MPSC chalu ghadamodi, current affairs

1. लष्कराने दीर्घ पल्ल्याच्या ‘स्पाइक’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची बुधवारी यशस्वीरीत्या चाचणी घेतली. महू येथे दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली.

2. लष्कर जवळपास तीन दशके दुसऱ्या पिढीची आणि आता कालबाह्य झालेली क्षेपणास्त्रे वापरत होते. ‘स्पाइक’मुळे आता आधुनिक क्षेपणास्त्राची उणीव भरून निघणार आहे. ‘स्पाइक’ हे चौथ्या पिढीतील क्षेपणास्त्र असून ते चार किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करते.

3. हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते मध्येच दुसऱ्या लक्ष्याला भेदण्यासाठी वळवता येते. या क्षेपणास्त्रांची निर्मिती इस्रायलच्या ‘राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम’ने केली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सन २०१३ ते २०१७ या कालावधीत देशभरात बालविवाहाची दीड हजारांहून अधिक प्रकरणे उघड झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

2. एका प्रश्नाच्या उत्तरात इराणी यांनी बालविवाहांबाबतची गेल्या पाच वर्षांतील माहिती सादर केली. बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणे सन २०१७मध्ये (३९५) उघड झाली.

3. सन २०१६मध्ये हे प्रमाण ३२६, सन २०१५मध्ये २९३, २०१४मध्ये २८० आणि २०१३मध्ये २२२ इतके होते, असे इराणी यांनी ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या माहितीच्या आधारे सांगितले.सन २०१७मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मालदीवचे माजी अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या (मनी लाँडरिंग) आरोपाखाली दोषी ठरवून देशातील एका न्यायालयाने त्यांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

2. गयूम यांनी ५० लाख डॉलरचा दंड भरावा, असाही आदेश पाच सदस्यांच्या एका फौजदारी न्यायालयाने दिला.

3. न्यायालयाने यामीन यांनी सरकारी खजिन्यातील १० लाख डॉलर रकमेचा वैयक्तिक कामासाठी गैरव्यवहार केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला.

4. यामीन यांनी २०१३ ते २०१८ या काळात मालेचे नेतृत्व केले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचार, माध्यमांची मुस्कटदाबी करणे, आणि राजकीय विरोधकांना हद्दपार करणे असे आरोप लावण्यात आले होते.

5. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोली यांनी त्यांचा पराभव केला होता.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.

2. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

3. शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.

4. आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आठवे नेते ठरले आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1869 मध्ये झाला होता.

2. प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.

3. 29 नोव्हेंबर 1993 हा दिवस जे.आर.डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा स्मृतीदिन आहे. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.

4. सन 1996 या वर्षी नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका ‘मदर तेरेसा‘ यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर झाला होता.


Top