mumbai airport rename as chatrapati shivaji maharaj international airport

 

 1. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' अशी सुधारणा करण्यात आली आहे.
 2. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करण्यात आली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असा शिवरायांचा पूर्ण उल्लेख नावात करण्यात आला आहे.
 3.  यापूर्वी मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटलं जात होतं. मात्र आता त्यात 'महाराज' या शब्दाची भर घालण्यात आली आहे.
 4. नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली.
 5. महाराष्ट्रातील जनतेने यासंदर्भात कित्येक वर्षांपासून मागणी केली होती. ती अखेर पूर्ण झाल्याबद्दल प्रभूंनी महाराष्ट्रीय नागरिकांचं अभिनंदनही केलं. तसंच महाराष्ट्राच्या मागणीकडे लक्ष दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार व्यक्त केले आहेत.
 6.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत ही बातमी शेअर केली आहे. महाराष्ट्र सरकारची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांनी प्रभू आणि मोदींचे आभार व्यक्त केले आहेत.


indian currency report

 1. रुपयातील घसरण अजूनही सरूच आहे. 30 ऑगस्ट रोजी डॉलरच्या तुलनेत रूपया 70.82 या नव्या नीचाकांवर पोहोचला. रुपयातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण आहे.
 2. 29 ऑगस्ट रोजी रूपया 70.59 वर बंद झाला होता.
 3. डॉलरला वाढलेली मागणी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निधी काढण्याचे प्रमाण वाढल्याने ही घसरण झाली आहे.
 4. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने रिफायनरी कंपन्यांची डॉलरमध्ये मागणी वाढली आहे. त्याचबरोबर परकीय बाजारात अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरच्या मजबुतीमुळेही रुपया प्रभावित झाला आहे.
 5. रुपयाची घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम सामान्य व्यक्तीच्या खिशावर पडणार आहे.
 6. यामुळे फ्रिज, टीव्ही, एसी आणि लॅपटॉपसारख्या ग्राहकोपयोगी आणि इलेक्टॉनिक साहित्याच्या किंमतींमध्ये वाढ होईल. यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील.


indian nitu has won gold medal

 1. बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या Youth Boxing Championship स्पर्धेत भारताच्या नितूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 2. या स्पर्धेत नितूने सलग दुसऱ्या वर्षात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 3. ४८ किलो वजनी गटात नितूने थायलंडच्या निलादा मेकॉनचा पराभव केला. मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेतही नितूने सुवर्णपदक ठरलं आहे.
 4. सामन्याच्या सुरुवातीला नितू थोडीशी गोंधळलेली पहायला मिळाली होती. मात्र वेळेतच नितूने स्वतःला सावरत सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली.
 5. या आक्रमक खेळामुळे पंचांनी विजेतेपदाचं माप नितूच्या पदरात टाकलं. मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेत भारतीय महिलांनी ७ पदकं कमावली होती.
 6. नितू व्यतिरीक्त भारताच्या मनिषा, अनामिका आणि साक्षी या खेळाडूही पदकांच्या शर्यतीमध्ये आहेत, त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष असणार.


Top

Whoops, looks like something went wrong.