Scientists have developed the theory of 'Big Bubble' about the construction of the solar system

 1. खगोलशास्त्रज्ञांनी सूर्यमालेच्या निर्माणासंबंधी एक सिद्धांत मांडला आहे, त्यानुसार, सूर्यमाला दीर्घकाळापासून मृत असलेल्या प्रचंड तार्‍यामधून निघणार्‍या बुडबुड्यांमध्ये तयार झालेली असू शकते.
 2. आतापर्यंत असे मानले जात होते की, तार्‍यांच्या विस्फोटात म्हणजेच सुपरनोव्हापासून सूर्यमालेची निर्मिती झाली आहे.
 3. मात्र नव्या अभ्यासानुसार, सूर्याहून 40-50 पटीने मोठ्या वुल्फ-रायेट तार्‍याच्या नष्ट होण्याच्या काळात निघणार्‍या बुडबुड्यांमध्ये ही सूर्यमाला निर्माण झालेली आहे.
‘बिग बबल’ सिद्धांत
 1. वुल्फ-रायेट तारा (Wolf-Rayet star) ने जेव्हा आपल्या काही तत्वांना बाहेर काढण्यास सुरुवात केली असताना तेथे निर्माण झालेल्या वार्‍याने ती तत्वे वाहवत गेली.
 2. या तत्वांमुळे बुडबुड्यांप्रमाणे एक संरचना तयार झाली, ज्यामध्ये वायु आणि धूळ भरलेली असावी. ज्यात सूर्याचा जन्म झालेला असावा.
 3. ‘अॅस्ट्रोफिजिकल’ या नियतकालिकेमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.
 4. जुन्या शोधानुसार, ज्या सुपरनोव्हाने सूर्यमालेचा विकास झाला, त्यामध्ये अॅल्युमिनियम-26 आणि आयर्न-60 चे आयसोटोप म्हणजेच उत्सर्जक कण (विविध न्यूट्रॉन संख्या असणारे समान तत्व) प्रामुख्याने उपलब्ध होते.
 5. त्यानंतर 2015 साली केल्या गेलेल्या अभ्यासात असे समोर आले की, सूर्यमालेत केवळ अॅल्युमिनियमचे आयसोटोप उपलब्ध आहेत.
 6. नवा अभ्यास अधिक प्रमाणशील असल्याचे यामुळे मानले जात आहे, कारण वुल्फ-रायेट तार्‍यामधून केवळ अॅल्युमिनियम-26 हेच निघाले होते.
 7. वुल्फ-रायेट तारा विस्फोटात किंवा कृष्णविवारात पडून नष्ट झाला असावा.
 8. बुडबुड्यासारख्या संरचनेचा काही अंश गुरुत्वाकर्षणामुळे नष्ट झाला असावा आणि उर्वरित भागामधून सूर्यमालेची निर्मिती झाली असावी.


You are the Chairman of the Maidan Commission (UGC). What is the appointment of Mr. Dhindrampal Singh?

 1. एप्रिल २०१७ पासून रिक्त असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी प्रा. धीरेन्द्रपाल सिंह नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. देशभरातील विद्यापीठांचे नियमन करणाऱ्या या संस्थेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्हीही पदे एप्रिल २०१७ पासून रिक्त आहेत.

 

तुम्हाला हे माहित आहे का?

 1. उत्तर प्रदेशातील शेतकरी कुटुंबात १९५६साली जन्मलेल्या धीरेन्द्रपाल यांनी गढवाल विद्यापीठातूनच पीएचडी मिळवली आहे.
 2. त्यानंतर देशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
 3. सध्या ते राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’च्या संचालक पदावर कार्यरत आहेत.
 4. जुलै २०१५मध्ये या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.
 5. त्यांचा अध्यापन क्षेत्रातील अनुभव साडेतीन दशकांहून अधिक असून २००४पासून त्यांनी विविध कुलगुरूपदे सांभाळली आहेत.
 6. व्यवसायशिक्षण, पर्यावरणशास्त्र यांसोबतच मूल्यशिक्षणाच्या क्षेत्रात प्रा. सिंह यांनी विविध प्रशासकीय पदे सांभाळताना काम केले आहे.
 7. देशातील अनेक संस्थांच्या विद्यापरिषदांवर किंवा कार्यकारी मंडळांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
 8. त्यात बनारस, सागर व इंदूरच्या विद्यापीठांखेरीज अलाहाबाद विद्यापीठ, मिझोरम विद्यापीठ, पंजाबातील केंद्रीय विद्यापीठ, यांचा समावेश आहे.
 9. बेंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेचे ते सन्माननीय सदस्य असून ‘सोसायटी ऑफ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च’ या कोलकाता आणि भोपाळ येथील संस्थांचेही सदस्य आहेत.


Environmental Ministry Regional Project for Agricultural Waste Management

 1. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने ‘राष्ट्रीय हवामान बदल अनुकूलन कोष (NAFCC) अंतर्गत ‘कृषी-कचरा (पीकांचे अवशेष) व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांदरम्यान हवामानासंबंधी स्थितीस्थापकत्व निर्माण' या विषयावरचा एक प्रादेशिक प्रकल्प मंजूर केला आहे. 
 2. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानसाठी अंदाजे 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?

