India-Bangladesh relations

 1. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारत भेटीवर आल्या आहेत. चर्चेसाठी बांग्लादेशाचे 153 प्रतिनिधी भारतात आले आहेत.
 2. या दरम्यान दोन्ही देशांच्या संबंधांचे प्रतीक म्हणून 25 मे 2018 रोजी पंतप्रधानांनी कोलकातापासून 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या शांतिनिकेतन येथे विश्व भारती विद्यापीठाच्या परिसरात बांग्लादेश भवनाचे उद्घाटन करण्यात आले.
 3. ‘बांग्लादेश भवन’ हे भारत आणि बांग्लादेशामधील सांस्कृतिक भावबंधाचे प्रतीक आहे.
 4. संबंध:-
  1. शेजारी देश आणि प्राचीन इतिहास अश्या दोन्ही बाबतीत भारत आणि बांग्लादेश मित्र राष्ट्र असल्याने दिवसेंदिवस मैत्रीसंबंध वाढत आहेत.
  2. भारत आणि बांग्लादेश हे दोन देश स्वतंत्र असले तरीही परस्पर सहकार्य आणि समन्वयाच्या माध्यमातून ते परस्परांशी जोडलेले आहेत.
 5. अलीकडेच घडलेल्या घडामोडींबाबत या भेटीदरम्यान काही चर्चित मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत -
  1. दोन्ही देश क्रौर्य आणि दहशतवादाविरोधात लढा यापुढेही कायम चालू ठेवण्यास मान्य केले आहे.
  2. दोन्ही देशांमधील संबंधांच्या दृष्टीने गेल्या 4 वर्षांमध्ये भू-सीमा मुद्दा तसेच विविध जोडणी प्रकल्पांना राबवले जात आहे.
  3. भारत-बांगलादेश संबंधांमधून 2015 सालच्या भू-सीमा कराराची यशस्वीरीत्या अंमलबजावणी झाल्याचे मान्य केले गेले.
  4. दोन्ही देशांनी 1974 साली या संदर्भात एक करार केला होता.
  5. मात्र त्यानंतरच्या राजकीय वादामुळे त्याच्या अंमलबजावणीला विलंब झाला. 
  6. बांग्लादेशात जवळजवळ 11 लाख रोहिंग्या लोकांना आश्रय देण्यात आला आहे, परंतु त्यामुळे देशातील गरजा भागविण्यामध्ये अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांनी भारताकडे मदत करण्यास विनंती केली.


 Political parties will not come under the Right to Information: Election Commission of India

 1. भारतीय निवडणूक आयोगाने नुकतीच घोषणा केली आहे की, राजकीय पक्ष माहितीचा अधिकार या कायद्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाहीत.
 2. मात्र, आयोग निवडणूक बंधच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीची माहिती दिली जाऊ शकते.
 3. आयोगाचा हा आदेश केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्देशाच्या एकदम उलट आहे, ज्यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप), कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि समाजवादी पक्ष (सपा) या सहा राष्ट्रीय पक्षांना या कायद्याच्या अंतर्गत आणण्याचे निर्देश दिलेले आहेत.
 4. यापूर्वी आयोगाने 3 जून 2013 रोजी या पक्षांना RTI कायद्याच्या कार्यक्षेत्रात आणले होते.
 5. प्रमुख मुद्दा:-
  1. एका याचिकेमधून सहाही पक्षांच्या खर्चाचा अहवाल मागविण्यात आला होता.
  2. आयोगाकडे केवळ बंधची अधिकृत माहिती असल्याने आयोगाने ही घोषणा केली.
  3. वर्तमान परिस्थितीत नव्या नियमांनुसार राजकीय पक्षाला दात्याकडून प्राप्त होणार्‍या रोख निधीची मर्यादा 20000 रुपयांवरून कमी करत 2000 रुपये केलेली आहे.
  4. तरी निवडणुकीसाठी लागणारा पैसा हा रोकड आणि गुप्तदानामार्फत देखील प्राप्त होतो. आणि अश्या निधीसंबंधी संपूर्ण माहिती उघड केली जाऊ शकत नाही.
 6. निवडणूक बंध योजना:-
  1. निवडणूक निधीच्या व्यवस्थेला पारदर्शी बनविण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेल्या निवडणूक बंध (Electoral Bonds) योजनेंतर्गत बंधच्या पहिल्या श्रृंखलेची विक्री 1 मार्च 2018 पासून सुरू करण्यात आली.
  2. सन 2018 च्या पहिल्या तिमाहीसाठी, निवडणूक बंधांची पहिली विक्री 1 मार्चपासून 10 मार्च 2018 पर्यंत झाली.
  3. निवडणुकीसाठी जमा केल्या जाणार्‍या निधीत स्वच्छता आणि पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारने एक पुढाकार घेतला आहे.
  4. निधीदात्याला हे बंध भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) शाखांमार्फत खरेदी करता येतात.
  5. यामार्फत प्राप्त होणारी रक्कम संबंधित पक्षाच्या अधिकृत बँक खात्यात जमा होते.
RTI कायद्याबाबत
 1. माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला. (१५ जुन, २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी).
 2. मात्र या कायद्यातील काही तरतूदी ताबडतोब अंमलात आणण्यात आल्या उदा. सार्वजनिक प्राधिकरणांच्या (सरकारी कार्यालये) जबाबदार्या [से. ४(१)], जनमाहिती अधिकारी व सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांची पदे [से. ५(१) व से. ५(२)], केंद्रिय माहिती आयोगाची स्थापना (से. १२ व १३), राज्य माहिती आयोगाची स्थापना (से. १५ व १६), कायद्यातून गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळणे (से. २४) आणि कायद्यातील तरतूदी अंमलात आणण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार (से. २७ व २८).
 3. माहितीचा अर्थ:-

