World Kidney Day: March 14th

 1. जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारीला (यावर्षी 14 मार्च) जागतिक मूत्रपिंड दिन पाळण्यात येतो.
 2. यंदा हा दिन “किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन एव्हरीव्हेअर” या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आला आहे.
 3. या दिनानिमित्त मूत्रपिंडाच्या संबंधी असलेले आजार, आरोग्य सेवांमधली असमानता अश्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यात आले.
 4. 2006 साली पहिल्यांदा जागतिक मूत्रपिंड दिन पाळला गेला.
 5. हा दरवर्षी आयोजित केला जाणारा वार्षिक जागरूकता आणि शैक्षणिक कार्यक्रम आहे.


World day against cyber censorship: March 12

 1. दरवर्षी 12 मार्च या दिवशी ‘सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन’ (World Day Against Cyber Censorship) पाळला जातो, जो दरवर्षी आयोजित केला जाणारा एक वार्षिक ऑनलाइन कार्यक्रम आहे.
 2. सबंध आणि मुक्त इंटरनेट या संकल्पनेला समर्थन देणारी ही चळवळ सर्वांना मुक्त इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने चालविण्यात आली आहे.
 3. तसेच जगभरातल्या सरकारांकडून भाष्य-स्वातंत्र्यावर लादल्या जाणार्‍या बंधनाच्या प्रश्नाला संबोधित करण्यासाठी हा दिन पाळला जातो.
 4. दिनाविषयी:-
  1. रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (पॅरिसची आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था) आणि अॅमेनिस्टी इंटरनॅशनल या संस्थांच्या विनंतीवरून दिनांक 12 मार्च 2008 रोजी पहिल्यांदा ‘सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन’ पाळला गेला होता.
  2. हा आता रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यांच्या नेतृत्वात आयोजित केला जाणारा एक वार्षिक जागतिक कार्यक्रम बनला आहे.
  3. 2010 साली रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स तर्फे ‘नेटिझन पारितोषिक’ देण्याचे सुरू करण्यात आले.
  4. जो ऑनलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यात उत्कृष्ट योगदान देणारा इंटरनेट वापरकर्ता/ब्लॉगर/व्यक्ती/गट यांना दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे.


50th rise day of CISF: 10 March 2019

 1. दिनांक 10 मार्च 2019 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) 50वा उदय दिन (Raising Day) साजरा करण्यात आला.
 2. त्यानिमित्ताने गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 3. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) हा भारतातला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे.
 4. दिनांक 10 मार्च 1969 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये याची स्थापना करण्यात आली.
 5. हे दल अतिमहत्त्वाच्या सरकारी इमारती, दिल्ली मेट्रो, आणि विमानतळांना सुरक्षा पुरविते.