पार्श्वभूमी:-

 1. प्रकल्पाच्या सुरुवातीला, शेतकर्‍यांना पर्यायी पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जागृती आणि क्षमता निर्माण करण्याचे कार्य केले जाईल, ज्यामुळे उपजीविकेसंबंधी पर्यायांमध्ये विविधता येईल आणि शेतकर्‍यांची मिळकत वाढविण्यास मदत होईल.
 2. पिकाच्या कापणी-मळणीनंतर उरलेले अवशेष म्हणजेच कृषी-कचरा जाळल्यामुळे पर्यावरणावर विपरीत होतो.
 3. अश्या पद्धतींना टाळण्यासाठी आणि हवामान बदलांवरील परिणामांचे उपशमन करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
 4. राष्ट्रीय हवामान बदल अनुकूलन कोष (National Adaptation Fund for Climate Change -NAFCC) :-
  1. योजना राज्य शासनांना हवामानातील बदलांच्या अनुकूलतेसंदर्भात असलेल्या प्रकल्पांना 100% अनुदान उपलब्ध करून देते.
  2. याची ऑगस्ट 2015 मध्ये स्थापना करण्यात आली.
  3. NAFCC अंतर्गत अनुकूलन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) ही राष्ट्रीय अंमलबजावणी एकक (NIE) म्हणून कार्यरत आहे.


The eligibility requirement of Credit Rating Agency has been increased from SEBI to Rs. 25 crores

भारताची बाजारपेठ नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)’ संचालक मंडळाच्या बैठकीत किमान निव्वळ लाभाच्या समावेशासह क्रेडिट रेटींग एजन्सीसाठी असलेली पात्र आवश्यकता वर्तमान 5 कोटी रुपयांवरून वाढवत 25 कोटी रुपये केला जाण्याचा निर्णय घेतला गेला.

‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)’
 1. बैठकीत घेतले गेलेले निर्णय -
 2. SEBI (सार्वजनिक प्रस्ताव आणि सिक्युरिटीज डेब्ट इन्स्ट्रूमेंट्स सूचीबद्ध करणे) विनियमन-2008 अन्वये मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांद्वारा (ARC) प्रदान केलेल्या सिक्युरिटीज रिसीप्टला समभाग बाजारपेठेत सूचीबद्ध करणे आणि त्यासाठीच्या कार्यचौकटीच्या योजनेला मंजूरी दिली गेली.
 3. क्रेडिट रेटींग एजन्सीसाठी एकमेकामध्ये समभाग धारणाची कमाल मर्यादा 10% ठेवण्याचा निर्णय घेतला. म्यूचुअल फंड कंपन्यासुद्धा एकमेकामध्ये 10% हून अधिक समभाग धारण करू शकणार नाही.
 4. सूचीबद्ध कंपन्यांना किमान सार्वजनिक समभागधारणाच्या (MPS) आवश्यकतेसह अनुपालन करण्याच्या विशिष्ट अटींसाठी खुल्या बाजारपेठेत ‘पात्र संस्था नियुक्ती (Qualified Institutions Placement)’ आणि ‘प्रवर्तकांच्या समुहाकडील 2% पर्यंत समभागांची विक्री’ या दोन अतिरिक्त पद्धती सादर करण्याचा निर्णय घेतला.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) 

 1. हे भारतामधील सिक्युरिटीज बाजारपेठेचे नियामक आहे.
 2. 1988 साली याची स्थापना केली गेली आणि SEBI अधिनियम 1992 अन्वये 30 जानेवारी 1992 रोजी आला वैधानिक दर्जा दिला गेला.


Mohammed Al Jandla International Child Chess Award

 1. सीरियाच्या १६ वर्षीय महंमद अल जाँद याला ‘किड्स राइट्स फाऊंडेशन’चा ‘आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार’ मिळाला आहे.
 2. सीरियन शरणार्थी मुलांच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्याला नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई हिच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 3. सिरियातील यादवी संघर्षामुळे निर्वासित झालेल्या महंमद अल जाँदने आपल्या कुटुंबासह लेबनॉनमधील शरणार्थी छावणीत २०१४मध्ये एक शाळा सुरु केली.
 4. शंभर विद्यार्थी व चार शिक्षकांसह सुरु झालेल्या या शाळेत आज २०० मुले शिक्षण घेत आहेत.
 5. जगात सध्या २.८ कोटी मुले विस्थापित आहेत.
 6. त्यातील २५ लाख सीरियातील आहेत, त्यांना शिक्षणाची कोणतीही संधी नाही.
 7. या अंधारातून चालताना त्यांना महंमदने हात दिला, त्यामुळे प्रकाशाचा कवडसा त्यांच्यावरही पडला व त्यांच्याही आयुष्यात आशेची नवी पालवी फुटते आहे.


Bhadravati Palika first in the dynamic ranking in the country

 

 1. स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवून प्रतिक्रिया देण्याबाबतच्या डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
 2. असा मान मिळविणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच शहर ठरले आहे.भद्रावती नगरपालिकेच्या या प्रक्रियेमध्ये साडेचार हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले.
 3. त्यातील पावणेचार हजार नागरिक दररोज तक्रारी अपलोड करीत असून स्वच्छता अभियानात आपला सहभाग दर्शवीत आहेत.
 4. भद्रावती शहराची स्पर्धा छत्तीसगढमधील सरायपल्ली या 20 हजार लोकसंख्येच्या शहरासोबत होती.
 5. 15 दिवसांपासून हे शहर प्रथम क्रमांक टिकवून होते. या काळात सरायपल्ली व भद्रावती शहरातील गुणांचा फरक हा पाच ते 10 हजारांच्या दरम्यान होता.
 6. तीन दिवसांच्या सलग सुट्यांमध्ये भद्रावतीकरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने 25 डिसेंबरला हा फरक केवळ 180 गुणांचा राहिला.
 7. अखेर त्यावर 27 डिसेंबरला भद्रावती शहराने सरायपल्ली शहरावर दोन हजार गुणांची आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकाविला.


Top

Whoops, looks like something went wrong.