Golden Globe Awards 2018

 1. 76 व्या वार्षिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
 2. यावेळी 2018 सालच्या चित्रपट आणि अमेरिकन दूरदर्शन कार्यक्रमांमधील सर्वोत्तमांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 3. विजेत्यांची यादी –
  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट (नाट्य) – बोहेमियन रॅप्सोडी
  2. सर्वोत्कृष्ट चित्रपट (संगीत किंवा विनोदी) – ग्रीन बुक
  3. सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाट्य) - रॅमी मलेक (बोहेमियन रॅप्सोडी)
  4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाट्य) - ग्लेन क्लोज (द वाइफ)
  5. सर्वोत्कृष्ट अभिनेता (संगीत किंवा विनोदी) – क्रिस्टीन बेल (वाइस)
  6. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (संगीत किंवा विनोदी) – ओलिव्हीया कोलमन (द फेवराइट)
  7. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फोन्सो कुअरॉन (रोमा)
  8. सर्वोत्कृष्ट चित्रपट (अॅनिमेटेड) - स्पायडर-मॅन: इन्टू द स्पायडर-वेर्स
  9. सर्वोत्तम चित्रपट (परदेशी भाषा) – रोमा
 4. गोल्डन ग्लोब पुरस्कार:-
  1. अमेरिकेत दरवर्षी हॉलीवुड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) मनोरंजन जगतात उत्कृष्ट कामगिरींसाठी देशी-परदेशी कलाकारांना, चित्रपटांना गोल्डेन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करते.
  2. पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार जानेवारी 1944 ला दिला गेला.


Asha Parekh and Farooq Shaikh have been honored with Bimal Roy Memorial and Film Society Award

 1. प्रख्यात चित्रपट निर्माता बिमल रॉय यांच्या 52 व्या पुण्यतिथीनिमित्त, चित्रपटसृष्टीतले जेष्ठ अभिनेते फारूक शेख आणि आशा पारेख यांना ‘बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी’ पुरस्कार देण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
 2. यांच्या व्यतिरिक्त दिग्दर्शक अनंत महादेवन आणि अमित राय तसेच अभिनेता परेश रावल आणि जॅकी श्रॉफ यांनाही हा पुरस्कार दिला जात आहे.
 3. बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी याची स्थापना सन 1997 मध्ये करण्यात आली.
 4. बिमल रॉय हे भारतीय चित्रपट जगताचे 1940च्या दशकातले सर्वोत्कृष्ट निर्माते मानले जाते.
 5. 22 सालापासून हिन्दी चित्रपट निर्मात्यांना ‘बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी’ पुरस्काराने सन्मानित केले जात आहेत.


Andhra Pradesh gets CBIP award for Polavaram project

 1. पोलावरम प्रकल्पासाठी आंध्रप्रदेशाला ‘केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळ (CBIP) पुरस्कार’ मिळाला आहे.
 2. गोदावरी नदीवर पोलावरम धरण हा बहुउद्देशीय प्रकल्प कमी वेळेत सर्वोत्तम अंमलबजावणी केल्यामुळे आंध्रप्रदेशाला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 3. आंध्रप्रदेश राज्यासाठी पोलावरम प्रकल्प एक जीवनरेखा ठरत आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत 64% काम पूर्ण झाले आहे.
 4. आतापर्यंत प्रकल्पावर 15,380.97 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
 5. केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळ (Central Board Of Irrigation And Power -CBIP) ही 1927 साली भारत सरकारद्वारे उभारलेली एक प्रमुख संस्था आहे.
 6. ही संस्था वीज, जलस्त्रोत आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील संबंधित व्यवसायिक संस्था, अभियंता आणि व्यक्तींना समर्पित सेवा देते.


Distribution of the prestigious 'Ramnath Goenka' award in the field of journalism

