1. चोवीस तासांत 969 विमानांचे टेकऑफ आणि लॅंडिंग करण्याचा विश्‍वविक्रम मुंबई विमातळाने केला आहे. या विमानतळाने आपलाच 935 विमानांच्या टेकऑफ आणि लॅंडिंगचा विक्रम मोडीत काढला. आता 24 तासांत एक हजार विमानांचे लॅंडिंग आणि टेकऑफ करण्याचे विमानतळ प्राधिकरणाचे ध्येय आहे.
 2. मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेदत असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे एकच धावपट्टी वापरली जाते; मात्र या आव्हानाशी दोन हात करत मुंबई विमानतळाने शुक्रवारी (ता. 24) पहाटे 5.30 ते शनिवारी (ता. 25) पहाटे 5.30 या 24 तासांत हा विश्‍वविक्रम केला. या कालावधीत तासाला सरासरी 50 विमाने झेपावली आणि उतरली.
 3. दिवसाला एक हजार विमानांचे टेकऑफ आणि लॅंडिंग करण्याचे ध्येय असल्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. हा विक्रम करण्यासाठी वाऱ्याचा वेग आणि दृष्यमानताही महत्त्वाची होती. वातावरणानेही साथ दिल्यामुळे हा विश्‍वविक्रम झाल्याचेही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दिवसाला 900 विमाने

 1. मुंबई विमानतळासारखी परिस्थिती लंडनच्या गॅटविक, इस्तंबुलमधील सबिहा गॉक्‍सन या विमानतळाची आहे; मात्र गॅटविक विमानतळावरून तासाला सरासरी 50 हून अधिक विमाने उड्डाण घेतात आणि उतरतात. गॅटविकच्या खालोखाल मुंबईचा क्रमांक आहे.
 2. मुंबई विमानतळाची तासाला 46 विमानांची क्षमता आहे; मात्र वर्दळीच्या वेळी तासाला 50 विमाने उड्डाण घेतात आणि उतरतात. मुंबईतून दिवसाला 900 विमानांची वाहतूक होते.

असा झाला विक्रम

- प्रत्येक पाच मिनिटांनी दोन विमानांचे टेकऑफ आणि दोन विमानांचे लॅंडिंग

- प्रत्येक विमानाच्या टेकऑफ आणि लॅंडिंगमध्ये 65 सेकंदांचे अंतर

- तासाला 50 विमानांची वाहतूक दोन वेळा

- चार्टर आणि खासगी विमानांसाठी दुपारची वेळ


 1. भारतीय स्वातंत्र्याची एक महत्त्वाची घटना म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस वर्ष 2015 पासून राष्ट्रीय विधी दिवस (संविधान दिवस/राज्यघटना दिवस) म्हणून साजरा केला जात आहे.
 2. या दिवसाच्या निमित्ताने, नवी दिल्लीत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर 2017 रोजी दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 3. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना सभेकडून भारताचे संविधान अंगिकारले गेले, जे 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले. संविधानानुसार भारत कायद्यात निर्दिष्ट नियमांच्या हद्दीत कामकाज करणारा शासित देश ठरलेला आहे.
 4. भारतात संविधानाची अंमलबजावणी दोन घटकांमधून केली जाते. पहिले राजकारणी द्वारे चालवली जाणारी सभागृहे आणि दुसरे म्हणजे कायदा न्यायप्रणाली (भारतीय न्यायालये).
 5. भारतीय संविधानात सध्या 25 खंड मध्ये 448 कलमे, 12 अनुसूची आणि 5 परिशिष्ट आहेत. संविधानाचे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत हस्तलिखीत आहे. प्रेम बिहारी नाराइन राईजदा यांच्या सुंदर हस्ताक्षराने लिहिले गेले आणि त्यामधील कलाकृती नंदलाल बोस आणि इतर कलाकार यांच्याकडून केली गेली.


 1. आसामच्या गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या ‘AIBA जागतिक युवा महिला मुष्टियुद्ध स्पर्धा 2017’ मध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण व दोन कांस्य अशी एकंदर 7 पदके पटकावली.
 2. नीतू (48 किलो), ज्योती गुलीया (51 किलो), साक्षी चौधरी (54 किलो), शशी चोप्रा (57 किलो) आणि अंकुशिता बोरो (64 किलो) या खेळाडूंनी भारताला सुवर्ण मिळवून दिले. शिवाय अंकुशिता बोरो हिला स्पर्धेतली सर्वोत्तम मुष्टियुद्धपटू म्हणून गौरवण्यात आले. हे आत्तापर्यंतचे भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.
 3. आंतरराष्ट्रीय आर्मेचर मुष्टियुद्ध संघटना (AIBA) हे मुष्टियुद्ध क्रीडाप्रकाराचे जागतिक महासंघ आहे. याची स्थापना 1946 साली झाली. याचे मुख्यालय लॉंसन, स्वीत्झर्लंड येथे आहे.


Top