NSE has started the Nifty Equity Savings Index

 1. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) समूहाच्या इंडिया इंडेक्स सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट्स लिमिटेड (IISL) या कंपनीकडून नवे ‘निफ्टी इक्विटी सेव्हींग्स इंडेक्स’ सुरू करण्यात आले आहे.
 2. हे इंडेक्स इक्विटी सेव्हींग्स फंड बाबत असलेल्या गुंतवणूकीसंबंधी मानस तत्त्वांप्रमाणेच आहे.
 3. वैशिष्ट्ये:-
  1. हे एक टोटल रिटर्न इंडेक्स आहे, जे प्राइस रिटर्न आणि डिव्हिडंड अश्या कूपन उत्पन्नाचेही आकलन करते.
  2. या इंडेक्समध्ये 30% भागीदारी निफ्टी 50 टोटल रिटर्न इंडेक्सची आहे आणि 30% भागीदारी निफ्टी शॉर्ट ड्यूरेशन डेट इंडेक्सची आहे. 
  3. उर्वरित भागीदारीपैकी 30% भागीदारी इक्विटी आर्बिट्राज (निफ्टी 50 टोटल रिटर्न इंडेक्सवर लॉन्ज पोजिशन आणि निफ्टी 50 फ्यूचर्र इंडेक्समध्ये समतुल्य शॉर्ट पोजिशन) याची देखील आहे.
  4. निफ्टी 1D रेट इंडेक्सला देखील 5% भागीदारी दिली गेली आहे.
  5. इंडेक्ससाठी आधारभूत तारीख 1 एप्रिल 2005 आणि आधारभूत मूल्य 1,000 मानले जाणार आहे.
  6. इक्विटी सेव्हींग्स फंडच्या गुंतवणूक मूल्याच्या समतुल्य हे इंडेक्स अश्या पोर्टफोलियोच्या कामगिरीचे आकलन करणार, ज्यांचा इक्विटी, इक्विटी आर्बिट्रेज आणि डेब्ट इंस्ट्रुमेंट्स यासोबत संबंध आहे.
 4. महत्त्व:-
  1. भारतात अनेक म्युचूअल फंड इक्विटी सेव्हींग्स योजना सुरू आहेत.
  2. त्यासाठी उपयुक्त इंडेक्स नसल्यामुळे त्याच्या कामगिरीचे आकलन करणे कठीण होऊन बसले आहे.
  3. नव्या इक्विटी सेविंग्स इंडेक्समुळे आता योग्यरीत्या आकलन केले जाऊ शकणार आहे.
  4. नवी सुविधा म्युचूअल फंड हाताळणार्‍या विविध कंपन्यांकडून इक्विटी सेव्हींग्स फंड (भांडवलासंबंधी बचत निधी) यासाठी एक आदर्श व्यासपीठ म्हणून काम करणार आहे. 

IISL आणि NSE

 1. इंडिया इंडेक्स सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट्स लिमिटेड (IISL) ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) समूहाची एक उपकंपनी आहे.
 2. याची स्थापना सन 1998 मध्ये केली गेली.
 3. IISL चे मुख्यालय मुंबईमध्ये आहे.
 4. मुंबई स्थित नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) भारतामधील आघाडीची स्टॉक एक्सचेंज आहे.
 5. NSEची स्थापना सन 1992 मध्ये देशातले पहिले डिमॅट्युअलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून झाली.


India-China relations: The situation of post-war history of doklam

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत.
 2. या दरम्यान त्यांच्या आणि चीनी राष्ट्रपती शी चिनपींग यांच्यामध्ये एक अनौपचारिक शिखर बैठक पार पडली.
 3. ज्यात दोन्ही देशांच्या संबंधांना चालना देण्याकरिता विविध विषयांवर चर्चा झाली.
 4. तसेच दोन्ही देशांनी हळू-हळू सीमावाद सोडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी केले गेले.
 5. भुटान आणि सिक्किम यांच्यामध्ये असलेल्या डोकलाममध्ये चीनी आणि भारतीय सैन्यांमध्ये जवळजवळ 70 दिवस चाललेल्या तनावानंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा दोन्ही देशांचे नेत्यांची भेट घडून आली.
 6. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधामध्ये स्थिरता आणि शांतता प्रस्थापित होण्याचे संकेत आहेत.

डोकलाम वाद:-

 1. 2012 साली भारत, भुटान आणि चीन यांच्यात एक करार झाला.
 2. ज्यामध्ये डोकलाम क्षेत्रामधील या दोन्ही देशांच्या क्षेत्राची स्थिती ही केवळ सर्व पक्षांच्या संयुक्त चर्चासत्रातूनच निश्चित केले जाईल असे निश्चित केले गेले.
 3. डोकलाम पठारपर्यंत रस्ता बांधण्याच्या चीनच्या योजनेमुळे या त्रिपक्षीय कराराचे उल्लंघन होत होते.
 4. भारत-चीन सीमाक्षेत्रामधील दशकापासून विवादित या प्रदेशात चीनने उंच पर्वतीय रस्ता बांधण्यासाठी आपल्या सैन्यांसह बुलडोजर आणि उत्खनन करणारी उपकरणे पाठवली होती.
 5. या क्षेत्राच्या डोकोला शहरापासून ते झोम्पेलरी येथील भुटानी सैन्याच्या छावणीपर्यंत रस्ता बांधण्याचा चीनी सरकारचा मानस आहे.
 6. भुटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत असलेल्या डोकलाम पठार क्षेत्रातून चीनी लष्करी बांधकाम चमूला परत पाठविण्याकरिता गेल्या महिन्यात भारताने आपली सैन्य तुकडी पाठवली होती.
 7. भूटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत डोकलाम पठार क्षेत्र आहे.
 8. हे क्षेत्र भूतपूर्व भूटानमध्ये 269 चौरस कि.मी. क्षेत्रफळात पसरलेले आहे.
 9. भारतासाठी हे डोकलाम पठार हे दुर्गम पूर्वोत्तर राज्यांना जोडणारा जमिनी मार्ग असल्याने त्या क्षेत्रावर नियंत्रण राखणे भारताला आवश्यक आहे.

