dr.bharat vatwani and sonam wangchuk awarded ramom magasase award

 1. आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार २०१८ या वर्षासाठी सहा जणांना जाहीर करण्यात आला. या सहा जणांमध्ये २ स्त्रियांचा तसेच २ भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.
 2. प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वाटवाणी या दोन भारतीयांना मानाचा मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला आहे.
 3. याशिवाय पुरस्कार विजेत्यांमध्ये फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी, व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम, कंबोडियाचे युक छांग आणि ईस्ट तिमोर या नवजात देशातील मारिया डी लार्देस मार्टिन्स क्रूझ या चौघांचाही समावेश आहे.
 4. कंबोडियाच्या युक छांग यांनी आपल्या देशातील वंशसंहाराची स्मृती जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या स्मृतींमधून विद्वेषाला कायमची मूठमाती मिळावी, ही त्यांची यामागची संकल्पना.
 5. ईस्ट तिमोरच्या मारिया यांनी सर्व वंश व वर्णाच्या नागरिकांना सामाजिक न्याय मिळावा, यासाठी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या लढ्यात गरिबी हटावला विशेष स्थान आहे.
 6. फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी यांनी गेले अर्धशतक सामाजिक न्यायाची लढाई चालवली आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांचा रोषही पत्करला.
 7. व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम यांनी अपंगत्वावर मात करून देशातील अपंगांसाठी सारे जीवन वाहिले आहे.
 •  डॉ. भरत वाटवाणी यांच्याबद्दल -
 1. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले डॉ. भरत वाटवाणी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे. या मुलांना त्यांनी नवे जीवदान दिल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 2. वाटवाणी यांच्या कार्यामुळे त्यांना मनोरुग्णांचा देवदूत मानले जाते. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ असलेल्या वाटवाणी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता यांनी रस्त्यावरील अनेक मनोरुग्ण मुलांना आधार देऊन त्यांचे पुनर्वसन केले.
 3. या मुलांवर उपचार करता यावेत आणि त्यांना निवारा मिळावा म्हणून त्यांनी १९८८ साली त्यांनी श्रद्धा पुनर्वसन केंद्राची स्थापना केली.
 4. या केंद्रात फुटपाथवर राहणाऱ्या मनोरुग्णांना आणले जाते. येथे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची व्यवस्था करतानाच त्यांच्यावर मोफत मानसिक उपचार केले जातात व त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली जाते.
 •  सोनम वांगचुक यांच्याबद्दल -
 1. सोनम वांगचुक यांनी निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 2. ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील आमिर खानने साकारलेले फुंगसुक वांगडु अथवा रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारीत आहे.
 3. वांगचुक यांनी १९८८साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला.
 4. शाळेची सोय नसल्याने लडाखमधील अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. वांगचुक यांनी लेहपासून १३ किलोमीटरवर फेय येथे मुलांसाठी शाळा सुरू केली.
 5. या शाळेत नापास झालेल्या मुलांना शिकवले जाते. ही शाळा सौर ऊर्जेवर चालते. येथे मुलांना अभ्यासात पशुपालन, शेती, अन्न पदार्थ बनवणे तसेच अती तीव्र वातावरणात राहण्याचे धडे दिले जातात.
 6. १९९४साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमातंर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे.
 7. परिणामी १९९६साली लडाखमध्ये दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण फक्त ५ टक्के होते, ते २०१५साली ७५ टक्के झाले.
 8. याशिवाय लडाखमधील लोकांची पाणी टंचाईतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी वितळणाऱ्या बर्फाचे पाणी साठवून ठेवता येणारा हिमस्तुप तयार केला.
 9. वांगचुक हे लडाखमध्ये विद्यार्थ्यांच्या एका समुहाने स्थापन केलेल्या स्टूडंट्स एजुकेशनल एंड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख (एसईसीओएमएल)चे ते संस्थापकआहेत.
 10. अशाप्रकारे लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात कल्पक बदल केले. त्यांनी लडाखमध्ये शैक्षणिक क्रांती घडवली.
 11. वांगचुक यांना जागतिक स्तरावर प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०१६चा रोलेक्स अॅवॉर्ड फॉर इंटरप्राइज लॉस एंजेलस येथे प्रदान करण्यात आला होता.
 12.  मॅगसेसे पुरस्काराबद्दल -
 13. आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे ॲवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 14. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
 15. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंधआदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 16. आतापर्यंत विनोबा भावे, प्रकाश व मंदाकिनी आमटे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, अरूणा रॉय यांसारख्या अनेक भारतीय दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.


