1. राज्य सरकारतर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
  2.  शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास या पुरस्काराने गौरवले जाते.
  3.  पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
  4.  ता वडे यांच्या  अध्यक्षतेखालील पं. केशव गिंडे, पं. नाथराव नेरळकर, कमलताई भोंडे यांच्या समितीने या पुरस्कारासाठी  अत्रोली घराण्यातील (  यपूर) भिडे यांची शिफारस केली होती.
  5. यापूर्वी  किशोरी आमोणकर,  पं. जसराज,  प्रभा अत्रे,  पं. राम नारायण,   रवीन सुलताना यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  6. 1935 मघ्ये कोल्हा पूरला जन्मलेल्या भिडे यांना आई-वडिलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले.
  7. अत्रोली घराण्याचे आद्यपुरुष  उस्ताद अल्लादियॉं खॉं यांचे पुत्र उस्ताद मजी खॉं आणि भूर्जी खॉं साहेब यांची तालीम लाभलेले मधुकरराव सडोलीकर हे भिडे यांना गुरू म्हणून लाभले.


  1. राया मला पावसात नेऊ नका, राया मला जरतारी शालू आणा, आला पाऊस मातीच्या वासात, मैत्रिणींनो थांबा थोडं, खुशाल मागनं हसा, अगं पोरी संबाळ दर्याला तुफान आयलंय भारी अशी असंख्य लोकप्रिय ठरलेली गाणी आपल्या आगळ्या आवाजात गाणा-या गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. 
  2. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. ' इतनी शक्ती हमें देना दाता...' हे त्यांचे गाणेही खूपच गाजले.
  3.  लता मंगेशकर यांच्या वाढदिवशीच हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या कलाकारास हा पुरस्कार दिला जातो.
  4. रोख 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असा हा पुरस्कार आहे. समितीने पुष्पा पागधरे यांच्या नावाची शिफारस केली.
  5. तसेच यापूर्वी हा पुरस्कार माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रीदपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे.


  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सन 2017-18 ते 2019-20 या कालावधीत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या एकछत्री योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे.
  2. मंजूरीत तीन वर्षात खर्चासाठी 25060 को टी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, यापैकी केंद्र सरकारचा हिस्सा  18636 कोटी रुपये तर राज्यांचा हिस्सा 6424 कोटी रुपये असेल.
  3. योजनेत अंतर्गत सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा, आधुनिक शस्त्रास्त्रांची उपलब्धतता, पोलीस दलाची गतिशीलता, वाहतूक सहकार्य, भाड्याचे हेलिकॉप्टर, पोलीस वायरलेस सेवेचे आधुनिकीकरण, मालवाहतुक पाठबळ, नॅशनल सॅटेलाइट नेटवर्क, CCTNS प्रकल्प, ई-तुरुंग प्रकल्प इत्यादि बाबींचा समावेश आहे.
  4. योजनेत जम्मू-काश्मीरईशान्येकडील राज्ये आणि नक्षलग्रस्त राज्यांसाठी अंतर्गत सुरक्षेसंबंधी खर्चासाठी 10132 कोटी रुपयांची तरतूद आहे.
  5. नक्षलवादामुळे सर्वाधिक प्रभावित 35 जि ल्ह्यांना 3000 कोटी रुपयांच्या विशेष केंद्रीय साहाय्याची तरतूद आहे.
  6.   शान्येकडील राज्यांमध्ये पोलीस पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, प्रशिक्षण संस्था, तपास सुविधा यासाठी   100 कोटी रुपयांची तरतूद आहे.
  7. गुन्हेगारीविषयक न्याय प्रणालीमधील सुधारणेमधून पोलीस ठाण्यांना एकमेकांशी जोडून गुन्हे व गुन्हेगार यांची नोंद असलेला राष्‍ट्रीय डेटाबेस स्‍थापित केले जाईल.
  8. तसेच   मरावती, आंध्रप्रदेश मध्ये एक नवी  अत्‍याधुनिक गुन्हे अन्वेषण विज्ञान प्रयोगशाळेची स्‍थापना आणि जयपुर, राजस्थान मध्ये सरदार पटेल वैश्‍विक सुरक्षा केंद्राचे आधुनिकीकरण, दहशतवाद-विरोधी व दहशतवादी कार्य प्रतिबंध केंद्र आणि गांधीनगर, गुजरात मध्ये गुन्हे अन्वेषण विज्ञान विद्यापीठाच्या स्‍थापनेची तरतूद आहे.
  9. पोलीस दलांच्या आधुनिकीकरण एकछत्री योजनेमुळे केंद्र आणि राज्य पोलीस दलांची क्षमता आणि कार्यक्षमता  वाढवण्यास बरीच मदत मिळेल. तसेच योजनेच्या अंमलबजावणीमुळे नक्षलवाद प्रभावित क्षेत्र, जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यात सरकारला मदत मिळेल.
  10.  गुन्हे अन्वेषण विज्ञान प्रयोगशाळा आणि सं स्‍था तसेच त्यांच्याकडे उपलब्ध उपकरणांसहित पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या हेतूने विशेष प्रकल्प/कार्यक्रमांसाठी राज्यांना पाठबळ प्रदान करण्याच्या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला आहे, जेणेकरून गुन्हेगारीविषयक न्याय प्रणालीमधील कमींना दूर करता येऊ शकणार.


