800 Nepali Gurkha employees will be recruited in the British Army

 1. ब्रिटीश लष्कराच्या स्पेशलाइज्ड इंफंट्री बटालियन या नव्या तुकडीत 800 पेक्षा जास्त नेपाळी गुरखा कर्मचार्‍यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 2. वर्तमानात ब्रिटिश सैन्यात 3% गुरखा कर्मचारी आहेत. 2015 साली त्यांच्या सेवेची 200 वर्षांची सेवा पूर्ण केली.
 3. ब्रिटन-भारत-नेपाळ त्रिपक्षीय कराराच्या अंतर्गत गुरखा कर्मचार्‍यांची भरती केली जाते.
 4. त्याअंतर्गत दरवर्षी नेपाळमधील पोखरा येथील ब्रिटिश गुरखा छावणीत गुरखा कर्मचार्‍यांची भरती केली जाते.
 5. ब्रिटन (ग्रेट ब्रिटन/यूनाइटेड किंगडम/यूके/बर्तानिया) हा युरोप खंडाच्या वायव्येकडे असलेला एक संयुक्त बेटराष्ट्र आहे.
 6. ज्यामध्ये स्कॉटलँड, वेल्स आणि इंग्लंड तसेच उत्‍तर आयरलँड या प्रदेशांचा समावेश आहे.
 7. लंडन हे राजधानी शहर आहे आणि पाउंड स्टर्लिंग (GBP) हे राष्ट्रीय चलन आहे.
 8. नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आणि भारताचा शेजारी देश आहे.
 9. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. ‎काठमांडू ही देशाची राजधानी आहे.
 10. नेपाळी रुपया (NPR) हे राष्ट्रीय चलन आहे.


Duplicate Treaty of India and America for the exchange of country-by-country reports

 1. भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यान कंट्री-बाय-कंट्री (CBC) अहवालाच्या विनिमयासाठी द्वैपक्षीय करार केला जाणार आहे.
 2. या करारावर 31 मार्च 2019 रोजी स्वाक्षरी केली जाणार आहे.
 3. प्रस्तावित करार 1 जानेवारी 2016 पासून पुढे वित्त वर्षांसाठी अहवालांची देवाण-घेवाण करण्यास सक्षम करणार आहे.
 4. शिवाय ‘बायलॅटरल कॉम्पिटेंट अथॉरिटी अरेंजमेंट तयार करण्यात येणार आहे.
 5. प्रस्तावित करारानुसार प्राप्तिकर अधिनियम-1961 याच्या कलम क्र. 286(4) अन्वये भारतात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय गटाची मूळ संस्था हा अहवाल सादर करणार आहे.


In the memory of Stephen Hawking, the British government called 'Black Hole' coins

 1. कृष्णविवराबाबत अनेक खुलासे करणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या स्मृतीत ब्रिटनच्या रॉयल मिंट कडून पन्नास स्मारक नाणी प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
 2. नाण्यावर कृष्णविवराचे चित्र कोरलेले आहे. ही नाणी 55 आणि 795 पाउंड यादरम्यान असलेल्या विविध मूल्यांसह चांदीची आणि सोनेनी तयार केली आहेत.
 3. स्टीफन हॉकिंग:-
  1. विज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे ख्यातनाम ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे मार्च 2018 मध्ये निधन झाले.
  2. विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवर यांच्या सदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. 
  3. विश्वशास्त्र (cosmology) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे 1942 साली जन्मलेले स्टीफन हॉकिंगचे मोठे योगदान होते.
  4. 2009 साली त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आणि त्यांना कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर ही पदवी देखील बहाल केली.
  5. हॉकिंग यांनी लिहलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘द ग्रँड डिझाईन’, ‘युनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
  6. त्यांचे विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित 'ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' हे पुस्तक खूप गाजले.


