1. सासवड या आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी दोन महत्त्वाच्या संस्थांतर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार 'लोकमत'चे संपादक राजू नायक यांना जाहीर झाला आहे.परिषद, सासवड यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
  2. आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथीदिनी १३ जून रोजी सासवड येथे या पुरस्काराचे वितरण  होईल. यापूर्वी हा पुरस्कार कुमार केतकर, किरण ठाकूर, संजय राऊत, राजीव साबडे, शरद कारखानीस, डॉ. दीपक टिळक, प्रकाश कुलकर्णी, राजीव खांडेकर, सुरेश भटेवरा, प्रवीण बर्दापूरकर यांना मिळाला आहे.
  3. राजू नायक यांनी विविध मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांत पत्रकारिता केली आहे. पर्यावरणविषयक पत्रकारितेसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांची कित्येक पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यात पर्यावरणविषयक दोन पुस्तकांचा समावेश आहे. गोव्याच्या खाण व्यवसायाचा पर्दाफाश करणारे 'खंदक' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.


  1. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती  झालेल्या माजी राज्यमंत्री  सुलेखा कुंभारे  यांनी आयोगाचे अध्यक्ष गैरुल हसन रिझवी यांच्या उपस्थितीत लोकनायक भवनात पदभार स्वीकारला. 
  2. यावेळी कुंभारे म्हणाल्या की, अल्पसंख्य समाजाच्या न्याय्य हक्कांबरोबरच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक पुनरुत्थानासाठी मी मनापासून काम करेन. 
  3. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग मुस्लिम, बौद्ध, शीख, पारशी, जैन, ख्रिश्चन आदी समाजांना विविध क्षेत्रांत न्याय मिळवून देण्याचे काम करतो. अध्यक्ष रिझवी यांच्याव्यतिरिक्त आयोगाचे चार सदस्य आहेत.


  1. अनुदानित, अनुदानपात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीव्दारे होईल.  त्यामुळे शिक्षक भरतीबाबत शाळा व्यवस्थापनांच्या अधिकारावर गदा आली आहे. या निर्णयाने खासगी व सरकारी अनुदानित शाळांमधील भरतीतील गैरप्रकारांना आळा बसेल व भरती गुणवत्तेच्या आधारावर होईल, असा विश्वास  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
  2. भरतीतील गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. उच्च न्यायालयानेही गुणवत्तेच्या आधारे भरतीचे आदेश दिले होते. त्यामुळे शासनाकडून ज्यांना वेतन मिळते, अशा शाळांतील भरती केंद्रीय पद्धतीने होईल. 
  3. तसेच या परीक्षेत उत्तीर्ण शिक्षकांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. पारदर्शी पद्धतीने हे करण्यासाठी वेब पोर्टलद्वारे व वृत्तपत्रांतून शिक्षकांच्या रिक्त जागा नमूद करण्यात येतील. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतील.


Top