ISRO's GSAT-6A satellite launch

 1. भारताच्या आजवरच्या सर्वात मोठया स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोने 29 मार्च रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
 2. उच्च शक्तीच्या एस बँड संचार उपग्रहाने युक्त असलेल्या या उपग्रहाचं आयुष्यमान दहा वर्ष आहे. हा उपग्रह जियोसिनक्रोनस उपग्रह प्रक्षेपण याना (जीएसएलव्ही-एफ 08)द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
 3. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा केंद्रावरून GSLV-F08 हे यान दुपारी 4 वाजून 56 मिनिटांनी अवकाशात झेपावलं. या मोहिमेचं काऊंटडाऊन बुधवारी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी सुरु झाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं.
 4. जीसॅट-6’ प्रमाणेच ‘जीसॅट-6 ए’ हा उपग्रह असल्याचे इस्रोने स्पष्ट केलं असून, या उपग्रहामुळे आयटी इंजिनियर्सना आपले नवनवे उपक्रम तयार करण्यासाठी मदत मिळेल.
 5. 2066 किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी 270 कोटी रुपये खर्च आला आहे. GSAT-6A उपग्रह GSAT-6 या उपग्रहासारखाच असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.
 6. GSAT-6A या दळणवळण उपग्रहाकडे सर्वात मोठी अँटिना असून इस्त्रोने या अँटिनाची निर्मिती केली आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष किरण कुमार यांनी ही माहिती दिली.
 7. उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर ६ मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.
 8. GSAT-6A हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या GSAT-6 या उपग्रहाला मदत करणार आहे.
 9. GSAT-6A मुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल.
 10. GSAT-6A मुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल.
 11. GSAT-6A च्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्हीमध्ये क्रायोजेनिक इंजिनासह विकास इंजिनचाही वापर करण्यात आला. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेत विकास इंजिनचा वापर होऊ शकतो.
या उपग्रहाची वैशिष्टे
 1. या उपग्रहात 6 एमएस बँड अनफ्लेरेबल अॅन्टिना, हॅडहेल्ड ग्राऊंड टर्मिनल आणि नेटवर्क व्यवस्थापन तंत्रज्ञान आदीचा समावेश आहे.
 2. या उपग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात मल्टी बीम कव्हरेज सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे भारताला मोबाईल संचार प्राप्त होईल.

 


Shekhar Kapur - Head of the Central Committee of the 65th National Film Awards

 1. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना यावर्षी होणार्‍या 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (NFA) केंद्रीय समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
 2. शेखर कपूर या पुरस्कारांसाठी चित्रपटांचे मूल्यांकन करणार्‍या 11 पंचांच्या गटाचे अध्यक्ष होतील.
 3. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (NFA) हा भारतातला सर्वात मुख्य चित्रपट पुरस्कार समारंभ आहे.
 4. 1954 साली स्थापित NFA चे प्रशासन 1973 सालापासून भारत सरकारच्या ‘चित्रपट महोत्सव संचालनालय’ (Directorate of Film Festivals) कडून पाहिले जात आहे.
 5. हे पुरस्कार भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात.


Jalna Vidyalini in Italian World Championship

 1. इटलीतील व्हेरोना शहरात एक ते 10 एप्रिल या कालावधीत तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 14 मुलींची निवड झाली असून, त्यात जालन्याच्या संस्कृती पडुळचा समावेश आहे. या स्पर्धेत संस्कृती पडुळकडून जालनावासियांसह तमाम महाराष्ट्रालाही मोठ्या अपेक्षा आहेत.
 2. जालन्याच्या संस्कृती पडुळची तळपती तलवार आता भारताला जग जिंकून देण्याच्या इराद्यानं रणांगणात दाखल होणार आहे. हे रणांगण आहे तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेचं. इटलीतल्या व्हेरोना शहरात एक एप्रिलपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
 3. तलवारबाजी या खेळात फॉईल, इप्पी आणि सेबर या तीन प्रकारांचा समावेश असतो. तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेतल्या सेबर प्रकारासाठी देशभरातून दोन महिला खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात संस्कृतीचा समावेश आहे. संस्कृतीनं आजवर विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर 35 पेक्षा अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यात तिने 15 पदकांची कमाई केली आहे.
 4. संस्कृतीला पाचवी इयत्तेत असल्यापासून तलवारबाजीची आवड निर्माण झाली. त्या वयात विभागीय पातळीपासून तिने आज जागतिक विजेतेपद स्पर्धेत खेळेपर्यंत मजल मारली आहे.
 5. जालना शहरात सरस्वती भुवन शाळेच्या मैदानावर मुलींसाठी तलवारबाजीच्या प्रशिक्षणाची सोय आहे. पण शहरात सुविधांची वानवा असल्यानं संस्कृतीसारख्या खेळाडू मोठ्या संख्येनं तयार होत नाहीत. त्याचं शल्य प्रशिक्षकांच्या मनात आहे.


The search for the largest organ in the human body

 1. मानवी शरीरात एका नव्या अवयवाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. इंटरस्टिटियम हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 2. शरीरातील पेशींमध्ये इंटरस्टिटियम पसरल्याचा आतापर्यंतचा समज होता. मात्र 'नेचर'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा एकसंघ अवयव असल्याचं म्हटलं आहे.
 3. इंटरस्टिटियम हा मानवी शरीरातील 80 वा अवयव ठरणार आहे. त्वचा आणि इतर अवयवांखाली असलेल्या पेशी हा दाट थर असल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं.
 4. नवीन संशोधनानुसार, हा अवयव म्हणजे द्रवपदार्थाने भरलेल्या कप्प्यांचं जाळं आहे. हे जाळं आकुंचित पावू शकतं किंवा प्रसारित होतं. त्यामुळे शॉक अॅब्झॉर्बरप्रमाणे काम करतं.
 5. इंटरस्टिटियममुळे शरीराच्या एका भागातील कर्करोग दुसऱ्या भागात पसरु शकतो. नव्या संशोधनातून शरीरातील या दुर्लक्षित अवयवाविषयी माहिती समोर आली आहे.
 6. गेल्या अनेक वर्षांपासून मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास सुरु आहे. शरीरात 79 अवयव असतात, ही ठाम समजूत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कित्येक वर्षापासून हा अवयव अज्ञात राहिला.


Top

Whoops, looks like something went wrong.