MPSC chalu ghadamodi, current affairs

1. डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे. त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.

2. भारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे.

3. त्यानंतर आता आरबीआयने प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) हा नवा पर्याय आणला आहे.

4. तर पीपीआयचे विस्तारीत रुप प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असे आहे. हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे. हे अकाऊंट दर महिन्याला तुम्ही रिचार्ज करु शकता. यासाठी 10 हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एकदा हे अकाऊंट रिचार्ज झाले की त्याचा वापर तुम्ही रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करु शकता. या अकाऊंटचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही.

5. यातील पैसे केवळ वस्तू आणि सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहेत. हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडून किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.

6. तसेच या कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे.

7. या पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच रक्कम जमा करता येणार आहे. हे अकाऊंट रिचार्ज करण्यासाठी आरबीआयने वर्षाला 1 लाख 20 हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच महिन्याला केवळ १०,००० रुपयांपर्यंतच रक्कम ग्राहकाला या अकाऊंटमध्ये ठेवता येणार आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशभरात 16 डिसेंबर पासून दोन महत्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये आरबीआयद्वारे ऑनलाइन बँकिंग ट्रान्जॅक्शन आणि ट्रायद्वारे मोबाईल नंबर पोर्ट करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

2. तर त्यानुसार, ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या (एनईएफटी) सुविधेचा 24 तास लाभ घेता येणार आहे.

3. तसेच आजपासूनच मोबाईल क्रमांक कायम ठेऊन सर्व्हिस प्रोव्हायडर बदलण्याच्या म्हणजेच नंबर पोर्टेबिलिटी सुविधा अधिक सोपी करण्यात आली आहे.

4. एनइएफटी सुविधा आठवड्यातील सर्व दिवस कोणत्याही वेळेत (24/7) वापरता येणार आहे. यापूर्वी या सेवेचा लाभ 24 तास मिळत नव्हता.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पंतप्रधान, श्री. नरेंद्र मोदी 13 नोव्हेंबर 2019 रोजी ब्राझील येथे 11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. यावेळी एक मोठा व्यावसायिक प्रतिनिधी देखील त्यांच्यासमवेत येणार आहे. ब्रिक्स समिट 2019 ची थीम 'इनोव्हेटिव्ह फ्युचर फॉर इकोनॉमिक डेव्हलपमेंट' आहे.

2. या शिखर परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये परस्पर सहकार्य आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. शिखर परिषदेच्या शेवटी एक संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल.

3. ब्रिक्स:

ब्रिक्स (ब्रिक्स - ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) जगातील पाच सर्वात मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे, ज्यात सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांचा समावेश आहे. 2010 मध्ये या गटात दक्षिण आफ्रिकेचा समावेश होता. 2018 मध्ये ब्रिक्स देशांचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) $18 .6 ट्रिलियन डॉलर्स आहे, जे जगातील जीडीपीच्या 23 .2% आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2. तर या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदलाचे निर्णय होण्याची शक्यता होती. त्यामुळे याबैठकीकडं सगळ्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीएसएनएल, एमटीएनएलला उभारी देण्याबरोबरच इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

3. तसेच शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतमालाच्या किमान आधारभूत मूल्यात सरकारने वाढ करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यात रब्बी हंगामातील शेतमालाच्या दरात 85 रूपयांची वाढ करण्यात आली असून, या वाढीनंतर गव्हाच्या किंमती क्विंटलमागे 85 रूपयांची होणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी SBI च्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.

2. तर व्याज दरातील कपात एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी कपात करणार आहे.

3. तसेच परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

4. यापूर्वी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. एसबीआय चे अध्यक्ष रजनीश कुमार यांची भारतीय बँकांच्या असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील मेहता यांच्यानंतर ते पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आयडीबीआय बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा हे 2019-20 साठी आयबीएचे मानद सचिव असतील.

2. रजनीश कुमार हे 1980 मध्ये एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू झाले. त्यांनी २ नोव्हेंबर 2015 पासून एसबीआयचे मॅनेजिंग डायरेक्टर (नॅशनल बँकिंग ग्रुप) आणि एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (अनुपालन व जोखीम) म्हणून काम पाहिले आहे. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक होण्यापूर्वी यांनी यापूर्वी एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड (स्टेट बँक ऑफ इंडियाची मर्चंट बँकिंग आर्म) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले.

