MPSC chalu ghadamodi, current affairs

1. टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.

2. मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते. तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला.

3. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.1. 


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले.


2. अभिषेक-ज्योती जोडीने अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा १५८-१५१ असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.

3. दिवसाच्या पूर्वार्धात अभिषेकने फक्त एका गुणाच्या फरकाने कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक गमावले. कोरियाने २३३-२३२ असा पराभव केल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिषेक, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या त्रिकुटाने पहिल्या सत्रातसुद्धा अप्रतिम खेळ करीत बरोबरी साधली.

4. परंतु दुसऱ्या सत्रात जाईवॉन यांग, याँगची चॉय आणि ईऊन-क्यू चोय यांनी सामन्यावरील नियंत्रण सोडले नाही. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर यांनी कोरियाकडून २१५-२३१ अशी हार पत्करल्याने जेतेपद गमावले.
 

5. जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. लोकसभेमध्ये बुधवारी ई-सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर झाल्यानंतर ई-सिगारेटचे उत्पादन, आयात आणि विक्री गुन्हा ठरणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात ई-सिगारेटवर बंदी घालणारा अध्यादेश काढण्यात आला होता.

2. आता ई-सिगारेटच्या उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्रीला मज्जाव करणारे नवीन विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल. सर्वच पक्षाच्या बहुसंख्य खासदारांचा या विधेयकाला पाठिंबा होता.

3. ई-सिगारेट म्हणजे काय ?
जिचा सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. फरक असा, की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं.

4. ई -धूम्रपान म्हणजे?
द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत १८० देशांच्या यादीमध्ये भारताची क्रमवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टप्प्यांनी सुधारली आहे. म्हणजे, गेल्या वर्षी ८१ व्या स्थानी असलेला भारत यंदा ७९ व्या स्थानावर आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या नव्या सर्वेक्षणानुसार, ५६% नागरिकांनी लाच दिल्याचे मान्य केले.

2. तर या वर्षी लाच दिलेल्या लोकांची संख्या ५१ % आहे. पासपोर्ट आणि रेल्वे तिकिटांसारख्या सुविधा केंद्रिकृत व काम्प्युटराईज्ड झाल्याने हा भ्रष्टाचार कमी झाला आहे. मात्र, सरकारी कार्यालये आजही लाचखोरीचे अड्डे ठरत आहेत.

3. यात सर्वाधिक लाचखोरी राज्य सरकारच्या कार्यालयात होते.या सर्वेक्षणात १.९० लाख लोकांचा समावेश होता. यात ६४ % पुरुष तर ३६ टक्के महिला आहेत. ४८ % लोकांनी मान्य केले की, स्थानिक सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतेही ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत.

4. २०१७ मध्ये लागू केलेली नोटबंदी भ्रष्टाचार कमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे लोकांचे म्हणणे आहे. लाच म्हणजे एक सुविधा शुल्कच असल्याचे मानणाऱ्या लोकांची संख्याही २०१८ च्या २२ टक्क्यांच्या तुलनेत २६% झाली आहे. मालमत्ता नोंदणी व जमिनीसंबंधीच्या प्रकरणांत सर्वाधिक लाच दिली गेल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द.ब. पारसनीस यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1870 मध्ये झाला होता.

2. पॅनासोनिक चे संस्थापक ‘कोनसुके मात्सुशिता‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला होता.

3. विख्यात हिंदी साहित्यिक ‘हरीवंशराय बच्चन‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.

4. अमेरिकन अभिनेता तसेच मार्शल आर्ट तज्ञ ‘ब्रूस ली‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1940 मध्ये झाला होता.

5. 27 नोव्हेंबर 1978 हा दिवस भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक ‘लक्ष्मीबाई केळकर‘ यांचा स्मृतीदिन आहे.

6. सन 1995 मध्ये पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.


Top