1. नागरिकांना अद्यावत आणि सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय नॅक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी स्वीकारला
 2. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक सेवा पुरविण्याकरिता हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती  आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
 3. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. ही आरोग्य सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील   साहूर प्राथमिक आरोग्य केंद्र अग्रेसर असल्याने पुरस्काराकरिता केंद्राची निवड झाली आहे. 
 4. तसेच येथे देण्यात येत असलेली सुविधा, प्रयोगशाळा नागरिकांकरिता महत्त्वाची ठरत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी पुणे येथे आयोजित एका बैठकीत स्वीकारला.
 5. साहुर प्राथमिक केंद्राप्रमाणे जिल्ह्यातील इतर आठ प्राथमिक आरोग्य केंद्र बनविण्यात येणार आहे. याकरिता   रांगणा,  मांडगाव,  अल्लीपूर,  विजयगोपाल,  कन्नमवारग्राम,  सिंदी (रेल्वे) आणि हमदापूर येथील आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे. हे केंद्रही अद्यावत करण्यात येणार आहे. सध्या साहुर येथील आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.


 1. SRS च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारतात बालमृत्यु दरामध्ये लक्षणीय घट आढळून आली आहे.
  1. सन 2016 मध्ये बालमृत्यु दरात तीन अंकांनी (म्हणजेच 8%) घट झाली आहे.
  2. सन 2015 मध्ये जन्मलेल्या दर 1000 नवजात बालकांपैकी 37 चा मृत्यू झाला होता. हा आकडा सन 2016 मध्ये घटून 34 वर आलेला आहे.
  3. भारतात जन्मलेल्या एकूण बालकांच्या संख्येत सुद्धा उल्‍लेखनीय घट दिसून आली आहे, जी पहिल्यांदाच घटून 25 दशलक्षच्या पातळीखाली आले आहे.
  4. भारतात झालेल्या नवजात बालकांच्या मृत्यू संख्येत सन 2015 च्या तुलनेत सन 2016 दरम्यान 90,000 ने कमतरता आहे. सन 2015 मध्ये 9.3 लाख नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर सन 2016 मध्ये 8.4 लाख नवजात बालकांचा मृत्यू झाला.
  5. नवजात मुलगा आणि मुली यांच्या संख्येमधील फरक निरंतर घटत आहे, जो की सध्या <10% इतका आहे.
  6. सशक्‍त क्रियाशील समूह (EAG) राज्यांच्या बाबतीत, उत्‍तराखंडला सोडता सर्व राज्यांच्या बालमृत्यू दरात सन 2015 च्या तुलनेत घट दिसून आली आहे. ही घट बिहारमध्ये 4 अंक, आसाम, मध्‍यप्रदेश, उत्‍तरप्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्ये 3 अंक तसेच छत्‍तीसगड, ओडिशा व राजस्‍थान या राज्यांमध्ये 2 अंकांची नोंद केली गेली.
 2. आरोग्य सेवा उत्कृष्ट बनविण्यासंबंधी भारत सरकारकडून केल्या जाणार्‍या देशव्‍यापी प्रयत्नांना फक्त एका वर्षातच सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. सेवा प्रदान करण्यासंबंधी व्‍यवस्थेला बळकट करणे, गुणवत्तेचे आश्‍वासन, RMNCH+A, मनुष्यबळ व समुदाय यासंबंधी प्रक्रिया, माहिती व ज्ञान, औषधे व निदान आणि पुरवठा साखळीचे व्यवस्थापन आदी बाबींचा अश्या पुढाकारामध्ये समावेश आहे.


 1. जपान ओपन सुपर सिरीज भारतीय बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे. 
 2. भारतीय बॅडमिंटन म्हणजे  पी. व्ही. सिंधू,  साईना नेहवालच नव्हे हेच पुरुष खेळाडू दाखवून देत आहेत. 
 3. जागतिक क्रमवारीत 58 हजार 583 गुणांसह आठव्या क्रमांकावर कायम आहे. 
 4. प्रणॉय गतवर्षी दुसऱ्या फेरीत पराजित झाला होता. पण प्रतिस्पर्ध्यांनी सरस कामगिरी केल्यामुळे तो 47 हजार 295 गुणांसह एकोणीसावा झाला आहे. 
 5. बी. साई प्रणीत 48 हजार 360 मानांकन गुणांसह सतरावा आहे, तर अजय जयराम 45 हजार 835 मानांकन गुणांसह विसावा आहे. 
 6. समीर वर्माची प्रगती कायम आहे. त्यानेच या क्रमवारीत भारतीयात सर्वोत्तम प्रगती केली आहे. त्याने चार क्रमांकाने प्रगती केली आहे. तो आता 21 वा आहे. 
 7. त्याचे मानांकन गुण 44 हजार 642 आहेत. समीरने जपान स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली होती. 
 8. पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत पुन्हा जागतिक क्रमवारीत  दु सरे स्थान मिळवले आहे. तिचे मानांकन गुण 81 हजार 106 आहेत. 
 9. तईचे मानांकन गुण 94 हजार 409 आहेत.  साईना अजूनही टॉप टेनबाहेर आहे. ती बाराव्या स्थानावर कायम आहे. 
 10. प्रणव जेरी चोप्रा - एन सिक्की रेड्डी मिश्र दुहेरीत 19 व्या क्रमांकावर आहेत, हीच भारतीयांची सर्वोत्तम कामगिरी आहे. 
 11. महिला दुहेरीत अश्वीनी पोनप्पा -  एन सिक्की रेड्डी या 23 व्या क्रमांकावर आहेत. 