डोकलाम वादानंतरची स्थिती

 1. चीनने राजकारणामधील परस्पर विश्वास सुधारण्यासाठी शांतीपूर्ण सहकार्य देणारे तत्त्वांचा स्वीकार करत परस्पर लाभकारी सहकार्याच्या आधारावर भारताबरोबर काम करण्याचे वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
 2. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या अनौपचारिक शिखर बैठकीत दोन्ही देशांनी हळू-हळू सीमावाद सोडविण्यासाठी एकत्र येण्याचे मान्य केले आणि दोन्ही देशांमधील संबंधामध्ये स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्यास वचनबद्धता प्रदर्शित केली.
 3. भारत आणि चीन व्यापार संबंध:-
  1. भारत आणि चीन जवळजवळ 3,488 किलोमीटरची सीमा सामायिक करतात, ज्याबाबत वाद सुरू आहे. आतापर्यंत 20 टप्प्यांमध्ये याबाबत वार्ता झाल्या.
  2. आज चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे.
  3. भारत-चीन द्वैपक्षीय व्यापार मागील वर्षात $84.44 अब्जपर्यंत पोहचलेला आहे.
  4. या संबंधांना अधिक वाढविण्यासाठी सीमेवरील तीन व्यापारी केंद्र महत्त्वाची भूमिका बजावतात.
  5. यामध्ये नाथू ला पास (सिक्किम), शिप्की ला पास (हिमाचल प्रदेश) आणि लिपुलेख पास (उत्तराखंड) यांचा समावेश आहे.


Nadiya Shafi, Martha Farrel Award from Srinagar

 1. श्रीनगरची व्हिडिओ रिपोर्टर नादीया शफी हिने महिला सशक्तीकरणात उत्कृष्टतेसाठी ‘मार्था फॅरल’ पुरस्कार जिंकला आहे.
 2. पुरस्कारास्वरूपात 1.50 लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले आहे.
 3. नादीया शफी यांनी स्त्री-पुरुष समानता आणि लिंगभेद यावर चर्चा करण्यासाठी क्लब तयार केले आहेत.
 4. त्यामध्ये श्रीनगरच्या विद्यार्थीनी, गृहिणी, कामगार, कारागीर, शेतकरी यांचा समावेश असतो.
 5. डॉ. मार्था फॅरल या एक प्रमुख कार्यकर्त्या होत्या, ज्यांनी स्त्री-पुरुष समानता आणि महिला सशक्तीकरणासाठी लढा दिलेला होता.
 6. 2015 साली मार्था यांचा काबुलमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला.
 7. त्यांच्या स्मृतीत हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो.
 8. हा पुरस्कार रिझवान अदातीया फाउंडेशन (RAF) आणि पार्टीसीपेटरी रिसर्च इन एशिया (PRIA) यांच्याद्वारा सह-प्रायोजित आणि मार्था फॅरल फाउंडेशन (MFF) समर्थित आहे.


 BARC has developed the entire indigenous bulletproof jacket for the first time

 1. भाभा अणु-संशोधन केंद्र (BARC) याने भारतीय सशस्त्र दलासाठी पुढील पिढीचे बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे.
 2. याला “भाभा कवच” असे नाव देण्यात आले आहे.
 3. हे भारतात तयार करण्यात आलेले संपूर्ण स्वदेशी बुलेटप्रुफ जॅकेट आहे.
 4. जे स्वस्त आणि खूप हलके सुद्धा आहे.
 5. याची निर्मिती BARCच्या ट्रॉम्बे केंद्रात करण्यात आली.
 6. याचे एकूण वजन केवळ 6.6 किलोग्राम (सध्या वापरत 17 किलोचे जॅकेट) आहे.
 7. हे जॅकेट अत्यंत कठीण बोरॉन कार्बाईड सिरामिक्स वापरून बनविले आहे.
 8. हे एके-47 (हार्ड स्टील बुलेट), SLR आणि INSUS शस्त्रांविरूद्ध संरक्षण देते.
 9. BARC ने भाभा कवच तंत्रज्ञान ‘मिश्रा धातू निगम, हैदराबाद’ यांच्याकडे हस्तांतरीत केले आहे.


 ICC Champions Trophy for ICC Twenty20 International

 1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2021 साली भारतात होणार्‍या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला टी-20 आंतरराष्ट्रीय प्रकारात बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. या निर्णयानुसार, आठ संघांमध्ये खेळली जाणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2021 साली भारतात आता 16 संघांसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणून खेळली जाणार आहे.
 3. ऑस्ट्रेलियात 2020 विश्व टी-20 चषक स्पर्धा खेळली जाणार आहे.
 4. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे.
 5. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती.
 6. सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 7. ICC मध्ये 105 सदस्य आहेत.
 8. त्यात 12 पूर्ण सदस्य जे कसोटी सामने खेळतात, 37 सहयोगी सदस्य आणि 56 संलग्न सदस्य आहेत.
 9. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईमध्ये आहे.


Christine Bergner: New United Nations Ambassador to Myanmar

 1. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी स्वित्झर्लंडच्या क्रिस्टीन बर्गनर यांची म्यानमारमधील त्यांचा नवा विशेष राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
 2. आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना करण्यात आली.
 3. दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली.
 4. सध्या या संघटनेचे 193 सदस्य देश आहेत.
 5. UN चे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 


Top

Whoops, looks like something went wrong.