  1. रिओ ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धामधील उल्लेखनीय खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 जणांचा राज्य सरकारतर्फे 28 सप्टेंबर रोजी रोख पारितोषिके देऊन शानदार सत्कार करण्यात आला. 
  2. सह्याद्री अतिथिगृह येथे क्रीडामंत्री  विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष  आशीष शेलार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे अन्य खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
  3. रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती कुस्तीपटू  
    1. साक्षी मलिक (50 लाख), तिचे मार्गदर्शक  कुलदीप सिंग (25 लाख),
    2. अ‍ॅथलेटिक्सपटू ललिता बाबर (75 लाख), तिचे मार्गदर्शक  भास्कर भोसले (25 लाख),
    3. नौकानयनपटू  दत्तू भोकनळ (50 लाख),
    4. हॉकीपटू  देविंदर वाल्मीकी (50 लाख),
    5. मॅराथॉनपटू  कविता राऊत (50 लाख),
    6. नेमबाज  आयोनिका पॉल (50 लाख),
    7. टेनिसपटू  प्रार्थना ठोंबरे (50 लाख) यांचा सत्कार करण्यात आला. 
  4. तसेच रिओ येथे झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू
    1. उंचउडीपटू मरियप्पन थंगावेलू (एक कोटी), त्याचे मार्गदर्शक  सत्यनारायण (25 लाख),
    2. भालाफेकपटू  देवेंद्र झझारिया (एक कोटी), त्याचे मार्गदर्शक  सुनील तन्वर (25 लाख),
    3. गोळाफेकपटू  दीपा मलिक (75 लाख), तिचे मार्गदर्शक  वैभव सरोही (18.75 लाख),
    4. उंचउडीपटू  वरुण भाटी (50 लाख), त्याचे मार्गदर्शक  सत्यनारायणा (12.50 लाख),
    5. जलतरणपटू  सुयश जाधव (50 लाख) यांचाही  रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. 
  5. आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेमध्ये भारतीय संघाने उपविजेतेपद मिळवले. या संघातील
    1. महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू मोना मेश्राम, पूनम राऊत आणि स्मृती मानधना यांनी प्रत्येकी 50 लाख रुपये तसेच संघ व्यवस्थापिक 
    2. तृप्ती भट्टाचार्य (10 लाख),
    3. फिजोओथेरेपिस्ट रश्मी पवार (10 लाख) व
    4. सायकलपटू ओमकार जाधव (6 लाख) यांचाही सन्मान करण्यात आला.


Top