CEO of Indu Bhushan Ayushman Bharat campaign CEO

 1. इंदू भूषण यांची 'आयुष्मान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (ABNHPM)' च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. CEO पदावर त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार.
 2. भूषण सध्या मनीला स्थित आशियाई विकास बँक (ADB) चे महासंचालक आहेत. ते १९९७ पासून ADB मध्ये कार्यरत आहेत.
 3. भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'आयुष्मान भारत' योजनेंतर्गत देशामधील १० कोटी गरीब कुटुंबांना (अंदाजे ५० कोटी लाभार्थी) प्रत्येकी ५ लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी सुविधा प्रदान करण्यासाठीची योजना आहे.
 4. ही योजना १ एप्रिल २०१८ पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात येणार आहे.


Regarding the birth anniversary of Guru Gobind Singh, the RBI 350 coins will be released

 1. १० वे आणि शेवटचे शीख गुरू गुरु गोबिंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) रु.३५० मूल्य असलेले नाणे प्रसिद्ध करणार आहे.
 2. रु.३५० नाणे ३५ ग्रॅम वजनी असून ते ५०% चांदी, ४०% तांबा आणि प्रत्येकी ५% निकेल आणि जस्त अश्या मिश्र धातूंनी बनविले गेलेले असेल.
 3. नाण्याच्या उलट बाजूवर तख्त श्री हरिमंदिर पटना साहिबचे चित्र असेल.
 4. आंतरराष्ट्रीय अंकामध्ये '१६६६' आणि '२०१६' नाण्याच्या डाव्या आणि उजव्या परिघांवर छापलेले असेल.


Ashok Gehlot appointed as Congress general secretary in charge

 1. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची पक्षाच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती केली आहे.
 2. गहलोत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे निकटवर्तीय असलेल्या जनार्दन द्विवेदी यांचे स्थान घेतील.
 3. दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अशोक गहलोत यांना मिळालेल्या पदोन्नतीमागे काँग्रेसला गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत मिळालेले चांगले यश कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान गहलोत हे पक्षाचे गुजरात प्रभारी होते.
 4. गहलोत यांनी 1998 ते 2003 आणि 2008 ते 2013 या काळात राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
 5. यापुढे पक्षामध्ये तरुणांना महत्त्वाची भूमिका मिळेल, तर ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या अधिवेशनात सांगितले होते.


Trump administration bans, cancellation of more than one visa application

 1. अमेरिकेत काम करणाऱ्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनानं दणका दिला आहे. कारण, एकापेक्षा अधिक व्हिजासाठी अर्ज केल्यास, ते रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
 2. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांमध्ये एच 1 बी व्हिसा अतिशय लोकप्रिय आहे. पण ट्रम्प प्रशासनाच्या नवीन व्हिसा धोरणामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा फटका बसणार आहे.
 3. अमेरिकेच्या यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसची व्हिसा प्रक्रिया 2 एप्रिल पासून सुरु होणार आहे. पण 1 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षासाठी हा व्हिसा दिला जाईल.
 4. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसासाठी ज्या व्यक्ती एकापेक्षा अधिक अर्ज करत आहेत, ते यातील लॉटरी प्रक्रियेत अडचणी निर्माण करत आहेत.
 5. अमेरिकेच्या इमिग्रेशन काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार, एच 1 बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला काम करण्याचा व्हिसा देण्याची तरतूद रद्द करण्यात येणार आहे.
 6. वास्तविक, ओबामा सरकारच्या कार्यकाळात 2015 मध्ये एच 1 बी व्हिसा मिळालेल्या व्यक्तींला त्याच्या जोडीदारांलाही तशाच प्रकारचा काम करण्याचा व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. पण विद्यमान ट्रम्प प्रशासनाने ही प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
 7. प्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार, 2010 ते 2016 दरम्यान एच 1 बी व्हिसा धारकांना टेक्सास आणि पूर्व किनारपट्टीच्या शहरांत रोजगाराच्या संधी मिळतात. वास्तविक, एच 1 बी व्हिसा धारकांना सिलिकॉन व्हॅलीत रोजगाराच्या संधी मिळणं अपेक्षित होतं.


Top

Whoops, looks like something went wrong.