  माहितीचा अर्थ हा कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री, फायलींवरचे अधिकाऱ्यांचे अथवा मंत्र्यांचे अभिप्राय होय.

 4. त्याकाळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून मिळविता येईल.

 5. कायद्याचा तिहास

  हा कायदा सर्वप्रथम स्वीडन मधे 1766 ला लागु झाला त्यानंतर भारत हा 12 ऑक्टोबर 2005 ला आशा प्रकारचा कायदा करणारा 54 वा देश ठरला


 Akshay Kumar launches campaign for double tuition toilet technology

 1. अभिनेता अक्षय कुमार यांनी दिल्लीत सन 2014 मध्ये सुरुवात करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) यासाठी एक प्रचार मोहिम सुरू केली आहे.
 2. ही मोहीम पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून चालवल्या जात आहे.
 3. या मोहिमेंतर्गत ग्रामीण भारतात दुहेरी टाक्यांचे शौचालय या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
 4. अक्षय कुमार यांच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर याही साथ देणार आहेत.
 5. दुहेरी टाक्यांचे शौचालय तंत्रज्ञान विशेषत: ग्रामीण भागासाठी म्हणून भारतामध्ये विकसित करण्यात आले आहे आणि याची भारत सरकार तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून शिफारस केली जात आहे.
 6. यापासून ग्रामीण कुटुंबाला 1 वर्षात विघटित कचर्‍यापासून NPK (नायट्रोजन, फॉ स्फरस, पोटॅशियम) पोषक घटकांनी भरपूर असे खत मिळू शकते.


The air of Delhi 7.7 Cigarette is blamed on the air: 'Sh ** t! I smoke 'app

 1. दिल्लीच्या हवा इतकी प्रदूषित आहे की, दिवसाला 7.7 सिगारेटाचे धूम्रपान करण्याप्रमाणाइतकेच प्रदूषित आहे.
 2. असा ‘Sh**t! आय स्मोक’ या मोबाइल अॅपने अंदाज लावला आहे.
 3. दिल्लीच्या हवेतले PM2.5 पातळीवरचे प्रदूषण अत्यंत वाईट पातळीवर पोहचलेले आहे.
 4. पॅरिसमध्ये सुरू केले गेलेले नवीन स्मार्टफोन अॅप वायू प्रदूषण आणि सिगारेट धूम्रपानातून होणार्‍या कार्बन आणि अजैविक प्रदूषणासहित PM2.5 कणांसंबंधी पातळीचे वास्तविक वेळेत मोजमाप केलेली माहिती गोळा करते.
 5. धूम्रपानाच्या समरूप प्रमाणाबाबत, लखनऊ 8 सिगारेटसह अत्यंत प्रदूषित तर जयपूर 7.3, बंगळुरू 0.7, चंडीगड 6.1, रांची 3.3, इंदोर 3.9 आणि कोलकाता 3.5 सिगारेट फुंकण्याप्रमाणे प्रदूषित आहेत.
 6. अन्य प्रमुख भारतीय शहरांकरिताचे आकडे दररोज 2 ते 7 सिगारेट या दरम्यान असल्याचे दिसून आले आहे.


 Agreement in BCCI and UNEP to promote 'green' cricket in India

 1. भारतात ‘ग्रीन’ क्रिकेट संकल्पनेखाली खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) आणि संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्यात एक करार झाला आहे.
 2. देशासमोर असलेल्या प्रमुख पर्यावरणीय आव्हानांबद्दल जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने हरित उपक्रमांमध्ये क्रिकेटपटू व चाहत्यांना पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
 3. ज्यामधून खेळादरम्यान मैदानावर दर्शकांकडून होणार्‍या प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्याच्या पुनर्वापरावर जोर दिला जाईल.
 4. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI):-
  1. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली.
  2. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.
 5. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP):-
  1. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा 5 जून 1972 रोजी स्थापन करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे.
  2. जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते.
  3. याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.