 1. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.
 2. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते  बनवारीलाल पुरोहित यांची  तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 3. महाराष्ट्राचे राज्यपाल  सी. विद्यासागर राव यांच्याकडे बराच काळपासून तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर या राज्यात कायमस्वरूपी राज्यपालांची मागणी होत होती.
 4. पुरोहित यांच्या नियुक्तीमुळे तामिळनाडूला  पूर्णवेळ राज्यपाल मिळाले आहेत. बनवारीलाल पुरोहित हे विदर्भातील नेते. 1977 मध्ये ते राजकारणात सक्रीय झाले. 
 5. भाजपचे ज्येष्ठ नेते  सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यपाल मलिक हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते काही काळ लोकसभा व राज्यसभा सदस्य होते. ते जनता दलाचे नेते होते. नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 
 6. सध्या ते भाजपाचे उपाध्यक्ष होते. उत्तर प्रदेशातील जाटांचे नेते अशीही त्यांची ओळख होती. 
 7. रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर हे बिहारच्या राज्यपालांचे पद रिक्त होते.  बि हार विधान परिषदेचे माजी सदस्य  गंगाप्रसाद यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 8.  आसामच्या राज्यपालपदी  जगदीश मुखी यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. जगदीश मुखी दिल्ली भाजपाचे नेते म्हणून ओळखले जातात. दिल्ली सरकारमध्ये त्यांनी अर्थ, नियोजन, अबकारी कर, कररचना व उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम केले आहे.
 9.  अ‍ॅडमिरल (सेवानिवृत्त)  देवेंद्र कुमार जोशी हे आता  अंदमान व निकोबारचे नायब राज्यपाल असतील. ब्रिगेडियर (सेवानिवृत्त)  बी. डी. मिश्रा अरुणाचलचे राज्यपाल असतील.  ना गालँडचे राज्यपाल   पद्मनाभ  बालकृष्ण आचार्य अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार पहात होते.


 1. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने विविध श्रेणीत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात दिले जाणारे ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार प्राप्त करणार्‍यांची नावे जाहीर केली.
 2. पुरस्कार विजेत्यांची यादी
  1.  जैव-विज्ञान क्षेत्र - डॉ. दीपक धन्यवादप्पन नायर आणि डॉ. संजीव दास
  2.  रसायन विज्ञान क्षेत्र – डॉ. जी. नरेश पटवारी
  3.  भूशास्त्र, पर्यावरण, सागरी व ग्रह विज्ञान क्षेत्र – डॉ. एस. सुरेश बाबू
  4.  अभियांत्रिकी विज्ञान क्षेत्र – डॉ. आलोक पॉल आणि डॉ. नीलेश बी. मेहता
  5.  वैद्यकीय विज्ञान क्षेत्र - डॉ. अमित दत्त आणि डॉ. दीपक गौर
  6.  भौतिक विज्ञान क्षेत्र - डॉ. निस्सीम कानेकर आणि डॉ. विनय गुप्ता
 3. दरवर्षी दिले जाणारे शांती स्वरूप भटनागर  विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) द्वारा उल्लेखनीय व असाधारण संशोधन, अप्लाइड वा मूलभूत श्रेणीत जैवविज्ञान, रसायनशास्त्र, भूशास्त्र, पर्यावरण, सागरी व ग्रह, अभियांत्रिकी, गणिती, वैद्यकीय व भौतिक विज्ञान या क्षेत्रांमध्ये दिले जातात.
 4. हा पुरस्कार CSIR चे संस्थापक व प्रथम संचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात सन  1957 पासून केली गेली.5 लाख रूपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.