 1. दि. 4 जानेवारी 2019 रोजी पत्रकारिता क्षेत्रात दिले जाणारे प्रतिष्ठित ‘रामनाथ गोयंका’ पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहे.
 2. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका समारंभात हे पुरस्कार दिले गेलेत.
 3. यावर्षी विविध श्रेणींमध्ये भारतभरातील 29 पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला.
 4. त्यातीलच काही पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत -
  1. बेस्ट ऑफ द स्पॉट रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी - जगविंदर पटियाल (एबीपी)
  2. पॉलिटिकल रिपोर्टिंग श्रेणी - ब्रजेश राजपूत (एबीपी) आणि सुशांत कुमार सिंग (इंडियन एक्सप्रेस)
  3. अंडरकवरिंग इंडिया इंव्हिजिबल रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी - प्रतिमा मिश्रा (एबीपी न्यू)
  4. हिंदी स्टोरी/जनर्लिजम श्रेणी - अभिसार शर्मा (एबीपी न्यू)
  5. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टिंग/ब्रॉडकास्टिंग श्रेणी - आनंद कुमार पटेल (इंडिया टुडे)
  6. रिजनल लॅंगवेज श्रेणी - एम. गुनासेकरन (न्यूज 18 तामिळनाडू), निशांत दत्ताराम सरवंकार आणि संदीप अशोक आचार्य (लोकसत्ता)
  7. एनवायरनमेंट श्रेणी - सुशील चंद्र बहुगुना (NDTV), संध्या रवीशंकर (द वायर)
 5. पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी दरवर्षी रामनाथ गोयंका मेमोरियल फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठित ‘रामनाथ गोयंका’ पुरस्कार दिला जातो.
 6. प्रथम 2006 साली हा पुरस्कार दिला गेला.


National Entrepreneurship Awards Allocation

 1. दि. 4 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीत एका समारंभात केंद्र सरकारच्या केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाकडून तृतीय ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारां’चे वितरण करण्यात आले आहे.
 2. देशात उद्योजकतेचे वातावरण तयार करण्यास उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशातल्या प्रथम पिढीच्या तरुण उद्योजकांना आणि निर्मात्यांना हा पुरस्कार विविध औद्योगिक क्षेत्रात 43 श्रेणींमध्ये दिला गेला आहे.
 3. राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार २०१८ -
  1. कौशल्य विकास मंत्रालयाचा असाच एक उपक्रम म्हणजे 'राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार २०१८'.

  2. 2016 साली राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार देण्यास सुरुवात केली.

  3. तरूण, होतकरू आणि कोणतीच पार्श्वभूमी नसताना उद्योग उभ्या करणाऱ्या उद्योजकांचा सत्कार करण्यासाठी हे पुरस्कार दिले जात आहेत.

  4. नोकरीच्या संस्कृतीपासून व्यावसायाकडे वळणाऱ्या,जोखीम स्वीकारणाऱ्या तरुणांचा हा सन्मान आहे.

  5. छोट्या उद्योजकांसाठी हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे.

  6. हे छोटे उद्योजक मातीशी चिकटून राहून अत्यंत साधी राहणी ठेवत आव्हानांना तोंड देत उद्योग मोठे करतात. म्हणून त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे.

 4. पुरस्काराचे ठळक मुद्दे- 

  1. एकूण ४३ पुरस्कार दिले जाणार आहेत.

  2. यातील ३९ पुरस्कार तरूण उद्योजकांना तर चार उद्योजकतेच्या वातावरणाची निर्मिती करणाऱ्यांना दिले जाणार आहे. 

 5. पुरस्कारासाठी पात्रता-

  1. उद्योजकाचं वय ४०हून अधिक नसावं 

  2. उद्योजकाला घरातून व्यापाराची पार्श्वभूमी नसावी 

  3. महिला उद्योजक असल्यास उद्योगातील ७५ टक्क्यांहून अधिक मालकी असावी.

 6. पुरस्काराचे स्वरूप-

  1. 15 परिभाषित श्रेणींमध्ये वैयक्तिक उद्योजकासाठी बक्षीसाची रक्कम ५ लाख रुपये तर संस्थांसाठी १० लाख रुपये रोख बक्षीसासह प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिले जाते.

 7. पुरस्कारांचे वर्गीकरण -

  1. पुरस्कारांचे तीन विभागांमध्ये वर्गीकरण झाले आहे. 

   1. एक लाखहून कमी भांडवल असलेले उद्योजक 

   2. एक लाख ते १० लाखादरम्यान भांडवल असलेले उद्योजक 

   3. १० लाखहून अधिक भांडवल असणारे उद्योजक


DIPP's Clean India Grand Challenge Award

 1. 1 ते 15 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी) ‘स्वच्छ भारत ग्रॅण्ड चॅलेंज’ पुरस्कारांसाठी अर्ज मागवले होते.
 2. देशातील स्टार्ट अप्सच्या नावीन्यपूर्ण उपायांना सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार असून त्यासाठी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जल व सांडपाणी व्यवस्थापन आणि हवा व्यवस्थापन अशी चार क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती.
 3. यासाठी 22 राज्यांमधल्या 70 जिल्ह्यांमधून 165 अर्ज आले.
 4. हवा व्यवस्थापन क्षेत्रात पुण्यातील ‘स्मॉल स्पार्क कन्सेप्टस टेक्नॉलॉजीज प्राइवेट लिमिटेड’ ने द्वितीय पारितोषिक पटकावले.
 5. डीआयपीपीचे सचिव रमेश अभिषेक यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 6. प्रथम पुरस्कार दोन लाख रुपयांचा असून द्वितीय पुरस्कार एक लाख रुपयांचा आहे.


