national sports day major dhyanchand 113 th birth anniversary

 1. हॉकीमधील सवर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज ११३ जयंती आहे.
 2. मेजर ध्यानचंद यांनी भारताला हॉकी खेळात ऑलंपिकमध्ये ३ सुवर्ण पदके जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता.
 3. त्यांच्या स्मरणात २९ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो.
 4. मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला.
 5. विशेषत: बर्लिन ऑलंपिक १९३६ मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाला अंतिमफेरीत ८-१ अशी धूळ चार्ली होती.
 6. या विजयासह सलग तीन ऑलंपिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकून अनोखी किमया साधली होती.
 7. मेजर ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये ४०० पेक्षा जास्त गोल करत आपण 'गोल मशीन' मशीन असल्याचे सिद्ध केले होते.


Emmerson manangwa Elected as zimbabwe president

 1. 26 ऑगस्ट 2018 रोजी एमर्सन मनांगग्वा यांनी झिम्बाब्वेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
 2. देशात प्रथमच राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवणार्‍या एमर्सन मनांगग्वाने सेनाद्वारा झिम्बाब्वेची सत्ता आपल्या हातात घेऊन रॉबर्ट मुगाबे यांची 37 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली.
 3. झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेमधील सर्व बाजूने भूमीने वेढलेला देश आहे.
 4. हरारे शहर ही देशाची राजधानी आणि झिम्बाब्वे डॉलर हे चलन आहे


india keniya joint buisness summit completed in Nairobi

 1. 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2018 या काळात केनियाच्या नैरोबी शहरात ‘भारत-केनिया संयुक्त व्यापार’ समितीची 8वी बैठक संपन्न झाली.
 2. बैठकीमध्ये भारतीय केंद्रीय वाणिज्य व उद्योग तसेच नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते.
 3. यावेळी झालेल्या एका व्यापार परिषदेत केनियाच्या विकासासाठी बाजारपेठेचा अभ्यास करण्यासाठी भारतीय उद्योजकांना आवाहन केले गेले.
 4. केनिया प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेमधील एक देश आहे, ज्याला हिंद महासागराचा किनारा लाभलेला आहे.
 5. या देशाची राजधानी नैरोबी शहर असून देशाचे चलन केनियन शिलिंग हे आहे. 
 6. केनियाचे वर्तमान राष्ट्रपती उहरु केन्याता हे आहेत. 
 7. भारत सध्या केनियाच्या सर्वात मोठ्या व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि केनियात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे.


PUNJAB TRIPURA VARASA PARIKRAMA DEVELOPMENT

 1. पर्यटन मंत्रालयाकडून स्वदेश दर्शन योजनेच्या वारसा आणि ईशान्य परिक्रमा (Heritage and North East Circuits) अंतर्गत पंजाब आणि त्रिपुरा राज्यांमधील 164.95 कोटी रुपयांचे दोन नवीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
 2. वारसा परिक्रमा :– (पंजाबची ठिकाणे) आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, चमकौर साहिब, फिरोजपूर, अमृतसर, खटकर कलान, कालानौर, पटियाला
 3. ईशान्य परिक्रमा :– (त्रिपुराची ठिकाणे) सुरमा चेरा, उनाकोटी, जामपुई हिल्स, गुणाबाटी, भुनानेश्वरी, माताबरी, निरमहल, बोक्सानगर, छोटा खोला, पिलाक, अवांगचारा
 4. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसाद (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि स्वदेश दर्शन योजना सन 2014-15 मध्ये सुरू करण्यात आली.
 5. देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.
 6. या योजनेंतर्गत विकासासाठी 13 पर्यटन परिक्रमांची ओळख करण्यात आलेली आहे.


ते आहेत -

 • बुद्धीष्ट परिक्रमा
 • ईशान्य भारत परिक्रमा,
 • सागरकिनारा परिक्रमा,
 • हिमालय परिक्रमा,
 • कृष्ण परिक्रमा,
 • वाळवंट परिक्रमा,
 • पर्यावरणीय परिक्रमा,
 • वन्यजीव परिक्रमा,
 • आदिवासी परिक्रमा,
 • ग्रामीण परिक्रमा,
 • धार्मिक परिक्रमा,
 • रामायण परिक्रमा
 • वारसा परिक्रमा.