International Women's Day: March 8

 1. दरवर्षी 8 मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन पाळला जातो.
 2. यावर्षी "थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट, इनोव्हेट फॉर चेंज" या संकल्पनेखाली हा दिन पाळला गेला. तसेच “# बॅलन्स फॉर बेटर” या संकल्पनेखाली एक मोहिम चालू करण्यात आली आहे.
 3. या दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) तर्फे त्याच्या नव्या सदिच्छा दूत (गुडविल अॅम्बेसेडर) पदी भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या निवासी पद्मा लक्ष्मी यांची निवड करण्यात आली आहे.
 4. भारताचा नारी शक्ती पुरस्कार:-
  1. या दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कार 2018’ प्रदान करण्यात आले.
  2. यावर्षी 44 महिला आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्राच्या 6 महिलांचा समावेश आहे.
  3. महाराष्ट्रातल्या सीमा राव (देशातल्या एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक), स्मृती मोरारका (‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून हातमाग समूह सुरू केला), कल्पना सरोज (पद्मश्री पुरस्कारप्राप्त उद्योजिका), सीमा मेहता, राहीबाई पोपरे (अहमदनगर जिल्ह्यातल्या त्यांच्या कृषी क्षेत्रातल्या वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी), चेतना गाला सिन्हा (सातारा जिल्ह्यातील माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका) यांचा सन्मान करण्यात आला.
 5. यासंबंधीचा इतिहास
  1. आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरातल्या अनेक देशांमध्ये पाळला जातो.
  2. राष्ट्रीय, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा आर्थिक अश्या अनेक क्षेत्रात महिलांनी केलेल्या असामान्य कार्यांबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  3. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उगमस्थान उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये विसाव्या शतकाच्या सुरूवातीला चालवण्यात आलेल्या कामगार चळवळीच्या उपक्रमामध्ये आढळून येते.
  4. 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये 19 मार्चला पहिला “आंतरराष्ट्रीय महिला दिन” साजरा करण्यात आला.
  5. त्यानंतर 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘8 मार्च’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून पाळण्यास सुरुवात झाली.
  6. हा महिला आणि पुरुष दरम्यान समता या तत्त्वाच्या आधारावर भर देणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार होता. 
 6. ठरविण्यात आलेली ‘2030 कार्यसूची (अजेंडा)’ची प्रमुख लक्ष्ये -
  1. 2030 सालापर्यंत, सर्व मुला-मुलींना मोफत, न्यायसंगत आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळण्याची खात्री करणे.
  2. 2030 सालापर्यंत, सर्व मुला-मुलींच्या गुणवत्तेसाठी बाल्यावस्थेचा विकास, घ्यावयाची काळजी आणि बालवाडीमधील शिक्षण या सुविधांना प्रवेश मिळण्याची खात्री करणे, जेणेकरून ते प्राथमिक शिक्षणास तयार असतील.
  3. सर्वत्र सर्व महिला आणि मुलींच्या बाबतीत असलेला सर्व प्रकारचा भेदभाव समाप्त करणे.
  4. तस्करी आणि लैंगिक अत्याचार आणि शोषण अश्या आणि इतर प्रकारांच्या समावेशासोबतच सार्वजनिक आणि खासगी कामाच्या वातावरणात सर्व महिला आणि मुलींच्या विरुद्ध असलेली सर्व प्रकारची हिंसा दूर करणे.
  5. बाल, लवकर आणि सक्तीचे विवाह आणि महिला जननेंद्रियासंबंधित विकृत प्रथा अश्या सर्व हानीकारक प्रथांना बाद करणे.
 7. भारताकडून या संदर्भात उचलली गेलेली पाऊले
  1. 1950 साली, भारत हा त्याच्या नागरिकांना सार्वत्रिक प्रौढ (स्त्री-पुरुष) मतदान मान्य करणार्‍या जगातील काही देशांपैकी एक होता. 
  2. भारत सरकारने 1999 साली ‘नारी शक्ती पुरस्कार’ देण्याचे सुरू केले. हा पुरस्कार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्‍या महिलांना आणि संस्थांना दिला जातो.
  3. हा पुरस्कार भारत सरकारच्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाकडून विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना आणि संस्थांना दिला जातो.
  4. हा भारतातल्या महिलांना मिळणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.


7th March 2019 celebrated as 'Jan aushadhi Diwas'

 1. जेनेरिक औषधांविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या औषधांच्या वापराला चालना देण्यासाठी 7 मार्च 2019 हा दिवस ‘जनऔषधी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 2. सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकारामुळे भारत सरकारने ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्प’ याच्या माध्यमातून परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
 3. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्प (PMBJP) या योजनेच्या अंतर्गत समाजाच्या दुर्बल आणि वंचित घटकांना स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषधी उपलब्ध करून दिले जात आहे.
 4. जनऔषधी (वा जनौषधी) केंद्रांवर 600 हून अधिक औषधी आणि शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या आणि अन्य आरोग्यविषयक 150 हून अधिक विविध वस्तू उपलब्ध करून दिले जात आहे.