Jagdev Singh Veeradi received the Royal Honor of 'Member of the British Empire'

 1. ब्रिटीश शिख रिपोर्ट (BSR) याचे संपादक जगदेव सिंग वीरदी यांना ‘मेंबर ऑफ ब्रिटिश एंपायर (MBE)’चा रॉयल सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे.
 2. जगदेव सिंग वीरदी यांनी ब्रिटनमधील सिख समुदायाच्या जीवनाबाबत अंतर्दृष्टी प्रदान केली आहे.
 3. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना बंकिंगहॅम पॅलेसमध्ये एका सोहळ्यात प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते हा शाही सन्मान दिला गेला आहे.


Subhasini Mistry won the Padma Shri award

 1. परिस्थिती अतिशय हलाखीची होती म्हणून नवऱ्याला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेता आलं नाही. पैशाच्या अभावी शेवटी नवरा मृत्युमुखी पडला. वयाच्या २३व्या वर्षी आलेलं वैधव्य आणि पदरात लहान ४ मुलं.
 2. मात्र नियतीने दिलेल्या ह्या व्रणाला कुरवाळत न बसता त्यांनी नियतीला सुंदर प्रत्युत्तर दिलं.
 3. २० वर्ष घरकाम आणि भाजी विकून जमवलेल्या पैशातून आज त्यांनी जिल्ह्यातलं पहिल इस्पितळ बांधलं ... होय ..मानवता_हॉस्पिटल ..!
 4. जिथे गोरगरिबांना मोफत उपचार मिळतात.
 5. पायात साधी स्लीपर घालून पद्मश्री स्वीकारणारी ही बाई म्हणजे .. सुभासिनी_मिस्त्री.
 6.  ह्या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी स्वीकारला..!


Asma Jahangir 'posthumous' prestigious human rights award'

 1. संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानची प्रख्यात कार्यकर्ता असमा जहांगीर यांना मरणोत्तर प्रतिष्ठित मानवाधिकार पुरस्कार देऊन सन्मानित केले. 
 2. संयुक्त राष्ट्र संघाने ऑक्टोबर महिन्यात असमा जहांगीर यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.
 3. मंगळवारी त्यांची मुलगी मुनीजा जहांगीर यांनी एका विशेष समारोहात संयुक्त राष्ट्र महासभाची अध्यक्ष मारिया फर्नेंडा एस्पिनोसाकडून हा पुरस्कार स्विकारला.
 4. मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येतो.
 5. हा पुरस्कार आतापर्यंत मार्टिव लूथर किंग, नेल्सन मंडेला आमि जिमी कार्टक सारख्या महान व्यक्तींना देण्यात आला आहे. 
 6. आता या यादीत असमा जहांगीर यांचे नाव देखील जोडले गेले आहे. असमा जहांगीर त्या मोजक्याच कार्यकर्त्यांपैकी आहेत, ज्यांनी हुकूमशाही पाकिस्तानी सरकारच्या अन्यायाविरूध्द आवाज उठवला. त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या हुकूमशाहीचा देखील विरोध केला. 
 7. यावर्षी 11 फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले.


PETA India nominated actress Sonam Kapoor as the 'Person of the Year' of 2018

 1. सोनम कपूर हिला पीपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्झ (PETA) इंडियाने 2018 वर्षाची 'पर्सन ऑफ दी ईयर' म्हणून नामांकित केले आहे.
 2. PETA इंडिया असोसिएटचे संचालक सचिन बांगेरा यांनी दिलेल्या व्यक्तव्यात म्हटले आहे की, ती प्राण्यांना दुःखग्रस्त न करता शाकाहारी जेवणांचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या चाहत्यांना प्राण्यांना दुःख देण्यापासून रोखण्यासाठी नेहमी विनंती करते, यात ती कधीही संकोच करत नाही.
 3. अलिकडेच दिल्लीचे मंत्री इमरान हुसैन यांना पेटा 'हीरो टू अॅनिमल' पुरस्कारापे सन्मानित केले आहे.
 4. PETA इंडियाच्या पर्सन ऑफ द ईयर पुरस्काराच्या मागील प्राप्तकर्त्यांमध्ये अनुष्का शर्मा, सनी लियोनी, शशी थरूर, माजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश के एस पनिकर राधाकृष्णन, कपिल शर्मा, हेमा मालिनी, आर. माधवन आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा समावेश आहे.


Top