3. भारतीय बँका असोसिएशन (आयबीए) ची स्थापना 2 सप्टेंबर 1946 रोजी भारतात कार्यरत असलेल्या बँकिंग व्यवस्थापनाची प्रतिनिधी संस्था म्हणून केली गेली. हे मुंबईतील भारतीय बँक आणि वित्तीय संस्थांची संघटना आहे. 1946 मध्ये भारतातील 22 बँकांचे प्रतिनिधित्व करणारे सुरुवातीच्या सदस्यांसह, आयबीए सध्या भारतात कार्यरत 237 बँकिंग कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. आयबीएची स्थापना भारतीय बँकिंगच्या विकासासाठी, समन्वयासाठी आणि मजबुतीकरणासाठी केली गेली आहे, तसेच सदस्यांना बँकांना नवीन प्रणालींच्या अंमलबजावणीसह आणि सदस्यांमध्ये मानदंड स्वीकारण्यासह विविध प्रकारे सहाय्य करते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आयएमएफचे माजी प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांची युरोपियन सेंट्रल बॅंकेच्या (ईसीबी) प्रमुखपदी नेमणूक झाली. युरोपियन युनियन कौन्सिलने त्यांना युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षपदी नामांकन दिले होते.

2.आयएमएफमधील दुसर्‍या पाच वर्षाची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी लागार्डे यांनी दोन वर्षांचा काळ सोडला. 63 वर्षीय लिगार्डे एक फ्रेंच वकील, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यांना चांगले नेतृत्व आणि संस्थात्मक अनुभव तसेच राजकीय आणि आर्थिक अनुभव आहे. २०११ पासून त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अध्यक्ष आहेत.

3. युरोपियन सेंट्रल बँक ही युरोसाठी मध्यवर्ती बँक आहे आणि युरोझोनमध्ये आर्थिक धोरणाची अंमलबजावणी करते. यात युरोपियन युनियनच्या 19 सदस्य देशांचा समावेश आहे आणि हे जगातील सर्वात मोठे आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय चलनातील 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नसल्याची माहिती आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला आरबीआयने दिलेल्या उत्तरातून याबाबतचा खुलासा झाला आहे.

2. आरबीआयने आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 2000 रुपयांच्या 3,542.991 मिलियन नोटांची छपाई केली होती. तर, 2017-18 मध्ये छपाईत कपात झाली आणि 111. 507 मिलियन नोटा छापण्यात आल्या. यानंतर 2018-19 मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईमध्ये अजून कपात करण्यात आली व केवळ 46.690 मिलियन नोटाच छापण्यात आल्या होत्या.

3. तर सध्याच्या चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

4. बिझनेस स्टॅंडर्डने अधिकाऱ्यांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, दोन हजार रुपयांच्या उच्च नोटांची तस्करी करणे सुलभ आहे, त्यामुळे चलनात अधिक प्रमाणात 2 हजार रुपयांच्या नोटा आल्यास ते सरकारच्या उद्दीष्टांसाठी धोकादायक आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने ‘पीएमसी’ बँकेच्या खातेधारकांसाठी खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

2. तर आता या बँकेचे खातेधारक सहा महिन्यांच्या कालावधीत 40 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. या अगोदर पैसे काढण्याची मर्यादा 25 हजार रुपये होती.

3. तर याप्रकरणी ईडीने ‘एचडीआयएल’चे संचालक, प्रवर्तक यांच्यासह पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांची तब्बल 3 हजार 830 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) यांचे विलीनीकरण सुलभतेने व्हावे यासाठी 34 कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

2. तर येत्या 1 एप्रिलपासून या या विलीनीकरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

3. तसेच या बँकांच्या एकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 34 कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीत तिन्ही बँकांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. कर्ज प्रक्रिया, कर्ज मुदत आणि ग्राहकांना देण्यात येणा-या लाभांचे मानकीकरण करण्याचा प्रयत्नही समित्या करतील. बँकांचे विलीनीकरण पूर्ण होईपर्यंत ग्राहकांशी संबंधित कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी हे मानकीकरण केले जाणार आहे.


Top