16 percent reservation for Maratha community: Bill in Legislative Assembly unanimously approved

 1. मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर झालं आहे.
 2. मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत हे विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला आहे.
 3. आता हे विधेयक मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत मांडलं आहे.
 4. गुरुवारी सकाळपासूनच संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागून होते.
 5. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील निष्कर्षांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी बारा वाजता सभागृहात ठेवला.
 6. यावेळी काही सदस्यांनी 'मराठा समाजाचा विजय असो', अशा घोषणा देण्यात आल्या.


p-bhimsen-joshi-classical-music-lifetime-achievement-award-keshav-ginday-declared

 1. भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची निवड झाली आहे. 
 2. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
 3. दर वर्षी राज्य सरकारतर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रांत प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 
 4. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.
 5. सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची शिफारस केली होती.
 6. या समितीत उस्मान खान, सदानंद नायमपल्ली, शाम गुंडावार, भारती वैशंपायन, बाळ पुरोहित आणि शुभदा पराडकर या मान्यवरांचा समावेश आहे.


Done 'eternal sustain economy conference 2018' in Nairobi

 1. केनियाच्या नैरोबी शहरात ‘शाश्वत नील अर्थव्यवस्था परिषद 2018’ भरविण्यात आली आहे.
 2. कॅनडा आणि जपानच्या सहाय्याने केनियाकडून ही दि. 28 नोव्हेंबर 2018 रोजी सुरू झालेली दोन दिवसीय परिषद आयोजित केली गेली.
 3. परिषदेत भारत सरकारचे केंद्रीय जलवाहतूक, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
 4. त्यांच्या माहितीप्रमाणे –
  1. भारत शाश्वत, सर्वसमावेशी आणि लोककेंद्रीत पद्धतीने नील अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी ‘इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA)’च्या कार्यचौकटी अंतर्गत कार्य करीत आहे.
  2. नील अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी) हा भारताच्या आर्थिक विकासाचा धोरणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि देशाचा 95% हून अधिक व्यापार समुद्रामार्गे चालविला जात आहे.
  3. भारत सरकारचा ‘SAGAR (‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ / प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा व विकास)’ हा दृष्टीकोन भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाशी संबंधित आहे.
  4. देशाच्या राजनैतिक, आर्थिक आणि लष्करी आराखड्याशी संबंधित आहे.
  5. जलवाहतुक आणि बंदरांच्या विकासाला चालना देणार्‍या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी ‘सागरमाला’ कार्यक्रमाच्या अंतर्गत 600 हून जास्त प्रकल्पांची ओळख पटविण्यात आली आहे.
  6. त्यात 2020 सालापर्यंत $120 अब्ज (सुमारे 8 लक्ष कोटी रुपये) इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. ज्यामुळे मालवाहतूकीच्या खर्चात दरवर्षी $6 अब्जची बचत होईल.


Establishment of Home Ministry's Emergency Response Assistance Mechanism in the Mandi

 1. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंडी (हिमाचल प्रदेश) या शहरात हिमाचल प्रदेशासाठी ‘आणीबाणी प्रतिसाद सहाय्य यंत्रणा’ (Emergency Response Support System -ERSS) कार्यरत केली आहे.
 2. हिमाचल प्रदेश हे ERSS प्रकल्पाच्या अंतर्गत संपूर्ण-भारतभरासाठी तयार करण्यात आलेला '112' हा एकच आपत्कालीन क्रमांक कार्यरत करण्यात आलेले देशातले पहिले राज्य ठरले आहे.
 3. सेवेची वैशिष्ठ्ये -
  1. या क्रमांकाला राज्यामधील आपत्कालीन प्रतिसाद केंद्राद्वारे पोलीस (100), अग्निशमन (101), आरोग्य सेवा (108), महिला मदतक्रमांक (1090) आणि इतर मदतक्रमांकांशी जोडले जाणार आहे.
  2. या सेवा '112 इंडिया' नावाच्या मोबाईल अॅपमध्ये देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
  3. ‘आणीबाणी प्रतिसाद सहाय्य यंत्रणा (ERSS)’ प्रकल्पाच्या अंतर्गत, संपूर्ण राज्याला सेवा पुरविण्यासाठी 12 जिल्हा आदेश केंद्रांसह (DCCs) शिमला या शहरात एक आणीबाणी प्रतिसाद केंद्र (ERC) स्थापन करण्यात आले आहे.


Ukraine's 'Donbas' got the Golden Peacock Award: IFFI 2018

 1. “स्प्रेड द जॉय ऑफ सिनेमा (सिनेमाच्या आनंदाचा प्रसार करा)” या संकल्पनेखाली गोव्यात पार पडलेल्या 49व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (International Film Festival of India -IFFI) या कार्यक्रमाच्या शेवटी सुवर्णमयूर (Golden Peacock), रौप्यमयूर, जीवनगौरव पुरस्कार आणि ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्‍कार यांचे वाटप करण्यात आले.
 2. हे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे -
  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्ण मयूर, मानपत्र आणि 40 लक्ष रुपये) - ‘डॉनबास’ (सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित युक्रेनचा चित्रपट)
  2. ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्‍कार – अमिताभ बच्चन (अभिनेता)
  3. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (15 लक्ष रुपये आणि रौप्य मयूर) - लिजो जोस पेलिस्सरी (‘इ मा यौ’ या भारतीय चित्रपटासाठी)
  4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (10 लक्ष रुपये आणि रौप्य मयूर) - ॲनास्ताशिया पुश्‍तोवित (‘व्हेन द ट्रीज फॉल’ या युक्रेनच्या  चित्रपटासाठी)
  5. सर्वोत्कृष्ट अभिनेता (10 लक्ष रुपये आणि रौप्य मयूर) - चेंबन विनोद (‘इ मा यौ’ चित्रपटासाठी)
  6. IFFI विशेष पुरस्कार - सलीम खान (चित्रपटातल्या अमूल्य योगदानाबद्दल)
  7. विशेष ज्युरी पुरस्कार (15 लक्ष रुपये आणि रौप्य मयूर) - मिल्को लाझारोव्ह (‘अगा’ या बल्गेरियाच्या चित्रपटासाठी)
  8. उत्तम दिग्दर्शक (फिचर फिल्म) - अल्बेर्टो मॉन्टेरस द्वितीय (‘रेस्पेटो’ या फिलिपिन्सच्या चित्रपटासाठी)
  9. ICFT-UNESCO गांधी पदक - ‘वॉकिंग विथ द विंड’ (प्रवीण मोरछले दिग्दर्शित लद्दाखी चित्रपट)
 3. ICFT-UNESCO गांधी पदक हा पुरस्कार पॅरिसच्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अँड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि UNESCO यांच्यावतीने देण्यात येतो.
 4. शांतता आणि सलोखा ही गांधीवादी मूल्ये मांडणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान प्रदान करण्यात येतो.
 5. नऊ दिवसांच्या या कार्यक्रमात 67 देशांमधून आलेल्या 220 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले गेलेत. जर्मनीच्या ‘सील्ड लिप्स’ या चित्रपटाने या महोत्सवाची सांगता झाली.
 6. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) –
  1. IFFIची सन 1952 मध्ये स्थापना करण्यात आली आणि हा कार्यक्रम दरवर्षी गोव्यामध्ये आयोजित केला जातो.
  2. एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.


Top