Noida, Greater Noida, for the United Nations' Global Permanent Cities 2025 initiative

 1. संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘वैश्विक शाश्वत शहरे 2025’ (Global Sustainable Cities 2025) पुढाकारासाठी नोएडा, ग्रेटर नोएडा या शहरांची निवड करण्यात आली आहे.
 2. या पुढाकाराच्या अंतर्गत ही शहरे दुसर्‍या शहरांशी स्पर्धा करणार आहे.
 3. राष्ट्रीय राजधानी लगतच्या या दोन शहरांना "युनिव्हर्सिटी सिटी" श्रेणीमध्ये निवडले गेले आहे.
 4. शिवाय मुंबई आणि बेंगळुरू ही दोन शहरे भारतामधील एकमेव आमंत्रित शहरे आहेत.
 5. संयुक्त राष्ट्रसंघ (UN) वैश्विक शाश्वत विकास उद्दिष्टे शहरे पुढाकाराद्वारे (UN Global Sustainable Development Goals (SDG) cities initiative) पाच विभागांमध्ये जगभरातल्या एकूण 25 शहरांची निवड करण्यात आली आहे.
 6. आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना करण्यात आली.
 7. दुसर्‍या महायुद्धानंतर दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली.
 8. सध्या या संघटनेचे जगभरात 193 सदस्य देश आहेत.
 9. UN चे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 
 10. संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क दिला गेला आहे.


Constitution of India Day: 26th November

 1. भारताचा संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.
 2. या वर्षी ‘बुद्धिष्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड’, सावी फाऊंडेशन आणि स्वागत थोरत यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच ब्रेल लिपीत संविधान उपलब्ध केले जात आहे.
 3. अंध व्यक्तीसाठी संविधान ब्रेल लिपीत पाच भागांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
 4. दि. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.
 5. अंतिम मसुदा दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला.
 6. या घटनेचे राष्ट्रार्पण दि. 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आले.
 7. दि. 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारने एका अधिसूचनेद्वारे 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून घोषित केले.
 8. त्याआधी, 1979 सालापर्यंत हा दिन ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणून पाळला जात होता.
 9. संसदीय लोकशाही, संघराज्यीय पद्धत, मुलभूत हक्क व त्यासाठी (न्यायालयीन यंत्रणा), मार्गदर्शक तत्त्वे, केंद्र राज्य संबंध, घटना दुरुस्ती ही संविधानातली प्रमुख अंगे आहेत.
 10. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविणाचा व सर्व नागरिकांस समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देते.
 11. भारतीय संविधानात 395 अनुच्छेद आहेत. यात मुळात 8 परिशिष्टे आणि आज 12 परिशिष्टे आहेत.
 12. ICS अधिकारी, अ‍ॅग्लोइंडियन संस्थानिक, सरकारी सनदी नोकर या सर्वाबाबतबच्या तरतुदींचा यात समावेश आहे. यात अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, जमाती बाबत तरतुदी समाविष्ट आहेत.


Australia: Winner of the T-20 Women's World Cup

 1. अँटीगुआ आणि बारबूडा या कॅरेबियन राष्ट्राच्या अँटीगुआ बेटावर खेळल्या गेलेल्या ‘ICC टी-20 महिला विश्वचषक 2018’ या स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने पटकावले आहे.
 2. ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
 3. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला.
 4. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या अलिसा हेली हिला मालिकेतला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
 5. तर आपल्या पत्नीप्रमाणेच पती मिशेल स्टार्कनेही 2015 सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या मालिकेतला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.
 6. टी-20 विश्वचषक स्पर्धांमध्ये एखाद्या दांपत्याने मालिकेतला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवण्याची ही क्रिकेट इतिहासातली पहिलीच घटना आहे.


Sameer Verma: Winner of Syed Modi International Badminton Tournament

 1. लखनऊ शहरात खेळल्या गेलेल्या ‘सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद 2018’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकल गटाचे विजेतेपद भारताच्या समीर वर्माने जिंकले आहे.
 2. अंतिम लढतीत समीरने चीनच्या ल्यु गाऊंग्झुचा पराभव केला.
 3. स्पर्धेच्या इतर गटाचे विजेते -
  1. महिला एकल गट - हान यूए (चीन)
  2. पुरुष दुहेरी गट - फजर अल्फीन आणि मुहम्मद रेन आर्डिंयांटो (इंडोनेशिया)
  3. महिला दुहेरी गट - चाउ मी कुआन आणि ली मेंग यीन (मलेशिया)
  4. मिश्र गट - ओउ जुआनई आणि फेंग झ्यूइंग (चीन)
 4. ‘सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद ही दरवर्षी भारतात खेळली जाणारी एक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे.
 5. ही लखनऊ शहरात खेळली जाते.
 6. 2011 साली ही स्पर्धा BWF ग्रँड प्रिक्स गोल्ड टूर्नामेंट म्हणून बदलण्यात आली.


Shriram's magnificent idol will be built on the bank of the Sharayu river

 1. उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शरयू नदीच्या किनारी प्रभू श्रीरामाची 151 मीटर उंचीची मुर्ती उभारण्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 
 2. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी याची घोषणा केली.
 3. विशेष म्हणजे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे ही मुर्ती साकारणार आहेत.
 4. श्रीरामाच्या या भव्य मूर्तीसाठी पाच मूर्तीकारांनी आपले मॉडेल सादर केले होते.
 5. यांपैकी मराठी असलेले प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या मॉडेलला मंजूरी देण्यात आली.
 6. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार आहेत.
 7. भारतीय संसदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांचा पुतळाही राम सुतार यांनी साकारला आहे.
 8. रामाची ही प्रस्तावित मूर्ती त्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित अशा प्रकारे साकारण्यात येणार आहे.
 9. यामध्ये धनुर्धारी राजा, मर्यादा पुरुषोत्तम या रामाच्या प्रतिमेचा यातून आभास निर्माण होईल.


Top

Whoops, looks like something went wrong.