30 ऑगस्ट : ‘अनैच्छिकपणे पळवलेल्या पीडितांचा आंतरराष्ट्रीय दिवस’

दरवर्षीप्रमाणे 30 ऑगस्टला ‘अनैच्छिकपणे पळवलेल्या पीडितांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ (International Day of the Victims of Enforced Disappearances) पाळण्यात आला आहे.

दिवसाची आवश्यकता :-

 1. समाजात भीती पसरवण्यासाठी एखाद्या व्यक्तिला त्याच्या इच्छेविरुद्ध पळवून गहाळ केल्या जात आहे. 
 2. यामुळे आज जवळचे नातेवाईक, समुदाय आणि समाज यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.
 3. ही एक जागतिक समस्या बनली आहे आणि जगातील एखाद्या विशिष्ट प्रांतापुरता मर्यादित नाही. 
 4. ही मुख्यत: मानवाधिकाराचे रक्षण करणारे, पीडितांचे नातेवाईक, साक्षीदार आणि प्रकरणाशी संबंधित कायदेशीर वकील यांच्यासाठी मोठी समस्या बनली आहे.

इतिहास :-

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या 18 डिसेंबर 1992 रोजी मंजूर केलेल्या ‘47/133 ठराव’ मधून जाहीर केलेल्या ‘डिक्लियरेशन ऑन द प्रोटेक्शन ऑफ ऑल पर्सन्स फ्रॉम एन्फोर्स्ड डिसअपियरन्स’ मध्ये पळवलेल्या व्यक्तीची परिभाषा स्पष्ट केली.
 2. 1 जुलै 2002 रोजी रोमकडून दर्जा प्राप्त केलेले आंतरराष्टीय गुन्हेगारी न्यायालय स्थापन करण्यात आले.
 3. त्यानंतर 20 डिसेंबर 2006 साली ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ऑल पर्सन्स फ्रॉम एन्फोर्स्ड डिसअपियरन्स’ हे दस्तऐवज अंगिकारले गेले आणि दरवर्षी 30 ऑगस्ट या तारखेला ‘अनैच्छिकपणे पळवलेल्या पीडितांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ पाळण्याचे ठरविण्यात आले.
 4. 21 डिसेंबर 2010 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ‘65/209 ठराव’ मधून अनैच्छिकपणे पळवणे या समस्येबाबत गंभीरता दर्शवली गेली. 2011 साली पहिल्यांदा हा दिवस पाळला गेला.


डॉकलाम विवाद संपुष्टात - भारत, चीन संबंधांना स्थैर्य 

भारत आणि चीन असे जाहीर केले आहे की, दोन्ही देशांनी चीन-भुटान सीमेवरील आपापले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. 

विवाद :-

 1. 2012 साली भारत, भुटान आणि चीन यांच्यात एक करार झाला.
 2. ज्यामध्ये डॉकलाम क्षेत्रामधील या दोन्ही देशांच्या क्षेत्राची स्थिती ही केवळ सर्व पक्षांच्या संयुक्त चर्चासत्रातूनच निश्चित केले जाईल असे निश्चित केले गेले.
 3. डॉकलाम पठारपर्यंत रस्ता बांधण्याच्या चीनच्या योजनेमुळे या त्रिपक्षीय कराराचे उल्लंघन होत होते.
 4. भारत-चीन सीमाक्षेत्रामधील दशकापासून विवादित या प्रदेशात चीनने उंच पर्वतीय रस्ता बांधण्यासाठी आपल्या सैन्यांसह बुलडोजर आणि उत्खनन करणारी उपकरणे पाठवली होती.
 5. या क्षेत्राच्या डोकोला शहरापासून ते झोम्पेलरी येथील भुटानी सैन्याच्या छावणीपर्यंत रस्ता बांधण्याचा चीनी सरकारचा मानस आहे.
 6. भुटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत असलेल्या डॉकलाम पठार क्षेत्रातून चीनी लष्करी बांधकाम चमूला परत पाठविण्याकरिता गेल्या महिन्यात भारताने आपली सैन्य तुकडी पाठवली होती.

डॉकलाम क्षेत्राचे महत्त्व :-

 1. भूटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत डॉकलाम पठार क्षेत्र आहे.
 2. हे क्षेत्र भूतपूर्व भूटानमध्ये 269 चौरस कि.मी. क्षेत्रफळात पसरलेले आहे.
 3. भारतासाठी हे डॉकलाम पठार हे दुर्गम पूर्वोत्तर राज्यांना जोडणारा जमिनी मार्ग असल्याने त्या क्षेत्रावर नियंत्रण राखणे भारताला आवश्यक आहे.


पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पटकावले

 1. ग्लासगो, स्कॉटलंड येथे खेळल्या गेलेल्या ‘जागतिक बॅडमिंटन विजेतेपद (BWC) 2017’ स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने रौप्यपदक पटकावले आहे.
 2. या विजयासोबतच, पी. व्ही. सिंधू ही जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी नेहवालनंतर दुसरी भारतीय ठरली आहे.
 3. जपानच्या नोझोमी ओकुहारा हिने अंतिम सामन्यात सिंधूचा पराभव केला.
 4. शिवाय, सायना नेहवालने स्पर्धेत महिला एकेरी गटात नोझोमी ओकुहारा हिच्याकडून पराभव पत्करून कांस्यपदक पटकावले आहे.

जागतिक बॅडमिंटन विजेतेपद (BWC) 2017 स्पर्धा:-

 1. जागतिक बॅडमिंटन महासंघातर्फे (BWF) जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले जाते.
 2. ही स्पर्धा उन्हाळी ऑलिंपिक खेळासह खेळाडूंची रँकिंग ठरविण्यासाठी सर्वाधिक गुण प्रदान करते.
 3. या स्पर्धेचे 1977 साली प्रथम आयोजन केले गेले.


मादागास्कर आणि मोझांबिक प्रदेशासाठी सागरी हवामान अंदाज यंत्रणेचे उद्घाटन

 1. भारताच्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेज (INCOIS) ने पापुआ न्यू गिनीच्या मोरेस्बी बंदरावर नव्या सागरी हवामान अंदाज यंत्रणेचे (Ocean Forecasting System) उद्घाटन केले आहे.
 2. ही यंत्रणा कोमोरोज, मादागास्कर आणि मोझांबिक प्रदेशाला हवामान अंदाज प्रदान करणार आहे.
 3. पापुआ न्यू गिनीमध्ये रिजनल इंटीग्रेटेड मल्टी-हजार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम फॉर एशिया अँड आफ्रिका (RIMES) च्या तिसऱ्या मंत्रिस्तरीय बैठकीत या यंत्रणेचे उद्घाटन केले गेले.
 4. ही यंत्रणा 
  देशांतील मच्छीमार
  किनार्‍यावरील लोकसंख्या
  पर्यटन क्षेत्र
  किनारपट्टीवरील संरक्षण अधिकारी
  समुद्री पोलिस
  बंदर प्राधिकरण
  संशोधन संस्था
  सागरी उद्योग
  अश्या विविध पातळीवर माहिती प्रदान करणार आहे.
 5. शिवाय यंत्रणा भारतीय क्षेत्रासाठीही पूर्व-चेतावणी प्रदान करणार आहे.

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेज (INCOIS) :-

 1. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेज (INCOIS) ही भारतीय भूविज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे.
 2. ESSO-INCOIS ची स्थापना 1999 साली हैदराबाद येथे झाली.
 3. ही संस्था सागरी हवामान संदर्भात माहिती प्रदान करते आणि सल्लागार संस्था म्हणून देखील कार्य करते.


Top

Whoops, looks like something went wrong.