UN's 'Global Environment Outlook' report

 1. संयुक्त राष्ट्रसंघाने ‘ग्लोबल एनव्हीरोंमेंट आउटलुक’ या शीर्षकाखाली आपला पर्यावरण विषयक ताजा अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालाची ही पाचवी आवृत्ती आहे.
 2. त्या अहवालामुळे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) याला पर्यावरण विषयक धोरणे तयार करण्यास मदत होते.
 3. ठळक मुद्दे:-
  1. जगभरात होणारे सर्व अकाली मृत्यू आणि आजारांचा एक चतुर्थांश भाग मानवनिर्मित प्रदूषण आणि पर्यावरणाच्या होणार्‍या नुकसानामुळे आहे. केवळ 2015 सालीच सुमारे 9 दशलक्ष मृत्यू झालेत.
  2. घातक कार्बन उत्सर्जन, पिण्याचे पाणी प्रदूषित करणारी रसायने अब्जावधी लोकांच्या उपजीविकेला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहचवित आहे.
  3. श्रीमंत आणि गरीब देशांमध्ये असलेली तफावत वाढत आहे. त्यामधून भूखमरी, गरिबी आणि रोगांचा प्रादुर्भाव यात वाढ होत आहे.
  4. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने दरवर्षी 1.4 दशलक्ष लोकांचा अनेक आजारांमुळे मृत्यू होत आहे.
  5. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 60-70 लक्ष लोकांचा जगभरात अकाली मृत्यू होतो.
  6. श्रीमंत देशात 56% अन्नाची नासाडी होते.


On the way to shut down their immigration service offices outside the US

 1. संयुक्त राज्ये अमेरिकेच्या सरकारने देशाबाहेर कार्यरत असलेली त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या दिशेने पावले उचललेली आहे.
 2. अमेरिकेच्या सिटिजनशीप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस या विभागाने स्पष्ट केलेल्या माहितीनुसार, सरकार 20 देशांमधील त्यांची कार्यालये बंद करण्यासंबंधीच्या चर्चेच्या प्रारंभिक टप्प्यावर आहे.
 3. देशांतर्गत प्रश्नांना संबोधित करण्यासाठी आणि त्यामधून वर्षभरात लाखो डॉलर्सची रक्कम बचत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.
 4. सद्यस्थितीत ब्रिटन, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, इटली, भारत, फिलीपिन्स, चीन आणि इतर देशांमध्ये अमेरिकेची इमिग्रेशन सेवा कार्यालये असून तिथे जवळपास 70 कर्मचारी कार्यरत आहेत.
 5. संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिका उपखंडातला एक देश आहे.
 6. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे.
 7. यूएस डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


'World Wide Web' has completed 30 years

 1. दिनांक 12 मार्च 2019 रोजी संगणक जगतातल्या सर्वाधिक महत्त्वाच्या ‘वर्ल्ड वाइड वेब’ (WWW) या मंचाला 30 वर्ष पूर्ण झाली.
 2. WWW चा इतिहास:-
  1. ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ टिम बर्नेर्स-ली यांनी ‘वर्ल्ड वाइड वेब’ (WWW) याची रचना केली.
  2. 1989 साली WWWची स्थापना झाली. हा आधुनिक मानवजातीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा एक महान विकास आहे.
  3. 1989 साली 33 वर्षांच्या बर्नर्स-ली यांनी ENQUIRE या यंत्रणेचा संदर्भ घेऊन "मेष (Mesh)" नावाच्या प्रणालीसाठी स्वित्झर्लंडमधील CERN (युरोपियन ऑर्गनाइझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च) येथे व्यवस्थापनासाठी ‘इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट: ए प्रोपोजल’ या शीर्षकाखाली एक प्रस्ताव दिला होता.
  4. सुरुवातीला, CERN येथील एकाधिक संगणकांमध्ये माहिती सामायिक करण्यासाठी बर्नर्स-ली यांनी मेष नावाने टाइप्ड लिंक्ससह एक मोठ्या हायपरटेक्स्ट डेटाबेसची कल्पना मांडली.
  5. त्यांनी HTML, HTTP आणि वर्ल्ड वाइड वेब या प्रोग्रामिंग लॅंगवेजवर आधारित एक मॉडेल विकसित केले. 
  6. पुढे 1991 सालापर्यंत ही यंत्रणा बाह्य वेब सर्व्हरच्या माध्यमातून प्रसारित झाली.


