MPSC chalu ghadamodi, current affairs

1. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येत्या 8 ऑगस्ट रोजी देशाचा सर्वोच्च नागरी किताब भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे.

2. त्याचबरोबर आसामचे दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात येणार आहे.

3. तसेच या किताबासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. तसेच भारतरत्नने आजवर 45 जणांना सन्मानित करण्यात आले आहे.

4. तर यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

5. सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर 1955 पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 29 जुलै, 2019 रोजी त्रिपुरा येथून सातव्या आर्थिक जनगणनास प्रारंभ करण्यात आला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एमओएसपीआय) या सर्वेक्षणांना मान्यता देते. अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जनगणनाही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुरू होईल.

2. सांख्यिकी संग्रह अधिनियम, 2008 च्या तरतुदींनुसार प्रत्येक घरगुती व व्यावसायिक आस्थापनांच्या डोअर टू डोअर सर्व्हेद्वारे माहिती गोळा केली जाईल. 


3. या सर्वेक्षणातील निष्कर्ष मार्च 2020 पर्यंत उपलब्ध होतील, तर फील्डवर्क डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


4.  2013 मध्ये झालेल्या आर्थिक जनगणनेनुसार, भारतातील 58.5 दशलक्ष आस्थापनांमध्ये सुमारे 131 दशलक्ष कामगार कार्यरत होते.

5. आर्थिक जनगणनेत भारतातील सर्व उद्योजक आणि व्यावसायिक घटकांची गणना केली जाते ज्यांचा कोणत्याही आर्थिक कार्यात सहभाग असतो. हे कृषी किंवा बिगर-शेती क्षेत्र असू शकते जे वस्तूंच्या उत्पादन किंवा वितरणामध्ये किंवा स्वतःच्या वापराच्या एकमात्र हेतूसाठी नसलेल्या सेवा प्रदान करण्यात गुंतलेले आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. वाघांच्या नैसर्गिक वसाहतीत संरक्षणासाठी आणि वाघाच्या संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणूनही ओळखला जातो.

2. पृथ्वीवरील वाघांना वाचविण्याची 1973 मध्ये भारतात प्रोजेक्ट टायगर या एक अनोखी योजनाची सुरुवात करण्यात आली होती. इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी 1990 या प्रकल्पाची जाहिरात केली. पुढे, प्रकल्पात अनेक बदल झाले.

3. परंतु WWFच्या मते जगात सुमारे 3,900 वन्य वाघ बाकी आहेत. 20 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच जगाच्या वाघाच्या लोकसंख्येपैकी 95% लोक गमावले आहेत. असे म्हटले जाते की संपूर्ण आशियामध्ये, सापळ्यांच्या संकटामुळे वन्य वाघांना खूप मोठा धोका आहे.

4. वाघ मांजरी कुटूंबाची सर्वात मोठी प्रजाती आणि या ग्रहावरील सर्वात प्रतिष्ठित प्राणींपैकी एक प्राणी आहे हे आपण नाकारू शकत नाही. सुमारे एक शतकापूर्वी, पृथ्वी ग्रहावर मुक्तपणे फिरणार्‍या वाघांची संख्या 1,00,000 हून अधिक असावी.

5. 2022 पर्यंत वन्य वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी 13 श्रेणी देशांच्या सरकारने एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. हे TX2 लक्ष्य आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सहा विश्वचषकांची मानकरी असलेली भारताची चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरी कोमसिमरनजित कौर यांनी इंडोनेशियातील लाबुऑन बाजो येथे सुरू असलेल्या प्रेसिडेंट कप मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.

2. तर भारतीय मुष्टीयोद्धयांनी या स्पर्धेत सात सुवर्ण व दोन रौप्यपदक पटकावली.

3. या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेल्या चारीही भारतीय महिला स्पर्धकांनी सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या गटांत तीन सुवर्ण मिळाली. दोघांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच ऑलिम्पिकची कांस्यविजेती असलेल्या मेरी कोमने अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाची एप्रिल फ्रँक्स हिच्यावर 5-0 ने सहज विजय साजरा केला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दुसऱ्या पायाभरणी समारंभात समाविष्ट असलेल्या औद्योगिक प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेश हे एक लाख कोटी डॉलरचीअर्थव्यवस्था असलेले देशातील पहिले राज्य बनेल, असे प्रतिपादन फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कल्याण कृष्णमूर्ती यांनी केले.

2. तर गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करारांवर स्वाक्षया करण्यात आल्या होत्या. त्यातील 65 हजार कोटी रुपयांच्या औद्योगिक प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ येथे पार पडला.

3. हा राज्यातील अशा प्रकारचा दुसरा पायाभरणी समारंभ होता. पहिला पायाभरणी समारंभ गेल्या वर्षी जुलैमध्ये झाला होता. पहिल्या टप्प्यात 60 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प समाविष्ट होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 29 जुलै 1852 मध्ये पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.

2. जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान 29 जुलै 1920 मध्ये सुरू झाली.

3. टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया 29 जुलै 1946 मध्ये असे नामकरण झाले.

4. 29 जुलै 1957 मध्ये इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.

5. भारत-श्रीलंका शांतता करारावर 29 जुलै 1987 मध्ये सह्या करण्यात आल्या.


Top