Pinaki Chandra Ghosh: India's first Lokpal

 1. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे.
 2. आता औपचारिकता पूर्ण करून राष्ट्रपती राम नाथ कोविंद न्या. घोष यांची अधिकृत नेमणूक करतील.
 3. न्या. घोष यांच्या नेमणुकीने लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर पाच वर्षांनी भारताला पहिला लोकपाल मिळणार आहे.
 4. न्या. घोष 66 वर्षांचे असल्याने वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे चार वर्षे ते लोकपाल संस्थेचे अध्यक्ष राहतील. त्यांना पगार व दर्जा सरन्यायाधीशासमान असेल.
 5. न्या. घोष सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयातून सन 2017 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांची आयोगात नेमणूक झाली होती.
 6. लोकपाल म्हणजे काय?
  1. लोकपाल (Ombudsman) म्हणजे अशी अधिकृत व्यक्ती/मंडळ, जे वैयक्तिक तक्रारीची दखल घेत कुठल्याही कंपनी आणि संस्थेची (विशेषत: सार्वजनिक) चौकशी करू शकते.
  2. सन 2014 मध्ये ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ या कायद्याला संसदेने मंजुरी दिली होती.
  3. लोकपाल संस्था कोणत्याही संविधानाच्या आधाराशिवाय चालणारी एक वैधानिक संस्था आहे, जी पंतप्रधान सहित सर्व लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत तपास करू शकण्यास सक्षम असणार.
  4. लोकपाल कायद्यानुसार लोकपाल संस्थेवर अध्यक्षांखेरीज किमान आठ सदस्यही नेमण्यात येणार आहेत. यापैकी चार सदस्य न्यायिक व चार सदस्य गैरन्यायिक असतील.
  5. दोन्ही प्रकारच्या सदस्यांपैकी किमान 50% सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य व महिला यांच्यातून नेमण्यात येतील.


M. R. Kumar: New Director of Life Insurance Corporation of India

 1. एम. आर. कुमार ह्यांची भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) याच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. या व्यतिरिक्त विपिन आनंद आणि टी. सी. सुशील कुमार ह्यांना व्यवस्थापकीय संचालक (MD) पदी नियुक्त केले गेले.
 3. भारतीय जीवन विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India -LIC) हा एक भारतीय सरकारी विमा गट आहे.
 4. या संस्थेची स्थापना दिनांक 1 सप्टेंबर 1956 रोजी झाली आणि मुंबईत त्याचे मुख्यालय आहे.
 5. ही भारतातली सर्वात मोठी विमा कंपनी आहे.


Dr. A. Of Mohanty: new director of Bhabha Atomic Research Center

 1. दिनांक 12 मार्च 2019 रोजी भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) याच्या संचालक पदाची जबाबदारी डॉ. अजित कुमार मोहंती यांनी स्वीकारली.
 2. डॉ. मोहंती एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भाभा अणू संशोधन केंद्राच्या भौतिक समूहाचे संचालक आहेत.
 3. त्यांच्या 36 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी आण्विक भौतिकशास्त्राच्या विविध क्षेत्रात कार्य केले आहे.
 4. BARC:-
  1. भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) या संस्थेची दिनांक 3 जानेवारी 1954 रोजी अटॉमिक एनर्जी इस्टेब्लिशमेंट, ट्रॉम्बे (AEET) या नावाने स्थापना झाली.
  2. पुढे 1966 साली भाभा यांच्या मृत्यूनंतर, दिनांक 22 जानेवारी 1967 रोजी केंद्राचे वर्तमान नावाने नामकरण करण्यात आले.
  3. ही भारतातली प्रमुख अणू संशोधन विषयक सुविधा आहे. त्याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे.
  4. डॉ. होमी जे. भाभा त्याचे संस्थापक मानले जातात.
  5. भारताचे पहिले-वहिले पॉवर रिएक्टर ‘तारापूर अणू वीज केंद्र’ येथे अमेरिकेच्या मदतीने स्थापन करण्यात आले.


Mohamed Shatayeh: The new Prime Minister of Palestine

 1. पॅलेस्टाईन अथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी पॅलेस्टाईनच्या पंतप्रधान पदी मोहम्मद शताएह यांची नियुक्ती केली आहे.
 2. ही नियुक्ती निवृत्त झालेल्या रामी हमदल्लाह यांच्या जागी झाली आहे.
 3. पॅलेस्टाईन हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे.
 4. देशाच्या सीमेवरून या प्रदेशाचा इस्राएलसोबत दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.
 5. 1993 सालाच्या ओस्लो कराराच्या परिणामस्वरूप, पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी गाझा-जेरिको कराराच्या आधी 1994 सालीच स्थापन करण्यात आलेले अंतरिम स्वयं-सरकारी मंडळ आहे.
 6. वेस्ट बॅंकेच्या क्षेत्र-ए आणि क्षेत्र-बी तसेच गाझा पट्टी या प्रदेशांचे प्रशासन सांभाळण्यासाठी 1994 साली गाझा-जेरिको करार (कैरो करार) केला गेला.