Inauguration of India's third IT route in China

 1. माहिती तंत्रज्ञानासंबंधी भारतीय आणि चीनी कंपन्यांमधील भागीदारीमध्ये सुलभता यावी या उद्देशाने भारताने चीनमध्ये झुझौ शहरात विकसित केलेल्या आपल्या तिसर्‍या मार्गिकेचे (कॉरीडॉर) उद्घाटन केले.
 2. या परिसराचा विकास करण्यासाठी भारताच्या सॉफ्टवेयर व सेवा कंपन्यांचा राष्ट्रीय संघ (NASSCOM) या संस्थेनी चीनच्या जियांग्सू प्रांतातल्या झुझौ शहरासोबत भागीदारी करार झाला होता.
 3. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि अॅनालिटिक्स अश्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्पादने तयार करण्यासाठी सहकार्य काम करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
 4. यापूर्वी चीनच्या डालियन आणि गुइयांग या दोन शहरांमध्ये अशा प्रकारच्या मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत.
 5. चीनी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराच्या माध्यमातून, आतापर्यंत 300 हून अधिक चीनी कंपन्यांसोबत सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रातल्या 10 भारतीय कंपन्यांनी सुमारे USD 4.5 दशलक्ष किंमतीचे करार केले आहेत.
 6. चीन हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले पूर्व आशियातले एक राष्ट्र आहे.
 7. या देशाची राजधानी बिजींग शहर असून चीनी रेन्मिन्बी (ऊर्फ चीनी युआन) हे राष्ट्रीय चलन आहे.


"Geneva Agreement" protecting war prisoners

 1. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हे स्पष्ट केले की पाकिस्तानवर केलेल्या कारवाईदरम्यान दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताचे एक विमान कोसळले आणि भारतीय हवाई दलाचा एक पायलट पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि तो आता पाकिस्तानाच्या ताब्यात होता. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे - विंग कमांडर अभिनंदन.
 2. विंग कमांडर अभिनंदन यांना अलीकडेच पाकिस्तानने आपल्या ताब्यातून सोडले आणि भारताला सोपवले. ही सर्व प्रक्रिया जिनेव्हा करारनामानुसार चालली.
 3. जिनेव्हा करारनामा:- 
  1. जिनेव्हा करारनामा ही खरं तर सन 1864 ते सन 1949 ह्या काळात झालेल्या एकूण चार करारांची एक मालिका आहे.
  2. युद्धकैदी म्हणून ताब्यात असलेल्या सामान्य नागरिक व सैनिकांवर गंभीर परिणाम होऊ नयेत किंवा त्रास होऊ नये म्हणून हे करार करण्यात आले आहेत.
  3. दिनांक 12 ऑगस्ट 1949 रोजी ह्या चार करारांना जिनेव्हामध्ये मान्यता देण्यात आली.
  4. 1977 साली ह्या कायद्याच्या अंतर्गत सैनिकांसह सामान्य नागरिकांनाही संरक्षण मिळावे ह्यावर शिक्कामोर्तब झाले. रेड क्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनन्ट ह्यांनी 1864 साली झालेल्या युद्धाच्या वेळी जखमींना मदत करण्यासाठी वाटाघाटी केल्यामुळे हे करार अस्तित्वात आले आहेत.
  5. करारमालिकेच्या पहिल्या करारामध्ये आजारी किंवा जखमी सैनिकांना पकडण्यापासून संरक्षण, तसेच आजारी व जखमी सैनिकांना उपचार ह्याबद्दल नियम आहेत.
  6. दुसऱ्या करारात सर्व सैनिकांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता चांगली व समान वागणूक देणे ह्याबद्दल नियम आहेत.
  7. तिसऱ्या करारामध्ये युद्धकैद्यांबद्दल मार्गदर्शक तत्वे स्पष्ट केली आहेत. ह्यात कुणाला युद्धकैदी समजण्यात यावे आणि त्यांना कशी वागणूक मिळावी व त्यांना कुठल्या प्रकारची वागणूक देण्यात येऊ नये ह्याबद्दलचे नियम आहेत.
  8. चवथ्या करारामध्ये रेड क्रॉसच्या चिन्हाचा उपयोग माणसांना ओळखण्यासाठी व रेड क्रॉसच्या उपकरणांची ओळख पटवण्यासाठी करणे ह्याबाबत नियम आहेत.
  9. तिसऱ्या करारात युद्धकैद्यांना विस्तृत संरक्षण देण्यात आले आहे. युद्धकैद्यांच्या हक्कांबाबत तसेच त्यांना सोडून देण्याबाबत माहिती व ते ताब्यात असताना त्यांना देण्यात येणारी वागणूक ह्याबाबत विस्तृतपणे नियमावली देण्यात आली आहे.
  10. ‘युद्धकैदी’ ही संज्ञा तिसऱ्या करारात स्पष्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय युद्धादरम्यान पकडल्या गेलेल्या सैनिकांनाच युद्धबंदी किंवा युद्धकैदी ही संज्ञा लागू पडते.
  11. नियमांप्रमाणे युद्धकैद्यांनी शत्रूवर थेट कारवाई केलेली असली तरी त्या गुन्ह्याअंतर्गत शत्रूराष्ट्र त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही.
  12. त्यांना फक्त ह्यासाठी त्याब्यात घेण्याची परवानगी असते की त्यांना अधिक कारवाई करता येऊ नये. युद्ध संपल्यानंतर लगेच ह्या युद्धकैद्यांना सोडून देण्यात यावे असा नियम आहे.


