अंगिकारले गेले. मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र आज जगातील ५०० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे
 7. त्यानंतर १९५० साली, UNGA मध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून १० डिसेंबर हा दिवस साजरा करण्यासंबंधी ठराव 423 (V) पारित केला गेला.
 8. निर्वासित किंवा स्थलांतरित, अपंग, LGBT व्यक्ती, स्त्री, मूलं, स्थानिक, अल्पसंख्याक तसेच भेदभाव किंवा हिंसाचाराचा याचा धोका असलेल्या व्यक्ती अश्या समाजातील विविध घटकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
 9. मानवाधिकार उच्चायुक्त (High Commissioner for Human Rights) हे मुख्य संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकार कार्यकारी मंडळ आहे. हे अधिकृत कार्यालय जगभरात या दिवशी विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावते.


International mountains day: 11th December

 1.  दरवर्षी 11 डिसेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस’ साजरा करण्यात येतो.
 2. या वर्षी हा दिवस "माउंटन्स अन्डर प्रेशर: क्लायमेट, हंगर अँड मायग्रेशन" या संकल्पनेखाली राबवला गेला आहे.
 3. हवामानातील बदल, भूमीची निकृष्टता, शोषण तसेच वारंवार येणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे पर्वत धोक्यात आले आहेत.
 4. अश्या गंभीर परिस्थितीला जगापुढे मांडण्यासाठी यावर्षी पर्वतांवर होणारे विपरीत परिणामासंबंधी जनजागृती केली जात आहे. 
 5. पृथ्वीवरील सुमारे 22% पृष्ठभाग हा पर्वतीय प्रदेशांनी आच्छादलेला आहे.
 6. या पर्वतीय प्रदेशात जगभरातील 13% म्हणजेच 915 दशलक्ष लोकसंख्या निवास करते.
 7. पर्वतीय प्रदेशांचा जगाच्या शाश्वत विकासामध्ये असलेला महत्त्वाचा सहभाग दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
 8. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) नुसार, जगातील 669 पर्यावरण-अनुकूल संरक्षित क्षेत्रांपैकी 376 म्हणजेच 56% क्षेत्रांमध्ये पर्वतीय पर्यावरण आढळते. 
 9. शिवाय, खाली पायथ्याशी असलेल्या जगात अप्रत्यक्षरित्या अब्जावधी लोकांना लाभ देते.
 10. जगात 91% पर्वतीय रहिवासी विकसनशील देशांमध्ये वास्तव्यास आहेत, जिथे बहुसंख्य दारिद्र्यरेषेखाली जगतात आणि प्रत्येक 3 पैकी एका व्यक्तीला अन्न असुरक्षिततेचा धोका आहे.
 11. पर्वत जगातील 60-80% ताजे पाणी पुरवतो, ज्याविना दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलनाचे लक्ष्य साधणे शक्य नाही.
 12. नाविकरणीय ऊर्जा प्रदान करण्यासाठी पर्वत एक प्रमुख भूमिका निभावतात, विशेषत: जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बायोगॅस यांच्याद्वारे.
 13. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने (UNGA) 2002 हे UN आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष म्हणून जाहीर केले होते.
 14. त्याप्रसंगी आमसभेने वर्ष 2003 पासून दरवर्षी 11 डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस’ ​​म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.


International Volunteer Day: Celebrated on 5th December

5 डिसेंबर 2017 ला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस (International Volunteer Day -IVD) जगभरात साजरा करण्यात आला.

या वर्षी "वॉलंटियर्स अॅक्ट फर्स्ट. हियर. एव्हरीव्हेयर" या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला.

ही संकल्पना स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संकटांच्या काळात धावून येणार्‍या स्वयंसेवकांच्या योगदानाला प्रोत्साहन देते. स्वयंसेवक दररोज स्वतःचे जीवन धोक्यात घालून इतरांना मदत करतात आणि मानवी दुःखात समोर येवून त्यात सहभागी होतात.

 1. ‘संयुक्त राष्ट्रसंघ स्वयंसेवक (UNV) कार्यक्रम’ हा जगभरात आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवसाच्या उत्सवाला समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी जबाबदार आहे.
 2. दरवर्षी 6,500 पेक्षा अधिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्वयंसेवकांनी जगभरातल्या काही आव्हानात्मक वातावरणातही संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांसोबत काम करतात आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऑनलाइन स्वयंसेवकांनी UNV ऑनलाइन स्वयंसेवा सेवेच्या माध्यमातून 20,000 पेक्षा जास्त ऑनलाइन कामे पूर्ण केलेली आहेत.
 3. 17 डिसेंबर 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत (UNGA) 5 डिसेंबर या तारखेला दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस’ पाळण्यासाठीचा ठराव पारित करण्यात आला.
 4. वर्ष 2001 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा करण्यात आला.
 5. जगभरातील स्वयंसेवकांचे शांती आणि शाश्वत विकास वास्तवात उतरवण्यासाठीचे प्रयत्न यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
 6. तसेच याला आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून सुद्धा ओळखले जाते.
 7. हा दिवस म्हणजे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विकासामध्ये त्यांचे योगदान यांची जाहिरात करण्यासाठी वैयक्तिक स्वयंसेवक, समुदाय आणि संस्था यांच्यासाठी एक संधी असते.


Top

Whoops, looks like something went wrong.