1. ब्रिटीश सरकारने एक रूपयाची नोट चलनात आणून गुरूवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षांत एक रूपयाच्या नोटेने पाचव्या जॉर्जच्या छायाचित्रापासून महात्मा गांधी, अशोक स्तंभापर्यंतचा प्रवास केला आहे.
  2. ब्रिटीश सरकारने सर्वात प्रथम एक रूपयाची नोट ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये चलनात आणली. या नोटेवर पाचव्या जॉर्जचे छायाचित्र होते. या नोटेची पांढऱ्या हातकागदावर छपाई केली होती. एक रूपयाची नोट चेकबुकप्रमाणे पंचवीस नोटांच्या संख्येत मिळत होती.
  3. २३ वर्षांनी म्हणजे २४ जुलै १९४० मध्ये छापलेल्या एक रूपयाच्या नोटेवर पाचव्या जॉर्जचे तर २४ जुलै १९४४ मध्ये काढलेल्या नोटेवर सहाव्या जॉर्जचे छायाचित्र होते.
  4. स्वतंत्र भारतातील पहिली एक रूपयाची नोट १२ ऑगस्ट १९४९ मध्ये चलनात आली. यावर अर्थ सचिव के. आर. के. मेनन यांची सही होती. त्यानंतर १९५० व १९५३ मध्ये व्हॉयलेट रंगात छापलेल्या एक रुपयाच्या नोटेवर के. जी. आंबेगावकर यांची सही होती.
  5. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (२ ऑक्टोंबर १९६९) छापलेल्या एक रूपयाच्या नोटेवर महात्मा गांधीचे छायाचित्र होते तर अर्थसचिव डॉ.आय.जी. पटेल यांची सही होती.
  6. एक रूपयाच्या नोटांच्या छपाईसाठी खर्चामध्ये वाढ होत असल्याचे कारण देत १९९४ नंतर एक रूपया नोटेची छपाई बंद करण्यात आली. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये पुन्हा एक रूपया नोटेची छपाई सुरू करण्यात आली.


Top