Soumya Swaminathan: Chief Scientist of the new Department of World Health Organization

 1. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) त्याच्या नव्या विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून सौम्या स्वामीनाथन यांची नेमणूक केली आहे.
 2. संघटनेनी ‘डिजिटल आरोग्य विभाग’ (Department of Digital Health) नावाचा नवा विभाग तयार केला आहे आणि त्यासाठी मुख्य शास्त्रज्ञ हे पद तयार केले आहे.
 3. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने बदलत चाललेल्या आरोग्य सेवांच्या योग्य व्यवस्थापनासाठी हा विभाग जबाबदार असणार आहे.
 4. हा विभाग डिजिटल तंत्रज्ञानाचे मूल्यांकन करण्यामध्ये आपली भूमिका वाढवेल आणि देशांना समर्थन कसे द्यावे आणि त्यांचे नियमन कसे करावे याबद्दल निर्णय घेण्यास मदत करणार आहे.
 5. सौम्या स्वामीनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या तीन उप-महासंचालकांपैकी एक होत्या, ज्या WHO महासंचालक टेड्रोस अॅदोनोम गेब्रेयेसुस यांना मदत करत होत्या.
 6. जागतिक आरोग्य संघटना (WHO):-
  1. ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे.
  2. दिनांक 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन करण्यात आलेल्या WHOचे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.
  3. हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा एक सदस्य आहे.
  4. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.


Padma Lakshmi: The new goodwill ambassador of the UNDP

 1. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) तर्फे त्याच्या नव्या सदिच्छा दूत (गुडविल अॅम्बेसेडर) पदी भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या निवासी असलेल्या पद्मा लक्ष्मी यांची निवड करण्यात आली आहे.
 2. पद्मा लक्ष्मी या जगभरात असलेल्या असमानता आणि भेदभावविरोधी लढ्याचे समर्थन करणार आहेत.
 3. त्या एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, उद्योजिका आणि लेखिका आहेत. त्या अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या दूत आहेत.
 4. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP):-
  1. हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) राबविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे.
  2. 1965 साली याची स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे.
  3. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या सहा विशेष मंडळांपैकी एक असून तो आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अखत्यारीत येतो.
  4. ह्या कार्यक्रमद्वारे जगातील 177 देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते.
  5. दारिद्र्य निर्मुलन, HIV/एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन, लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी उपक्रम यामार्फत चालवले जातात.


Ajay Narayan Jha: new members of the Finance Commission

 1. अजय नारायण झा यांची पंधराव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनल्यानंतर शक्तीकांता दास यांनी आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता.
 3. अजय नारायण झा हे मणीपूरचे 1982 सालचे बॅचचे भारतीय प्रशासन सेवा अधिकारी आहेत.
 4. ते भारत सरकारचे वित्त सचिव होते. यापूर्वी त्यांनी चौदाव्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून काम केले होते.
 5. पंधराव्या पंचवार्षिक वित्त आयोगाची स्थापना नोव्हेंबर 2017 मध्ये एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
 6. एप्रिल 2020 ते मार्च 2025 या कालावधीसाठी राष्ट्र व राज्य यांमधील महसूलाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी त्यायोग्य पद्धत तयार करण्यासाठी हे आयोग तयार करण्यात आले.


Ashok Chawla resigned as the president of TERI

 1. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दि. 13 जानेवारी 2019 रोजी अशोक चावला यांनी दिल्लीच्या ‘ऊर्जा व स्त्रोत संस्था’ (TERI) या ना-नफा संस्थेच्या अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे.
 2. केंद्र सरकारकडून CBIला ‘एयरसेल-मॅक्सिस’ प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला दाखल करण्याला परवानगी मिळालेली आहे.
 3. आर्थिक घोटाळा आणि सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी चावला अडकले आहेत.
 4. संस्थेविषयी:-
 5. ‘ऊर्जा व स्त्रोत संस्था’ (The Energy and Resources Institute -TERI) ही नवी दिल्लीतली एक ना-नफा संशोधन संस्था आहे.
 6. जी ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात संशोधन कार्य चालवते.
 7. सन 1974 मध्ये या संस्थेची स्थापना ‘टाटा एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ या नावाने करण्यात आली होती.


Brahma Dutt: new chairman of YES Bank

 1. माजी IAS अधिकारी ब्रह्म दत्त यांची यस बँकेच्या (Yes Bank) अंशकालिक गैर-कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. ही नियुक्ती दि. 4 जुलै 2020 पर्यंत प्रभावी करण्यात आली आहे.
 3. भारतातली चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातली बँक असलेल्या यस बँकेला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून ‘बँकिंग नियमन अधिनियम-1949’ अन्वये परवानगी प्राप्त झाली आहे.
 4. ब्रह्म दत्त जुलै 2013 पासून स्वतंत्र संचालक म्हणून यस बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत.
 5. शिवाय ते ‘नामनिर्देशन आणि वेतन समिती’चे अध्यक्षही आहेत. त्यांनी आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत कर्नाटक सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक जबाबदार्‍या सांभाळलेल्या आहेत.
 6. त्यांनी पूर्वी मंत्रिमंडळ सचिवालयात तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्य पाहिले होते.


Geeta Gopinath: Chief economist in the IMF

 1. गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund -IMF) मुख्य अर्थतज्ञपदी रूजू झाल्या आहेत.
 2. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होणार्‍या गीता गोपीनाथ या प्रथम भारतीय महिला ठरल्या आहेत.
 3. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद यापूर्वी रघुराम राजन यांनी बजावले असून हा मान प्राप्त करणाऱ्या गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
 4. मैसूरमध्ये जन्म झालेल्या गोपी गोपीनाथ हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. तसेच त्या दि. 2 ऑक्टोबर 2018 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत होत्या.
 5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)-
  1. दि. 27 डिसेंबर 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली.
  2. ही 1945 साली 29 सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली.
  3. सध्या IMF चे 188 सदस्य देश आहेत.
  4. याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.
  5. देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्‍या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते.
  6. तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.


Top