India's Army Air Defense Day: 10 January

 1. ‘कॉर्प्स ऑफ आर्मी एयर डिफेन्स’ या लष्कराच्या हवाई तुकडीने 10 जानेवारी 2019 रोजी आपला रौप्य वर्धापन दिन साजरा केला.
 2. यानिमित्त नवी दिल्लीत एक सोहळा आयोजित करण्यात आला.
 3. ‘कॉर्प्स ऑफ आर्मी एयर डिफेन्स’ ही भारतीय लष्कराची सर्वात नवी तुकडी आहे, जी लष्कराला हवाई सुविधा प्रदान करते.
 4. "आकाशे शत्रून जाही" हे याचे घोषवाक्य आहे.
 5. याची स्थापना सन 1939 मध्ये करण्यात आली.


Constitution of India Day: 26th November

 1. भारताचा संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.
 2. या वर्षी ‘बुद्धिष्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड’, सावी फाऊंडेशन आणि स्वागत थोरत यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच ब्रेल लिपीत संविधान उपलब्ध केले जात आहे.
 3. अंध व्यक्तीसाठी संविधान ब्रेल लिपीत पाच भागांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
 4. दि. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.
 5. अंतिम मसुदा दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला.
 6. या घटनेचे राष्ट्रार्पण दि. 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आले.
 7. दि. 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारने एका अधिसूचनेद्वारे 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून घोषित केले.
 8. त्याआधी, 1979 सालापर्यंत हा दिन ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणून पाळला जात होता.
 9. संसदीय लोकशाही, संघराज्यीय पद्धत, मुलभूत हक्क व त्यासाठी (न्यायालयीन यंत्रणा), मार्गदर्शक तत्त्वे, केंद्र राज्य संबंध, घटना दुरुस्ती ही संविधानातली प्रमुख अंगे आहेत.
 10. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविणाचा व सर्व नागरिकांस समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देते.
 11. भारतीय संविधानात 395 अनुच्छेद आहेत. यात मुळात 8 परिशिष्टे आणि आज 12 परिशिष्टे आहेत.
 12. ICS अधिकारी, अ‍ॅग्लोइंडियन संस्थानिक, सरकारी सनदी नोकर या सर्वाबाबतबच्या तरतुदींचा यात समावेश आहे. यात अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, जमाती बाबत तरतुदी समाविष्ट आहेत.


National Integration Week: November 19 to November 25

 1. जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि मिश्र संस्कृती आणि राष्ट्रीय सद्भावना बाळगण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, देशात 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2018 या काळात ‘कौमी एकता आठवडा’ (राष्ट्रीय एकता आठवडा) पाळला जात आहे.
 2. या काळात आयोजित केली जाणारी कार्यक्रमे -
  1. 19 नोव्हेंबर 2018 - राष्ट्रीय एकता दिन
  2. 20 नोव्हेंबर 2018 - अल्पसंख्यक कल्याण दिन
  3. 21 नोव्हेंबर 2018 - भाषिक सलोखा दिन
  4. 22 नोव्हेंबर 2018 - कमकुवत वर्ग दिन
  5. 23 नोव्हेंबर 2018 - सांस्कृतिक एकता दिन
  6. 24 नोव्हेंबर 2018 - महिला दिन
  7. 25 नोव्हेंबर 2018 - संवर्धन दिन
 3. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हॉरमोनी (NFCH) या स्वायत्त संस्थेकडून ‘कौमी एकता आठवडा’चे आयोजन केले जाते.
 4. या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि 25 नोव्हेंबरला ‘जातीय सलोखा ध्वज दिन’ पाळला जातो.


