mpsc class

 1. शेतमालाला अधिक उठाव मिळावा तसेच कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राच्या महत्त्वाकांक्षी अशा कृषी योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
 2. कृषी-सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया उद्योग विकास (संपदा) असे या योजनेचे नाव आहे. केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही धमाजी जिल्ह्य़ात भारतीय कृषी संशोधन संस्थेचा (आयसीएआर) कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला.
 3. या वेळी पंतप्रधानांनी येत्या पाच वर्षांत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.
 4. शेतमालाला अधिकाधिक उठाव मिळावा तसेच शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळावी यासाठी ‘संपदा’ योजना आखण्यात आली आहे.
 5. या योजनेच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया उद्योगाचा विकास होण्यास मदत होईल आणि त्या माध्यमातून तरुणांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले.
 6. या योजनेसाठी केंद्रातर्फे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कालांतराने त्यात परकीय गुंतवणुकीच्या साह्य़ाने पतपुरवठा केला जाणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  
 7. २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या हरितक्रांतीऐवजी ‘सदाकाळ हरितकाळ’ यावर आमचा भर राहणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान


mpsc class...

 1. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने २०१७ वर्षांसाठीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा सीएट क्रिकेट मानांकन पुरस्कार पटकावला आहे.
 2. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे शानदार कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि आरपीजी इंटरप्रायझेसचे कार्याध्यक्ष हर्ष गोयंका यांच्या हस्ते अश्विनला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 3. भारताने मागील हंगामात १३ पैकी १० कसोटी सामने जिंकण्याची किमया साधली. न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये अश्विनने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. मागील १२ महिन्यांत अश्विनने एकंदर ९९ बळी घेतले आहेत.
 4. युवा फलंदाज शुभम गिलला वर्षांतील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत झालेल्या भारत-इंग्लंड युवा संघांमधील सामन्यांत शुभमने लक्षवेधी कामगिरी केली होती.
 5. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गावस्कर आले होते, तेव्हा बालपणी मी त्यांची पहिली स्वाक्षरी घेतली होती, अशी आठवण अश्विनने या वेळी जागवली. याचप्रमाणे वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीचे कौतुकही केले.
 6. चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत गोलंदाजीच्या नवीन शैलीचा प्रयोग करण्याच्या विचाराधीन आहे.
 7. रविचंद्रन अश्विन, भारताचा फिरकी गोलंदाज


mpsc classes

 1. मोदींच्या तीन वर्षांच्या कारकीर्दीचे सर्वाधिक दृश्य आणि सर्वाधिक बोचऱ्या टीकेचे लक्ष्य ठरलेले वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे परदेश दौरे. सुमारे एक हजार दिवसांपैकी १०५ दिवस ते परदेश दौऱ्यांवरच होते.
 2. त्यातही २०१५मध्ये तर विमानाला भिंगरी लावल्यासारखेच ते फिरले होते. तीन वर्षांतील निम्मे दौरे त्या एका वर्षांत झाले होते. त्यांच्या परदेश दौऱ्यांची वैशिष्टय़े..
 3. २६ मे २०१४ रोजी शपथ घेतल्यानंतर मोदींनी पहिला परदेश दौरा केला होता, तो १५,१६ जून २०१४ रोजी चिमुकल्या भूतानचा.
 4. एकेकाळी व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेला त्यांनी चारवेळा, तर जपान, नेपाळ, सिंगापूर, फ्रान्स, चीन, उझबेकिस्तान, रशिया, श्रीलंका आणि अफगाणिस्तानला प्रत्येकी दोनदा भेट दिली. अंटाक्र्टिका खंडवगळता सर्व खंडांना त्यांची पावले लागली.
 5. परदेश दौऱ्यांबाबत मोदी आणि त्यांचे पूर्वसुरी डॉ. मनमोहनसिंग यांची तुलना करता येईल. मोदींनी तीन वर्षांमध्ये २७ दौरे केले. ४४ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी २७५ कोटींहून अधिक खर्च आला. डॉ. सिंग यांनी दहा वर्षांमध्ये ७३ दौरे केले आणि ९६ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी ७९५ कोटींहून अधिक खर्च आला.
 6. मोदींच्या परदेशवारींची तीन प्रमुख वैशिष्टय़े सांगता येतील.
 7. एखाद-दुसरा अपवादवगळता खासगी माध्यमांना स्वत:सोबत सरकारी खर्चाने नेण्याचे टाळले.
 8. एकाच दौऱ्यात शक्य तेवढय़ा देशांना भेटी देण्याचा प्रयत्न केला.
 9. अनिवासी भारतीयांची लक्षणीय संख्या असलेल्या देशांमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले. उदाहरणार्थ अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर किंवा शारजातील क्रिकेट स्टेडियमवरील रंगीबेरंगी स्वागतसोहळा.
 10. एकाही दौऱ्यामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज मोदींसोबत सहभागी नव्हत्या. तसा पायंडा नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वर्तुळातून सांगण्यात येते.
 11. पुढील दोन महिनेही दौऱ्यांचे..
 12. मोदींचा शेवटचा परदेश दौरा होता जपानचा. १० ते १२ नोव्हेंबर २०१६दरम्यान ते जपानला गेले. त्यानंतर बरोबर सहा महिन्यांनी ते नुकतेच परदेशात गेले ते श्रीलंकेमध्ये. पुढील दोन महिने त्यांच्या परदेश दौऱ्यांचे वेळापत्रक भरगच्च आहे.
 13. २९ मे ते ३ जून : जर्मनी, स्पेन आणि रशिया
 14. ७ ते ९ जून : अस्ताना, कझाकस्तान (शांघाय सहकार्य परिषद)
 15. ५ ते ६ जुलै : इस्रायल
 16. ७ ते ८ : हॅम्बर्ग, जर्मनी (जी-२० देशांची बैठक)


mpsc current affairs

 1. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या, तब्बल सव्वानऊ किमी लांबीच्या ढोला-सादिया पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पंतप्रधानांनी हा पूल देशाला अर्पण केला.
 2. या पुलामुळे ईशान्येकडील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल आसाम व तिथून पुढे देशभर पाठविण्यास मदत होणार असून भविष्यात ईशान्य भारताचा र्सवकष विकास सांधणारा हा सेतू ठरेल,
 3. असा आशावाद पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. प्रख्यात आसामी गायक भूपेन हजारिका यांचे नाव या पुलाला देण्यात आले आहे.
 4. पुलाची वैशिष्टय़े..
 5. लांबी : ९.१५ किमी
 6. वांद्रे-वरळी सागरी सेतूपेक्षा ३.५५ किमीने जास्त लांब
 7. खर्च : दोन हजार कोटी रुपये
 8. आसाम-अरुणाचलमधील अंतर १६५ किमीने कमी
 9. हा प्रवास सात ते आठ तासांनी कमी होणार
 10. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाभागात लष्कराला तातडीने रसद पुरवण्यासाठी उपयुक्त
 11. ईशान्येकडील दळणवळणात महत्त्व
 12. ईशान्येकडील उत्तम प्रतीच्या आल्याला नवी बाजारपेठ उपलब्ध होणार


Top

Whoops, looks like something went wrong.