karnatak has found new blood group

 1. कर्नाटकमधील कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका अतिशय दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावला आहे.
 2. या रक्तगटाचे नाव पीपी किंवा पी नल फोनोटाइप असे आहे.
 3. ज्या रुग्णाचा हा रक्तगट आहे, तो रुग्ण हा रक्तगट असणारी देशातील पहिली आणि एकमेव व्यक्ती ठरली आहे. 
 4. या रुग्णाच्या रक्ताचा नमूना आंतरराष्ट्रीय ब्लड ग्रूप रेफरन्स लॅबॉरेटरीमध्ये ब्रिस्टल येथे (यूके) तपासणीसाठी पाठवले असता या रुग्णाच्या रक्तात पीपी फेनोटाइप सेल्स असल्याचे आढळले.


pune police commissioner

 1. सरकारने पोलिस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केले आहे. पुण्याच्या आयुक्तपदी के. व्यंकटेशम यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. 
 2. त्या पदावरील रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे अतिरिक्त महासंचालक (महामार्ग) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 3. ठाण्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांच्या जागी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसळकर यांची नियुक्ती केली.
 4. नवी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्या जागी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार यांची नेमणूक केली.
 5. परमवीर सिंग यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) पदाची जबाबदारी दिली, अतिरिक्त महासंचालक (कारागृह) भूषणकुमार उपाध्याय हे नागपूरचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारतील.


international wrestling championship india has won gold medals

 1. बजरंग पुनियाने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली, तर संदीप तोमरनेही रौप्यपदकाची कमाई केली.
 2. इस्तानबुल येथे झालेल्या यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीयांनी एकूण 10 पदकांची कमाई केली आणि त्यात सात पदके महिलांनी जिंकली आहेत.
 3. पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. तिने 55 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर 6-3 असा विजय मिळवला.
 4. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला येथे अपयशाचा सामना करावा लागला. तिला 62 किलो वजनी गटाच्या पदक फेरीतही प्रवेश मिळवता आलेला नाही.
 5. राष्ट्रकुल विजेत्या बजरंगने महिन्याच्या सुरूवातीला जॉर्जियात झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने 29 जुलै रोजी 70 किलो गटाचे सुवर्ण नावावर केले.
 6. युक्रेनच्या अँड्रीय केव्हात्कोवस्कीने दुखापतीमुळे माघार घेतली. 61 किलो वजनी गटात संदीपला इराणच्या मोहम्मदबाघेर याखकेशीने 8-2 अश्या प्रकारे चित केले.


indian women hockey team has completed 50 year

 1. भारतीय महिला हॉकीच्या विश्‍वकरंडक सहभागास पाच दशके झाली. त्यानिमित्ताने लंडनमध्ये खास प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यात भारतीय महिला हॉकीची प्रगती दाखवणारी 50 छायाचित्रे आहेत.
 2. आता या प्रदर्शनातील छायाचित्रे लंडनमधील हॉकी म्युझियमला दान करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. यात 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण यशाचाही उल्लेख आहे.
 3. भारतीय महिला हॉकीपटूंचे आनंदाचे; तसेच दुःखाचे क्षण टिपले आहेत. याचबरोबर यासोबत असलेला दिग्गज हॉकीपटू ध्यानचंद यांची वंशावळही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
 4. सुनील यश कालरा यांनी हॉकी म्युझियमच्या सहकार्याने ‘पाच दशके 50छायाचित्रे’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
 5. भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा 1974 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी असलेल्या भारताच्या कर्णधार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.


Top

Whoops, looks like something went wrong.