Tax Information and Exchange Agreement between India and Brunei (TIEA)

 1. भारताचा ब्रुनेईसोबत कर माहिती आणि विनिमय करार (TIEA) झाला.
 2. दोन देशांदरम्यान करविषयक बाबींच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी हा करार केला जातो, ज्यामुळे कर चोरी टाळण्यास मदत होते.
 3. हा करार दोन्ही देशांमधील बँकिंग आणि मालकी संबंधी माहितीचे विनिमय करण्यास सक्षमता प्रदान करते.
 4. ब्रुनेई दरुसलेम हा आग्नेय आशियातील बोर्निओ बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला देश आहे.
 5. मलेशियाच्या सारावाक राज्यामधील लिंबांग प्रदेशामुळे ब्रुनेई भूराजकीयदृष्ट्या दोन भागांमध्ये विभागला गेला आहे.
 6. बंदर सेरी बेगवान ही देशाची राजधानी असून ब्रुनेई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


Citizens rejected for the fifth consecutive term as President of Algeria

 1. अल्जेरियाचे 81 वर्षीय राष्ट्रपती अब्देलअझीझ बुतेफ्लिका हे पदावर त्यांच्या पाचव्या काळासाठी राहण्याचा विचार करीत आहे.
 2. राष्ट्रपती पदासाठी त्यांनी उमेदवारी निश्चित केल्यानंतर देशभरात विरोध प्रदर्शन सुरू झाली. त्यांच्या या निर्णयाचा नागरिकांनी विरोध केला असून हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.
 3. 1999 साली अब्देलअझीझ बुतेफ्लिका अल्जेरियाचे राष्ट्रपती बनले. गृहयुद्धाचा अंत करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. 
 4. अल्जेरिया हा आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील माघरेब प्रदेशामधील एक देश आहे.
 5. सध्या अल्जेरियामध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार आहे.
 6. अल्जीयर्स ही अल्जीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 7. अल्जेरियाई दिनार हे राष्ट्रीय चलन आहे.


Top