chalu ghadamodi, current affairs

1. भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना शपथ दिली. येडियुरप्पा यांना सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

2. तर एकट्या येडियुरप्पा यांचाच शपथविधी पार पडला. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतरच अन्य मंत्र्यांना शपथ देण्यात येईल. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करून मगच मंत्रिमंडळ ठरवू, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.

3. तसेच येडियुरप्पा यांनी 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना सत्तास्थापनेचा दावा करताना सांगितले.


chalu ghadamodi, current affairs

1. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. मात्र पाकिस्तानसाठी मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये आमीर खेळणार आहे.

2. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आमीरने आपला निर्णय कळवला आहे.

3. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला होता, मात्र आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठून देण्यामध्ये तो अपयशी ठरला.

4. जुलै 2009 साली श्रीलंकेविरुद्ध गॅले कसोटी सामन्यात आमीरने पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

5. त्याने 36 कसोटी सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं, या सामन्यांमध्ये आमीरने 30 च्या सरासरीने 119 बळी घेतले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. ब्रिटनचे माजी परराष्ट्र मंत्री आणि लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटन यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

2.  बोरिस यांच्या मंत्रीमंडळाचीही घोषणा झाली असून त्यामध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे. बोरिस यांच्या मंत्रीमंडळात प्रीती पटेल यांना गृहमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

3.  गृहमंत्री पदी विराजमान होणाऱ्या पटेल या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. विशेष म्हणजे पटेल यांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एक गुजराती व्यक्ती गृहमंत्री  झाली आहे.पटेल हे पाकिस्तानी मूळचे साजिद जाविद यांची जागा घेतील, ज्यांना पहिला जातीय अल्पसंख्याक चांसलर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

4. पटेल व्यतिरिक्त इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ति यांचे जावई ऋषि सुनाक यांना कोषागाराच्या मुख्य सचिवाचे पद देण्यात आले आहे. रिचमंड एमपी कॅबिनेटचा एक भाग असेल. त्यांनी पूर्वी गृहनिर्माण, स्थानिक सरकार आणि समुदायांसाठी विभागातील कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले आहे.


mpsc chalu ghadamodi, current affairs

1. मिशन शक्ती यशस्वी होण्याच्या काही महिन्यांनीच भारत आतापर्यंतचा सर्वप्रथम अवकाश युद्ध अभ्यास सुरू करणार आहे. या स्पेस वॉर अभ्यासानंतर संयुक्त स्पेस डॉक्टिन देखील सुरू केले जाऊ शकते.

2. या अभ्यासामुळे भारत भविष्यातील अवकाश युद्धासाठी तयार होईल. हा संपूर्ण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला आहे.
3.  संरक्षण मंत्रालय तीनही दलांसोबत काम करेल आणि अशा घटनांच्या भविष्यातील योजना तयार करेल. 
4. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार,
या अभ्यासाचे नाव ‘इंडस्पेसएक्स’ असे ठेवले गेले आहे आणि बहुतेकदा 25-26 जुलै रोजी आयोजित केले जाईल.

5. इंडस्पेसएक्स’ ड्रिल भारतीय सशस्त्र दलांना विश्वयुद्धाच्या स्थितीत त्यांची क्षमता तपासण्यासाठी मदत करू शकेल. हे भारतीय सशस्त्र सेनांना ASATची क्षमता समजण्यास मदत करेल की ते भारतीय आकाशाचे रक्षण कसे करू शकतील. 

6. ASAT – अँटी सैटेलाइट शस्त्र – आपल्याकडे स्पेस मालमत्तेस नष्ट करणे किंवा अक्षम करणे ही क्षमता आहे. एएसएटी कोणतीही लष्करी किंवा नागरी जागा संपत्ती नष्ट करू शकते. 


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी महाराष्ट्राने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील खेळाडू जास्तीत जास्त संख्येने पदके मिळवतील यादृष्टीने ‘मिशन शक्ती’ योजनेचे नियोजन करण्यात आले आहे.

2.  यासाठी राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच यासाठी राज्य शासन 300 कोटी रुपये खर्च करणार असून त्यापैकी 150 कोटी रुपये यावर्षी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती 
दिली.
3.1900 ते 2019 या कालावधीत अमेरिकेने 2650, रशियाने 1122 ऑलिंपिक पदके मिळवली आहेत. तर या कालावधीत भारताने केवळ 28 पदके मिळवली आहे. 


4. 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत उत्तम कामगिरी करून तिरंगा मानाने फडकवायचा असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी आतापासून मिशन शक्ती अंतर्गत प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. 

5. 2024 ग्रीष्मकालीन ऑलिंपिक स्पर्धा हे आंतरराष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट इव्हेंट आहे. याचे आयोजन पॅरिस, फ्रान्समध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट, 2024 दरम्यान होणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सन 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी  निवड झाली. हा एक विक्रमच आहे.

2. द्रवखनिज तेलवायूचा म्हणजेच एलपीजी (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने सन 1999 मध्ये मंजूर केला होता.

3. 27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

4. 1761 मध्ये  माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

5. १८४४ मध्ये इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन.


Top