World Toilet Day: November 19

 1. दरवर्षी 19 नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय संघटनेच्या (World Toilet Organization-WTO) नेतृत्वात जगभरात ‘जागतिक शौचालय दिन’ पाळला जातो.
 2. यावर्षी हा दिन ‘व्हेन नेचर कॉल्स’ या संकल्पनेखाली पाळला गेला.
 3. दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी स्थापना करण्यात आलेल्या जागतिक शौचालय संघटनेचा स्थापना दिन ‘जागतिक शौचालय दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
 4. 145 देशांमध्ये केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, 58% अतिसार अस्वच्छतेमुळे होते.
 5. अतिसार या आजारामुळे 2015 साली पाच वर्षाखालील कमी वयाच्या 5,26,000+ बालकांचा मृत्यू झाला.
 6. यावर उपाय म्हणून शौचालयाला प्रोत्साहन दिले जात आहे.
 7. संघटनेने शौचालयांची असुविधा, त्यापासुन होणारे आजार आणि मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणार्‍या शौचालयाची समस्या संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडली.
 8. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या 2030 शाश्वत विकास लक्ष्य 6 (SDG-6) अंतर्गत, 2013 साली शौचालयाला मानवाची महत्त्वाची गरज म्हणून तांत्रिक आणि कायदेशीर मान्यता दिली.
 9. जागतिक शौचालय संघटना (World Toilet Organization-WTO) ही एक आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे.
 10. ही जगभरात स्वच्छता आणि शौचालय संदर्भात परिस्थितीत सुधारणेसाठी जबाबदार आहे.
 11. जॅक सिम यांनी WTO ची स्थापना दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी 15 सदस्य देशांसमवेत केली, जी आता 151 पर्यंत पोहचलेली आहे.
 12. संघटना जागतिक शौचालय परिषदेची आयोजक आहे.
 13. 2014 साली 18-20 नोव्हेंबर या काळात जगातला पहिला आंतरराष्ट्रीय शौचालय महोत्सव दिल्लीत आयोजित केला गेला होता.


International Tolerance Day: November 16

 1. संयुक्त राष्ट्रसंघाकडून दरवर्षी 16 नोव्हेंबर या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन’ (International Day for Tolerance) पाळला जातो.
 2. या दिनानिमित्त आयोजित एका समारंभात मॅनोन बार्बेऊ (कॅनडाचे चित्रपट निर्माता) आणि कोएक्जिस्ट इनिशिएटिव्ह (केनियाची सामाजिक संस्था) यांना यावर्षीचा ‘सहिष्णुता आणि अहिंसा याला प्रोत्साहन देण्यासाठीचा UNESCO-मदनजीत सिंग पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 3. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघ सार्वजनिक माहिती (United Nations Department of Public Information) कडून ‘2018 यूट्यूब क्रिएटर्स फॉर चेंज’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले, ज्यामध्ये यूट्यूबचा वापर करणार्‍या निर्मात्यांकडून निर्मित निवडक आंतरराष्ट्रीय लघुपटांना प्रदर्शित करण्यात आले.
 4. जगभरात संस्कृती आणि लोक यांच्यात परस्पर समंजस्यता वाढवून सहिष्णुतेला बळ देण्याच्या उद्देशाने, दिनांक 16 नोव्हेंबर 1995 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (UNESCO) याच्या सदस्य राष्ट्रांनी ‘सहिष्णुतेसंबंधी तत्त्वांचे घोषणापत्र’ (Declaration of Principles on Tolerance) अंगिकारले होते.
 5. या घटनेच्या स्मृतीत, 1996 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने 16 नोव्हेंबर या दिवशी पहिला ‘आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन’ पाळला.
 6. 1995 हा साल ‘संयुक्त राष्ट्रसंघ सहिष्णुता वर्ष’ (United Nations Year for Tolerance) म्हणून पाळला गेला होता.
 7. संयुक्त राष्ट्रसंघाने जगात सहिष्णुता, सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘टुगेदर’ नावाची मोहीम सुरू केली आहे.
 8. ज्यामधून स्थलांतरित आणि शरणार्थी यांच्याबाबत असलेला नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी कार्य केले जात आहे.


Top