INDIA RUSSIA AGREEMENT

 1. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
 2. मोदी यांची रशियातील सोशी येथे मे महिन्यात अनौपचारिक भेट झाली होती.
 3. दोन्ही नेते शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर बैठकीत जूनमध्ये चीनमधील क्विंगडाव येथे भेटले होते.
 4. पुतिन यांच्याशी विस्तृत व फलदायी चर्चा झाली. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सहकार्य आहे व ते यापुढेही सुरू राहील असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, पर्यटन यातील मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे.
 5. मोदी-पुतिन यांच्यात मध्यरात्रीनंतरही चर्चा सुरू होती. मे महिन्यात सोशी येथील चर्चेत विशेष धोरणात्मक भागीदारीवर चर्चा झाली होती.
 6. मोदी यांचे दोन दिवसांच्या ब्रिक्स शिखर बैठकीसाठी येथे आगमन झाले. ब्रिक्स इन आफ्रिका हा या वेळच्या बैठकीचा मध्यवर्ती विषय आहे.
 7. ब्रिक्स संघटनेची स्थापना 2009 मध्ये झाली असून त्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्यात जगातील चाळीस टक्के लोकांचा समावेश होतो.


GST RATES ARE MINIMUM ON ELECTRONIC ITEMS

 1. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून प्रथमच ग्राहकांना इलेक्ट्रीक वस्तू सात ते नऊ टक्के कमी दराने विकत घेता येणार आहेत.
 2. केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 21 जुलै रोजी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या 28व्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्यात आला.
 3. जीएसटी कररचनेत इलेक्ट्रॉनिक उत्पादने 28 टक्क्यांच्या कक्षेत ठेवण्यात आली होती. आता काही इलेक्ट्रॉनिक उत्पादने 18 टक्क्यांच्या कक्षेत आली आहेत.
 4. टीव्ही, फ्रिज, व्हॅक्युम क्लिनर्स, वॉशिंग मशिन या दैनंदिन घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. या कर कपातीचा मध्यमवर्गीय ग्राहकांना नक्कीच फायदा होईल पण त्यामुळे सरकारी तिजोरीला कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
 5. तसेच जीएसटी परिषदेने मागच्या आठवडयात झालेल्या बैठकीत एकूण 85 उत्पादनांवर कर कपात घोषित केलीआहे.


DR.Kisan maharaj sakhare awarded dnyanoba tukaram purskar

 1. महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१७-१८चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ. किसन महाराज साखरे यांनाघोषित करण्यात आला.
 2. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 3. मानपत्र, ५ लक्ष रुपये रोख तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
 4. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, डॉ. यु. म. पठाण, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सीस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 5. डॉ. किसन महाराज साखरे हे संत वाङमयावर अध्यापन करत असून, गेल्या ५७ वर्षापासून अनेक मासिक व वृत्तपत्रांमधून उपनिषदे तसेच इतर संत वाङमयावर ते लेखन करीत आहेत.
 6. संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे ते अध्यक्ष असून, त्या समितीव्दारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती त्यांनी केलेली आहे.
 7. आकाशवाणीवर त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यदेखील केलेले आहे.
 8. ज्ञानेश्वरीच्या वेदनिष्ठा, सोहम योग, योगत्रयी प्रवचनमालांवर त्यांनी १०० हून अधिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे.
 9. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच अनेक संस्थांवर त्यांनी विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे.
 10. प्रतिवर्षी १ मे ते ३१ मे या कालावधीत विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क संस्कार शिबीराचे आयोजन करत असतात.
 11. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून दृकश्राव्य रुपात इंटरनेटवर उपलब्ध करुन देण्याचा पहिला प्रकल्पही त्यांनी पूर्ण केलेला आहे.
 12. १९९०साली त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पावणेतीन क्विंटल ताम्रपटावर कोरुन एक चिरंजीव प्रकल्प पूर्ण केलेला आहे.
 13. संत साहित्यातील योगदानासाठी त्यांना टिळक विद्यापीठाकडून डी.लीट पदवी प्रदानकरण्यात आली आहे.
 14. विविध सामाजिक,सांस्कृतिक तसेच वारकरी सांप्रदायिक संस्थांनी त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.


dr.himendra bharati name to one ants category

 1. मुंग्यांच्या प्रजातीवर गेली २० वर्षे काम करणारे डॉ. हिमेंदर भारती यांचे नाव मुंग्यांच्या एका प्रजातीला देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
 2. जम्मू काश्मीरमधील पिरपांजाल हिमालयातील पर्वतराजीत शोधण्यात आलेल्या मुंग्यांच्या एका प्रजातीला लेप्टोजेनीस भारती असे नाव देण्यात आले आहे.
 3. डॉ. भारती हे पतियाळातील पंजाब विद्यापीठात प्राणिशास्त्र व पर्यावरण विज्ञान विभागाच्या ‘अँट सिस्टीमॅटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करतात.
 4. पिरपांजालमध्ये शोधण्यात आलेली मुंगी ११-१२ मिमी लांबीची असून, ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेंपरेट हॉर्टिकल्चर’ या श्रीनगरमधील संस्थेचे डॉ. शाहीद अली अकबर यांनी या मुंग्यांच्या प्रजातीचा शोध लावला आहे.
 5. नव्या मुंगीचा शोध मॉर्फालॉजी तंत्राने लावण्यात आला. डॉ. अकबर यांनीच या प्रजातीला डॉ. भारती यांचे नाव देण्याचे सुचविले. या मुंगीबाबतचा त्यांचा शोधनिबंध ‘बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला.
 6. डॉ. हिमेंदर भारती व त्यांच्या विद्यार्थ्यांनी भारतातील मुंग्यांच्या एकूण ७७ नव्या प्रजाती शोधल्या असून त्यातील २२ पश्चिम घाटातील आहेत.
 7. त्यांनी आग्नेय आशियातील व्हिएतनाम, मलेशिया व चीन या देशांतील आणखी चार नव्या प्रजाती शोधल्या आहेत.
 8. पंजाब विद्यापीठात त्यांनी मुंग्यांची संदर्भसूचीच तयार केली असून त्यांच्याकडे भारत व इतर देशांतील मुंग्यांच्या एक हजार प्रजातींचे नमुने आहेत.
 9. डॉ. भारती यांचे संशोधन मुंग्यांची जीवनशैली, परिसंस्था, त्यांचे उत्क्रांतीतील स्थान, जंगलांच्या संवर्धनात मुंग्यांची भूमिका असे खूप व्यापक आहे.
 10. मुंग्यांच्या अभ्यासाची मिरमेकॉलॉजी नावाची एक शाखा आहे, त्यातील ते अग्रणी संशोधकआहेत.


Top