Center gov has declared new rules for drone use

 1. देशात ‘ड्रोन’चा वापर करण्याकरिता आणि त्याचे नियमन करण्याकरिता केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाने ‘ड्रोन विनियम 1.0’  नावाने नियमावली प्रसिद्ध केली आहे.
 2.  हे नियम 1 डिसेंबर 2018 पासून लागू केले जाणार आहेत.
 3. शिवाय, राज्य मंत्री जयंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ड्रोन कृती दल ‘ड्रोन नियम 2.0’साठी शिफारसी प्रदान करणार.
 4. डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म हे एकमेव असे राष्ट्रीय मानवरहित रहदारी व्यवस्थापन (UTM) व्यासपीठ आहे, ज्यात परवानगीविना उड्डाण आयोजित केले जाऊ शकत नाही. 


नियम: -

 1. वापरकर्त्याला त्याच्या ड्रोन, वैमानिक आणि मालकाची एकदाच नोंदणी करावी लागणार.
 2. प्रत्येक उड्डाणासाठी वापरकर्त्याला मोबाईल अॅपच्या माध्यमातून परवानगी घ्यावी लागणार आणि स्वयंचलित प्रक्रिया त्याची विनंती लगेच स्वीकारणार किंवा नाकारणार.
 3. राष्ट्रीय मानवरहित रहदारी व्यवस्थापन (UTM) ड्रोनच्या हवाई क्षेत्रात एक रहदारी नियंत्रक म्हणून कार्य करणार आणि संरक्षण व नागरी हवाई रहदारी नियंत्रक (ATC) यांच्यासोबत समन्वय साधणार, जेणेकरून ड्रोन मान्यताप्राप्त उड्डाण मार्गांवरच राहतील.
 4. ड्रोन दृष्टीपथातच दिवसा उपयोगात आणले जाणार आणि जास्तीत-जास्त 400 फूटपर्यंत ड्रोन उडवले जातील. हवाई क्षेत्राचे 3 गट पडण्यात आल्या आहेत, ते म्हणजे - 1) रेड झोन (परवानगी नसलेले), यलो झोन (नियंत्रित हवाई क्षेत्र), आणि ग्रीन झोन (स्वयंचलित परवानगी).
 5. :"नो ड्रोन झोन" ::- विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ, दिल्लीतले विजय चौक; राज्यांच्या राजधान्यांमधले राज्य सचिवालय संकुल, मोक्याचे ठिकाण / महत्त्वपूर्ण आणि लष्करी प्रतिष्ठापने, इत्यादी.
 6. नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षा ::– परवाना निलंबीत करणे; ‘विमान अधिनियम-1934’ किंवा विमान नियम किंवा कोणत्याही कायदेशीर तरतुदींनुसार निर्बंध आणणे आणि संबंधित भारतीय दंड संहितेनुसार (जसे 287, 336, 337, 338, किंवा संबंधित कलमे) दंड.
 7. ड्रोन या आधुनिक तंत्रज्ञान आधारित यंत्राचा उपयोग छायाचित्रीकरणापासून ते कृषी-क्षेत्रापर्यंत, पायाभूत संपदेच्या देखरेखीपासून ते विमा क्षेत्रापर्यंत केला जाऊ शकतो. हे लहान-मोठ्या आकारात असतात आणि मर्यादित किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतात.


nashik police commissioner got ironman title at france

 1. नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी फ्रान्समधील मानाची आणि अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन 2018 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
 2. फ्रान्सच्या विची शहरात ही स्पर्धा पार पडली. अंदाजे 1 हजार 300 स्पर्धकांनी या मानाच्या स्पर्धेत भाग घेतला होता, यामध्ये सर्वांना मागे टाकत सिंगल यांनी अव्वल स्थान मिळवले आहे.
 3. विशेष म्हणजे डॉ़ सिंगल यांनी स्पर्धेचा निर्धारीत वेळ 16 तासांऐवजी 15 तास 13 मिनिटांमध्येच ही स्पर्धा पुर्ण करून देशाची मान उंचावली़ आहे.
 4. फ्रान्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
 5. प्रत्येक स्पर्धकाला 16 तासांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यामध्ये सर्वप्रथम 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे असे खडतर टप्पे असतात.
 6. डॉ. सिंगल यांनी 15 तास 13 मिनीटांमध्येच ही स्पर्धा जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.


Top